चालू घडामोडी आणि दिनविशेष - 21 फेब्रुवारी 2024

Date : 21 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरिमन यांचं निधन
 • प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस नरिमन यांचे बुधवारी नवी दिल्लीत निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
 • नोव्हेंबर १९५० पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. तर, १९६१ मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी ७० वर्षांहून अधिक काळ कायद्याचा सराव केला आहे. सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि १९७२ पासून नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत होते. मे १९७२ मध्ये ते मुंबईहून दिल्लीला गेले तेव्हा त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले.

कोण होते फली एस नरिमन?

 • १० जानेवारी १९२९ रोजी रंगून येथे जन्मलेले फली नरिमन यांचे शालेय शिक्षण विविध ठिकाणी झाले. मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी मिळवली. फली यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत जावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती; पण त्यांनी मात्र सरळ मुंबईतील सरकारी विधि महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुवर्णपदकासह त्यांनी विधि शाखेची पदवी मिळवली. मग मुंबई उच्च न्यायालयात १९५० पासून त्यांनी वकिली सुरू केली. वीस वर्षे वकिली केल्यानंतर १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ बनले. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता लक्षात घेऊन १९७२ मध्ये केंद्र सरकारने अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी त्यांची नियुक्ती केली. १९७५ पर्यंत ते या पदावर होते. 
 • इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करताच त्याचा निषेध म्हणून त्यांनी लगेच आपल्या पदाचा राजीनामा दिला व खासगी वकिली सुरू केली. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर नरिमन हे युनियन कार्बाइड कंपनीचे वकील होते. मात्र  पीडितांची भयानक अवस्था पाहिल्यानंतर ‘आयुष्यात केलेली ही सर्वात मोठी चूक’ अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिलीच, पण या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड घडवून आणताना पीडितांना ४७ कोटी डॉलरची भरपाई मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पाकिस्तानमध्ये PML-N, PPP पक्षांत युतीची घोषणा, लवकरच शाहबाज शरीफ घेणार पंतप्रधानपदाची शपथ!
 • राष्ट्रीय निवडणूक झाल्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा चालू होती. मात्र आता या दोन्ही पक्षांचे युतीवर एकमत झाले असून सत्तेत कोणाचा किती सहभाग असेल, कोणाला किती पदे मिळणार तसेच पंतप्रधानदी कोणाची निवड होणार? या सर्वांचा त्यांनी प्रभावी तोडगा काढला आहे. पीएमएल-एन आणि पीपीपी या दोन्ही पक्षांत युती झाली असून लवकरच ते पाकिस्तानमध्ये सरकारची स्थापना करणार आहेत.

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

 • पीपीपी आणि पीएमएल-एन या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत पाकिस्तानमध्ये मंगळवारी रात्री एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमच्यात युती झाली असून लवकरच आम्ही सत्तास्थापनेचा दावा करू, अशी घोषणा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होतील तर पीपीपीचे सह-अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून निवड केली जाईल. शाहबाज यांच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणते मंत्रिपदं दिली जातील, याचा तपशील नंतर जाहीर केला जाईल असे झरदारी यांनी यावेळी सांगितले.

कोणाचा किती जागांवर विजय?

 • पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय निवडणूक झाली होती. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धांदल झाली आहे, असा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे निवडणूक लढवण्यावर बंदी असलेल्या पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांचा गट या निवडणुकीत सर्वांत मोठा गट म्हणून समोर आला होता. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्रानुसार एकूण ९३ जागांवर अपक्ष उमेदवारांचा तर पीएमएल-एन पक्षाचा ७५ आणि पीपीपीचा ५४ जागांवर विजय झाला.
भारतीयांना मिळणार परदेशात फिरण्याची संधी! व्हिसाची चिंता सोडा, लगेच तिकीट बुक करा
 • अनेक भारतीयांना परदेशात फिरण्याची आवड असते. परदेशात फिरण्यासाठी व्हिसा आवश्यक असतो. व्हिसा मिळवणे काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मोठ्या प्रक्रियेला समारे जावे लागते. काही देशांमध्ये परदेशी नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश दिला जात नाही. पण आजच्या काळात काही देशांमध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे ज्यामुळे प्रवाशांना प्रवासापूर्वी व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) म्हणजे परदेशी नागरिकाचे देशात आगमन झाल्यानंतर दिला जाणारा व्हिसा. या सुविधेमुळे परदेशी नागरिकांना परदेशातील प्रवास सुखकर होतो.
 • व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) सुविधांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे भारतीय पासपोर्ट धारकांसाठी परदेशात प्रवास करणे सोपे आणि अधिक सोयीचे झाले आहे. कारण अलीकडील हेन्ली पासपोर्ट इंडेक्स अहवालानुसार, “भारतीय पासपोर्ट जागतिक क्रमवारीत ८० व्या स्थानावर पोहोचला आहे ज्यामुळे भारतीय नागरिकांना २०२४ पर्यंत ५७ देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवास करण्याची परवानगी मिळते. व्हिसा ऑन अरायव्हलसाठी अर्ज करण्यासाठी, एखादी व्यक्ती सामान्यतः विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांना आवश्यक असलेली आवश्यक कागदपत्रे सादर करते. पण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, व्हिसा-ऑन-अरायव्हल (VoA) म्हणजे आगमन व्हिसा विशिष्ट कालावधीसाठी आणि पूर्वनिश्चित शुल्क दिल्यानंतर जारी केला जातो.

