चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० जून २०२०

Date : 20 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नियोजित वेळेपूर्वीच रिलायन्स कर्जमुक्त; मुकेश अंबानींची घोषणा :
  • रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढील वर्षापर्यंत स्वत:ला पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट आपल्या नियोजित वेळेपूर्वीच साध्य केले आहे. याबद्दल कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एक निवेदन जारी केले आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत कंपनी कर्जमुक्त करण्याचे आश्वासन नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात आल्याचे ते निवेदनाद्वारे म्हणाले.

  • “३१ मार्च २०२१ पर्यंत आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीज कर्जमुक्त करू असे भागधारकांना केलेलं आश्वासन फार पूर्वी पूर्ण झालं आहे. हे जाहीर करून मला आनंद होत आहे,” असं मुकेश अंबानी यांनी निवेदन जारी करून म्हटलं. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओमध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली. तसंच हे ध्येय साध्य करण्यासाठी मुकेश अंबानींनी गेल्या काही दिवसांपासून गुतवणुकदार कंपनीशी जोडत होतो. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या एका कंपनीनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली होती.

  • ही रिलायन्स जिओमधील दहावी गुंतवणूक होती. रिलायन्स जिओच्या आतापर्यंत २४.७० टक्के हिस्स्याची विक्री करण्यात आली आहे. याद्वारे कंपनीनं १.६ लाख कोटी रूपयांची रक्कम जमवली आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी :
  • रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक फायनॅन्स अँड पॉलिसीच्या (एनआयपीएफपी) अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदाची जबाबदारी विजय केळकर यांच्या खांद्यावर होती. केळकर हे २०१४ पासून या पदावर कार्यरत होते. दरम्यान, उर्जित पटेल हे २२ जून रोजी एनआयपीएफपीच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेणार आहेत.

  • एनआयपीएफपीनं यासंदर्भातील माहिती दिली. “रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल हे २२ जून २०२० पासून चार वर्षांसच्या कालावधीसाठी आमच्यासोबत जोडले जात असल्यानं आम्हाला आनंद होत आहे,” अशी प्रतिक्रिया एनआयपीएफपीकडून देण्यात आली.

  • एनआयपीएफपीचे मुख्य उद्दिष्ट सार्वजनिक अर्थशास्त्राशी संबंधित क्षेत्रात धोरण बनवण्यास योगदान देणं हे आहे. या संस्थेला अर्थ मंत्रालय, केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारांकडून वार्षिक अनुदानही मिळते.

युमीफेनोवीर औषधाच्या चाचण्यांना मान्यता :
  • नवी दिल्ली : भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या लखनौतील केंद्रीय औषध संशोधन संस्थेला युमीफेनोवीर या औषधाच्या करोना रुग्णांवर चाचण्या करण्याची परवानगी मिळाली आहे.

  • तेथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, डॉ. राममनोहर लोहिया इन्स्टिटय़ूट ऑफमेडिकल सायन्सेस, एआरएचे लखनौ मेडिकल कॉलेज या प्रयोगात सहभागी होणार आहेत. हे औषध सुरक्षित मानले जात असून त्याचा वापर विषाणूंना मानवी पेशीत प्रवेश करण्यापासून रोखण्याकरिता होत आहे. युमीफेनोवीर हे प्रामुख्याने इन्फ्लुएंझावर वापरले जाते ते चीन व रशियात उपलब्ध आहे.

  • कोविड १९ रुग्णांवर त्याचा वापर करण्यात आला आहे. त्याची परिणामकारकता भारतीय रुग्णात शोधण्याचे काम  लखनौतील केंद्रीय औषध संशोधन संस्था करणार आहे. या संस्थेने हे औषध तयार करण्याची किफायतशीर प्रक्रिया शोधून काढली असून मे. मेडिझेस्ट फार्मास्युटिकल लि. या गोव्यातील कंपनीला या औषधाचे वितरण करण्याचा परवाना देण्यात आला आहे.

  • लखनौतील केंद्रीय औषध संशोधन संस्थेचे  संचालक प्रा. तपस कुंड यांनी सांगितलेकी, हे औषध किफातशीर व परिणामकारक असून सुरक्षितही आहे. त्यात प्रतिबंधात्मक  गुणधर्म आहेत. कोविड १९ विरोधातील एकातत्मिक धोरणाचा भाग म्हणून  या औषधाच्या चाचण्या करण्यात येत असल्याचे भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक शेखर मांडे यांनी सांगितले.

कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे दिग्दर्शकाचे निधन :
  • दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील दिग्दर्शक केआर सच्चिदानंदन यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे गुरुवारी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ४८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. केआर सच्चिदानंदन हे मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सैची या नावाने ओळखले जायचे. ‘अय्यपनम कोशियुम’ या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली होती.

  • टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार सच्चिदानंद यांची तब्बेत बिघडल्यामुळे १६ जून रोजी त्यांना केरळमधील त्रिसूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. पण गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सच्चिदानंदन यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

  • केआर सच्चिदानंदन यांनी २००७मध्ये करिअरला सुरुवात केल्याचे म्हटले जाते. त्यांनी स्क्रिप्ट रायटर म्हणून सुरुवात केली होती. अभिनेता पृथ्वी सुकुमारनसोबत त्यांनी ‘अय्यपनम कोशियुम’ चित्रपटाची निर्मिती केला. या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

२० जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.