खंड-देश-मुक्कामाचा कालावधी

 • आफ्रिका-बुरुंडी(Burundi) -३० दिवस
 • आफ्रिका- केप वर्दे (Cape Verde)-३० दिवस
 • आफ्रिका-कोमोरोस(Comoros)-४५ दिवस
 • आफ्रिका-जिबूती(Djibouti)-३१ दिवस
 • आफ्रिका-इथिओपिया(Ethiopia)- १ महिना
 • आफ्रिका-गिनी-बिसाऊ(Guinea-Bissau)- ९० दिवस
 • आफ्रिका-मादागास्कर (Madagascar)-६० दिवस
 • आफ्रिका-मॉरिटानिया(Mauritania)- ९० दिवस
 • आफ्रिका-रवांडा(Rwanda)-३० दिवस
 • आफ्रिका-सेशेल्स(Seychelles) ३ महिने
 • आफ्रिका-सोमालिया(Somalia) ३० दिवस
 • आफ्रिका-टांझानिया(Tanzania) ३० दिवस
 • आफ्रिका-टोगो(Togo) ७ दिवस
 • आशिया-कंबोडिया (Cambodia) ३० दिवस
 • आशिया-इराण (Iran) ३० दिवस
 • आशिया-जॉर्डन (Jordan) ३० दिवस
 • आशिया-लाओस(Laos)३० दिवस
 • आशिया-मलेशिया (Malaysia)३० दिवस
 • आशिया-मालदीव (Maldives)३० दिवस
 • आशिया-मंगोलिया(Mongolia) ३० दिवस
 • आशिया-म्यानमार (Myanmar) ३० दिवस
 • आशिया-नेपाळ (Nepal)९० दिवस
 • आशिया-ओमान (Oman)१० दिवस
 • आशिया-कतार (Qatar)३० दिवस
 • आशिया-श्रीलंका (Shri Lanka) ३० दिवस
 • आशिया-तिमोर-लेस्टे (Timor-Leste)३० दिवस
 • आशिया-तैवान(Taiwan -Leste) १४दिवस
 • आशिया-थायलंड (Thailand) १५ दिवस
 • आशिया-व्हिएतनाम(Vietnam) ३० दिवस
 • युरोप-आर्मेनिया(Armenia) १२० दिवस
 • युरोप-बेलारूस (Belarus) ३० दिवस
 • युरोप-जॉर्जिया (Georgia) ९० दिवस
 • युरोप-तुर्की (Turkey)३० दिवस
 • उत्तर अमेरिका- सेंट लुसिया(Saint Lucia) ६ आठवडे
 • उत्तर अमेरिका-त्रिनिदाद आणि टोबॅगो(Trinidad and Tobago) ९० दिवस
 • उत्तर अमेरिका-ओशनिया मार्शल बेट(Marshall Islands) ९० दिवस
 • मायक्रोनेशिया(Micronesia)३० दिवस
 • उत्तर अमेरिका-नौरू(Nauru) १४ दिवस
 • उत्तर अमेरिका-पलाऊ(Palau) ३० दिवस
 • उत्तर अमेरिका-सामोआ(Samoa) ८०दिवस
 • उत्तर अमेरिका-तुवालु(Tuvalu)१ महिना
 • दक्षिण अमेरिका- बोलिव्हिय(Bolivia) -९० दिवस
AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा!
 • गेल्या काही दिवसांपासून एआय या नव्या तंत्रज्ञानाची प्रचंड चर्चा आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असल्याचंही म्हटलं जातंय. क्रिएटीव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना या एआयचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे एआयच्या उदयामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. परंतु, एआयमुळे नोकऱ्या जाणार नसून नोकऱ्यांमध्ये वाढ होईल, असा विश्वास आयबीएम इंडिया आणि दक्षिण आशियाचे संचालक संदीप पटेल यांनी व्यक्त केलाय. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
 • आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी तंत्रज्ञानात झालेली प्रगती आणि त्यावर आधारी नवकल्पनांबाबत त्यांची निरिक्षणे शेअर केली. “एआयमुळे नोकरींच्या संधीमध्ये वाढ होणार आहे. जेव्हा नव्या नोकरीची भूमिका असते तेव्हा सर्व भीती व्यक्त करतात”, असं संदीप पटेल म्हणाले. यावेळी त्यांनी इंटरनेट क्रांतीचाही उल्लेख केला. “इंटरनेटमुळे वृत्तपत्र छपाईसारख्या अनेक विशिष्ट क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या. परंतु, वेब डिझाईन, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग आणि वेब प्रकाशनसारख्या नवीन नोकऱ्या उदयास आल्या. या नव्या नोकऱ्यांमुळे आता लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे”, असंही संदीप पटेल म्हणाले.

रिस्किलिंग काळाची गरज

 • पटेल यांनी रिस्किलींगचा मुद्दा अधोरेखित केला. “सध्या ४६ टक्के भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑटोमेशन आणि एआय टुल्सससह सहयोग करण्यासाठी सक्रियपणे प्रशिक्षण देत आहेत किंवा त्यांना पुन्हा कौशल्य शिकवत आहेत. जे या दिशेने पुढील प्रयत्नांसाठी महत्त्वपूर्ण वाव दर्शवितात.”
 • “या परिस्थितीची सरकारला चांगली जाणीव असल्याचंही ते म्हणाले. ते म्हणाले की, अनेक संस्थांमध्ये अनेक कर्मचारी नवं एआय आणि ऑटोमेशन टुल्ससह काम करण्यास उत्सुक आहेत. सध्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचं सर्वांत मोठं आव्हान आहे. प्रत्येकजण कोडर किंवा एआय डेव्हलपर असू शकत नाही. परंतु, या विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचं आहे”, असंही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाचा राजकीय फायदा होणार का ?
 • मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये एकमताने मंजूर झाल्यानंतर त्याचे राजकीय श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाली आहे. विधेयक मंजूर होताच विधान भवनाच्या बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयजयकार करण्यात आला आणि शिंदे यांच्यामुळेच आरक्षण मिळाल्याचे त्यांच्या समर्थकांनी अधोरेखित केले.
 • ओबीसी मतपेढी दुखवू नये यासाठी भाजपने फारसा जल्लोष न करता विशेष खबरदारी घेतली होती. यापूर्वी दोनदा आरक्षणाचा निर्णय घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्याचा निवडणुकीत फारसा राजकीय लाभ झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत शिंदे गट वा महायुतीला या आरक्षणाचा किती फायदा होईल का, याची आता उत्सुकता असेल.

 

‘स्लम सॉकर’ प्रकल्पाला लॉरेओ पुरस्कारासाठी नामांकन

 • नवी दिल्ली स्थित ‘स्लम सॉकर’ या फुटबॉल प्रकल्पाला या वर्षीच्या प्रतिष्ठेच्या लॉरेओ जागतिक क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे.
 • खेळांच्या माध्यमातून गरजू मुले आणि युवकांचे आयुष्य बदलण्यात साहाय्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देणे हा ‘लॉरेओ स्पोर्ट्स फॉर गुड’ पुरस्काराचा हेतू आहे. या पुरस्कारासाठी ‘स्लम सॉकर’सह अन्य चार व्यक्ती/संस्थांना नामांकन मिळाले आहे. राजधानी दिल्ली येथील झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षित करणे आणि त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढणे हा ‘स्लम सॉकर’ प्रकल्पाचा उद्देश आहे.
 • लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी विश्वचषक विजेत्या अर्जेटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेसी, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिकसह ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार मिळवणारा फ्रान्सचा तारांकित फुटबॉलपटू किलियन एम्बापे, ‘फॉम्र्युला १’ विजेता मॅक्स व्हेस्र्टापेन, टेनिसपटू राफेल नदाल, पोल वॉल्टपटू मोंडो डुप्लान्टिस आणि बास्केटबॉलपटू स्टेफ करी यांना नामांकन मिळाले आहे.
 • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या अमेरिकेच्या धावपटू शेली-अ‍ॅन फ्रेझर-प्राइस आणि सिडनी मॅक्लॉक्न-लेव्हरोन यांच्यासह जलतरणपटू केटी लडेकी, फुटबॉलपटू अलेक्सिया पुतेयास, स्किंगपटू मिकाएला शिपरीन आणि टेनिसपटू इगा श्वीऑनटेक यांना लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी मानांकन देण्यात आले आहे. तसेच विश्वचषक विजेता अर्जेटिना फुटबॉल संघ, चॅम्पियन्स लीग विजेता रेयाल माद्रिद संघ, ‘एनबीए’ विजेता गोल्डन स्टेट वॉरियर्स संघ, ‘फॉम्र्युला १’मधील ओरॅकल रेड बूल रेसिंग संघ, फ्रान्स रग्बी संघ आणि इंग्लंड महिला फुटबॉल संघ हे लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम संघाच्या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत.

तुर्कस्तानहून परतलेल्या भारतीय मदत पथकांचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

 • भूकंपग्रस्त तुर्कस्तानमध्ये तैनात करण्यात आलेल्या भारताच्या मदत व आपदा निवारण पथकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कौतुक केले. गेल्या काही वर्षांत भारताने स्वत:ची ओळख केवळ स्वयंपूर्ण देश म्हणूनच नव्हे, तर नि:स्वार्थी देश म्हणून बळकट केली आहे, असे ते म्हणाले.
 • भूकंपग्रस्त तुर्कस्तानला शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिल्यानंतर, राष्ट्रीय आपदा निवारण दलाची (एनडीआरएफ) एकूण तीन पथके ७ फेब्रुवारीला तेथे पाठवण्यात आली होती. भारतीय लष्कराचे वैद्यकीय पथकही  भूकंपग्रस्त लोकांच्या सेवेसाठी तेथे तैनात करण्यात आले आहे.
 • ‘तुम्ही मानवतेची मोठी सेवा केली असून, भारताला अभिमान वाटावा असे काम केले आहे. आम्ही जग हे एक कुटुंब असल्याचे मानतो आणि संकटात त्याच्या कुठल्याही सदस्याला त्वरित मदत करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे समजतो’, असे भूकंपग्रस्त तुर्कस्तानहून परतलेल्या पथकांच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले. जगात कुठेही संकट उद्भवते, तेव्हा प्रतिसाद देणारा पहिला देश होण्यास भारत तयार असतो, असेही त्यांनी सांगितले.

Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण

 • सध्या जगातील दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Apple , Microsoft सह अनेक टेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र TCS या दिग्गज कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीची शक्यता दिसत नाही आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा कोणताही हेतू नाही.
 • TCS चे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, TCS कंपनी स्टार्टअप कंपन्यांमधून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार आहे. तसेच पुढे बोलताना लक्कड म्हणाले, माझे हे विधान अशा वेळी आले आहे की, जगभरातील दिग्गज टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.
 • सध्या जगातील दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Apple , Microsoft सह अनेक टेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र TCS या दिग्गज कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीची शक्यता दिसत नाही आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा कोणताही हेतू नाही.
 • TCS चे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, TCS कंपनी स्टार्टअप कंपन्यांमधून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार आहे. तसेच पुढे बोलताना लक्कड म्हणाले, माझे हे विधान अशा वेळी आले आहे की, जगभरातील दिग्गज टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.

Chrome ब्राऊजरसाठी Googleने आणले ‘हे’ दोन भन्नाट फिचर्स; आता लॅपटॉपची बॅटरी आणि मेमरी दोन्हीही वाचणार

 • Google Chrome चा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ऑफिस, शाळा, किंवा तुमच्या वैयक्तिक कामासाठी क्रोमचा वापर होतो. यावर आपल्याला ज्या विषयाबद्दल माहिती हवी असते त्याची माहिती मिळवता येते. मात्र आता करून वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलने क्रोममध्ये दोन नवीन फीचर्स आणले आहेत. या फीचर्समुळे वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. गुगलने आणलेले हे फीचर्स कोणते व त्यांचा वापरकर्त्यांना कसा फायदा होणार आहे हे आपण जाणून घेऊयात.
 • गुगल क्रोममध्ये Google ने दोन फीचर्स आणली आहेत. ज्यामुळे तुमची बॅटरी आणि मेमरी सेव्ह होऊ शकणार आहे. क्रोममध्ये गुगलने एनर्जी आणि मेमरी सेव्हर मोड हे फिचर आणले आहे. हे अपडेट तुम्हाला विंडो, मॅक, क्रोम OS आणि linux साठी देण्यात आले आहेत.
 • परफॉर्मन्स टॅबमध्ये तुम्हाला Google Chrome ची दोन दिसतील. गुगल क्रोमचे मेमरी सेव्हर फिचर मेमरीमधून निष्क्रिय टॅब्सबद्दलची माहिती डिलीट करते. ज्यावर तुम्ही काम करत आहात तेवढ्याच टॅब्सची माहिती हे फिचर क्रोममध्ये चालू ठेवते. नवीन फिचर वापरकर्त्यांना मन्युअली वेबसाईट कनेक्ट करण्याची परवानगी देते जिथे त्यांना मेमरी सेव्हर सुरु ठेवायचे आहे.
 • तसेच तुम्हाला क्रोमच्या परफॉर्मन्स टॅबमध्ये Energy saver हे फिचर देखील मिळणार आहे. तुम्ही क्रोम वापरत असताना हे फीचर ऑन केले की, ते तुमच्या डिव्हाइसच्या बॅटरीचा कमीत कमी वापर करेल. हे फिचर सुरु होताच बॅकग्राऊंड अ‍ॅक्टिव्हिटी, अ‍ॅनिमेशन आणि व्हिडीओ फ्रेम व स्मूथ स्क्रोलिंग हे बंद होतात. ज्यामुळे बॅटरीचा कमीत कमी वापर होतो. तुमची सिस्टीम चार्ज होत नसेल तेव्हा आणि तुमच्या सिस्टीमची बॅटरी २० टक्क्यापर्यंत कमी होईल तेव्हा तुम्ही हे फिचर सूर करू शकता. या दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडला की chrome हे एनर्जी सेव्हर मोड फिचर आपोआप सुरु करेल.
 • Google Chrome चे हे नवीन अपडेट Chrome V110 वर आले असून कंपनी हे अपडेट टप्प्याटप्प्याने आणत आहे. त्यामुळे नवीन अपडेट काही वापरकर्त्यांना दिसत नाही आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेची आज पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक

 • शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. शिवाय, ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात निवडणुक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यासर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूस शिवसेनेकडून आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
 • या बैठकीसंदर्भात मंत्री व प्रवक्ते दिपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर (शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण देण्याचा आदेश) आज संध्याकाळी शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. याशिवाय या बैठकीत काही नवीन पदाधिकारी निवडले/नियुक्त केले जाऊ शकतात, असेही दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - 21 फेब्रुवारी 2022

 

स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धा - भारतीय बॉक्सिंगपटूंपुढे अवघड आव्हान :
 • बल्गेरिया येथे सुरू असलेल्या स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेच्या मुख्य फेरीची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात आली असून भारतीय बॉक्सिंगपटूंपुढे खडतर आव्हान असणार आहे.

 • निखत झरिनला (५२ किलो वजनी गट) थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला असला, तरी सुमित आणि अंजली तुषीर यांना तुलनेने अधिक यशस्वी प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागणार आहे. ६६ किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीत अंजलीचा दोन वेळा जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या रशियाच्या सादत दाल्गातोव्हाशी सामना होईल.

 • पुरुषांमध्ये आकाशला (६७ किलो) पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. परंतु सुमितला (७५ किलो) आगेकूच करण्यासाठी जागतिक रौप्यपदक विजेत्या झामबुलात बिझहामोव्हला पराभूत करावे लागेल. यंदा १० पुरुष आणि सात महिला असे भारताचे एकूण दहा बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

‘करोनाचे निर्बंध मार्चमध्ये शिथिल करण्याची शक्यता’ :
 • मागील महिन्याभरात राज्यात आणि मराठवाडय़ात करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर कमी झाली आहे. १८ जानेवारी रोजी राज्यात एकूण ३९ हजार २०७ नवीन करोनाबाधित आढळून आले होते. तर १९ फेब्रुवारी रोजी हाच आकडा एक हजार ६३५ होता.

 • १८ जानेवारी रोजी मराठवाडा विभागात करोनाचे दोन हजार ३०३ रुग्ण आढळून आले होते, तर १९ फेब्रुवारी रोजी हा आकडा ७३ होता. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात असलेले करोनाचे निर्बंध येत्या मार्चमध्ये शिथिल करण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे व्यक्त केली.

 • राज्य आपत्ती निवारण विभाग आणि राज्य कृती दलाने येत्या मार्चमध्ये करोना निर्बंधात मोठय़ा प्रमाणावर शिथिलता देण्याच्या संदर्भात अनुकूल मत व्यक्त केले आहे. सध्या मोठय़ा प्रमाणावर निर्बंध शिथिल आहेत. परंतु उपाहारगृहे, विवाह समारंभ, थिएटर इत्यादी संदर्भातील निर्बंध मार्चमध्ये आणखी शिथिल करण्याचा विचार होऊ शकेल. परंतु या संदर्भातील निर्णय त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतील, असेही  टोपे यांनी सांगितले.

ऐतिहासिक जिल्हा वाचनालयातील दुर्मीळ ग्रंथांचे ‘डिजिटायझेशन’ :
 • द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या अहमदनगर जिल्हा वाचनालयातील सुमारे १५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या मौल्यवान परंतु कालानुरूप जीर्ण झालेल्या ग्रंथांचे ‘डिजिटायझेशन’ केले जाणार आहे. नगर जिल्हा वाचनालयाने पुणे वाचन मंदिर संस्थेबरोबर करार केला आहे. डिजिटायझेशनह्णमुळे रसिक वाचक व अभ्यासकांना दुर्मीळ ग्रंथ व पुस्तके पुन्हा उपलब्ध होणार आहेत. जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी ही माहिती दिली.

 • अहमदनगर जिल्हा वाचनालय व पुणे नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वाचनालयातील असंख्य दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करून त्यांचे जतन व सर्वाना ते संकेतस्थळावर पाहता येण्याविषयीचा करार नुकताच झाला.

 • या वेळी नगरचे पदाधिकारी शिरीष मोडक, विक्रम राठोड, अनंत देसाई, पुणे नगर वाचन मंदिरचे संचालक अरिवद रानडे, प्रकल्प समन्वयक तुषार बारी, ग्रंथपाल सविता गोकुळे, किरण आगरवाल, प्रा. मेघा काळे, प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर, कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल उपस्थित होते.

 • विक्रम राठोड म्हणाले,की वाचन संस्कृतीचा दुर्मीळ ठेवा अभ्यासक व वाचकांना जगभरात उपलब्ध होणे ही लोकाभिमुख घटना असून, दुर्मीळ ग्रंथ पुढील पिढय़ांपर्यंत जाणार आहेत. प्रकल्प समन्वयक अरिवद रानडे यांनी सांगितले,की जिल्हा वाचनालयातील दुर्मीळ ग्रंथांचा अमूल्य ठेवा डिजिटायझेशनच्या माध्यमातून जगभरातील वाचकांना उपलब्ध होणे हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे सांगून जिल्हा वाचनालयाने यासाठी घेतलेला पुढाकार वाचन संस्कृती जतन व संवर्धन करण्यास प्रेरक आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय करोनाबाधित :
 • ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची करोना चाचणी रविवारी होकारात्मक आली असून त्यांना सौम्य सर्दीसारखी लक्षणे दिसत आहेत. पण येत्या काही दिवसांत त्या नियमित दिनचर्या सुरू करतील, असे  बकिंगहॅम राजवाडय़ातील सूत्रांनी सांगितले.

 • राणी एलिझाबेथ या ९५ वर्षांच्या आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. राजगादीचे वारस ७३ वर्षीय चार्लस् यांना या महिन्याच्या आरंभी दुसऱ्या वेळी करोना झाला होता. त्या आधी काही दिवस ते राणी एलिझाबेथ यांना भेटले होते. ऑक्टोबरमध्येही प्रकृती अस्वास्थ्यामुळे एलिझाबेथ यांना एक रात्र रुग्णालयात दाखल केले होते. 

हिजाब घातल्याने ५८ विद्यार्थिनी निलंबित; कर्नाटकातील अनेक शिक्षण संस्थांनी प्रवेशही नाकारला :
 • कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या आणि प्रशासनाविरोधात निदर्शने करणाऱ्या ५८ विद्यार्थिनींना शनिवारी निलंबित करण्यात आले.

 • न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्नाटकाच्या अनेक भागांतील विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याने त्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले. ‘‘आम्ही महाविद्यालयात आलो, पण प्राचार्यानी आम्हाला निलंबित केल्याचे सांगितले. पोलिसांनीही आम्हाला महाविद्यालयात येण्यापासून रोखले. आमच्याशी कोणीही संवाद साधला नाही’’, असे निलंबित विद्यार्थिनींनी सांगितले.

 • राज्य सरकारचा आदेश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाद्वारे विद्यार्थिनींना वर्गात हिजाब किंवा भगवा स्कार्फ घालण्यास मज्जाव करण्यात आला असूनही मुली हिजाब घालून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आल्या होत्या.

२१ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.