चालू घडामोडी आणि दिनविशेष - 20 एप्रिल 2023

Date : 21 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यात दोन लाखांवर विद्यार्थी अवैध! जाणून घ्या काय आहे प्रकरण..
  • राज्यातील विद्यार्थी संख्या किती? याचा तपशील शाळा निहाय पटसंख्या मोजून ठरतो. तशी आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध असते. मात्र अधिकृत ३ लाख ६५ हजार ७७८ विद्यार्थी असून, त्यापैकी १ लाख २१ हजार ९९७ विद्यार्थीच वैध असल्याचे शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाने नमूद केले. नेमके काय तर ही अधिकृत संख्या आधार सलग्न विद्यार्थ्यांची आहे. मंगळवारी दिवसभर अशी तपासणी झाली.
  • आधार असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व तत्सम लाभ देण्याचे धोरण आहे. त्यामुळे आधार संलग्न नसणारे विद्यार्थी अपात्र ठरल्याने गोंधळ उडतो. त्यासाठी अवैध ठरलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे इ आधार कार्ड प्रणालीत करणे आवश्यक ठरते. त्यानंतर स्टुडंट पोर्टलवर ते अद्यावत करणे भाग आहे.
  • पोर्टलवर सुरक्षित व अद्यावत केल्यानंतरच विद्यार्थी वैध ठरण्याचे प्रमाण वाढेल, असे मत एका शिक्षक नेत्याने व्यक्त केले. ही प्रक्रिया किचकट ठरू नये म्हणून उपाय व्हावे, अन्यथा अवैध विद्यार्थी लाभ वंचित ठरतील. त्याचा त्रास मुख्याध्यापकांना होणार.
‘या’ आहेत भारतातील पाच अतिश्रीमंत महिला; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती
  • आपलं नाव श्रीमंतांच्या यादीत असावं असं कुणाला वाटत नाही? पण काही जणांचंच हे स्वप्नं पूर्ण होतं. पूर्वी नवऱ्याच्या संपत्तीवरच बायकोची श्रीमंती मोजली जायची. आता मात्र काळ बदलला आहे. त्यामुळे स्वत: उद्योजिका असलेल्या आणि अब्जावधींचा कारभार एकहाती चालविणाऱ्या अनेक उद्योगिनींचा समावेश अतिश्रीमंतांच्या यादीत होतो. ‘फोर्ब्स’च्या वतीने ही यादी दरवर्षी जाहीर केली जाते. भारतातील उद्योगपतींचा यामध्ये समावेश असतो हे आपल्याला माहिती आहेच. पण त्याचबरोबर फोर्ब्सच्या अतिश्रीमंतांच्या २०२३ सालच्या यादीत भारतीय महिलांनी बाजी मारली आहे. सावित्री जिंदाल या देशातील सर्वांत श्रीमंत महिला ठरल्या आहेत. सावित्री जिंदाल या प्रसिद्ध जिंदाल ग्रुपच्या अध्यक्ष आहेत. भारतीय श्रीमंतांची यादी, २०२३ मध्ये १६ नवीन नावे समाविष्ट झाली आहेत, त्यांतील तीन महिला आहेत. जाणून घेऊ या भारतातील या अतिश्रीमंत महिलांबद्दल-
  • १) सावित्री जिंदाल (संपत्ती – १७ दशकोटी डॉलर्स)
  • २) रोहिका सायरस मिस्त्री (संपत्ती – ७ दशकोटी डॉलर्स)
  • ३) रेखा झुनझुनवाला (संपत्ती- ५.१ दशकोटी डॉलर्स)
  • ४) विनोद राय गुप्ता (४ दशकोटी डॉलर्स)
  • ५) सरोज राणी गुप्ता (संपत्ती – १.२ दशकोटी डॉलर्स)
देशातील दुसरे Apple चे रिटेल स्टोअर ‘या’ शहरात होणार सुरू; ७० सदस्यांची टीम १५ भाषांमध्ये संवाद साधणार
  • दिल्लीमध्ये देशातील Apple च्या दुसऱ्या रिटेल स्टोअरची सुरुवात होणार आहे. Apple सीईओ टीम कूक स्टोअरचे उद्घाटन होणार आहे. परवा म्हणजेच १८ एप्रिल रोजी टीम कूक यांनी देशातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन मुंबईमध्ये केले. दिल्लीमध्ये उभारण्यात आलेले हे रिटेल स्टोअर स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभारण्यात आले आहे. हे स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले आहे. आज सकाळी १० वाजल्यानंतर ग्राहक या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. या स्टोअरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
  • Apple चे देशातील दूर रिटेल स्टोअर हे दक्षिण दिल्लीमधील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये तयार करण्यात आले आहे. मॉलमधील पहिल्या मजल्यावर असणारे हे स्टोअर मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअरपेक्षा खूपच लहान आहे. मात्र येथे ग्राहकांना Apple ची सर्व प्रॉडक्ट्स बघायला मिळणार आहेत.
  • तसेच दिल्लीमधील या स्टोअरमध्ये ७० सदस्यांची टीम काम करणार आहे. ज्यामध्ये ते १५ भाषांमध्ये संवाद साधणार आहेत. ज्यामुळे खरेदीदाराला प्रॉडक्ट खरेदी करताना आपलेपणा वाटणार आहे. सर्वांसाठी खुले असेल असे एक स्टोअर असावे अशी आमची कल्पना होती असेन Apple रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष डियर्डे ओब्रायन म्हणाले. आमची टीमचे सदस्य स्थानिक ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि नवीन मार्ग शोधण्यात त्यांची मदत करण्यासाठी उत्सुक आहेत.
  • देशातील पहिले Apple रिटेल स्टोअर १८ एप्रिल रोजी मुंबईत सुरु झाले आहे. याचे उद्घाटन सीईओ टीम कुक यांनी केले. मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अ‍ॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अ‍ॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा कोरण्यात आल्या आहेत . स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अ‍ॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात आले.
मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधलं ते संबलपूरी साडीने!
  • ब्रिटनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या मॅरेथॉन शर्यतीत भारतातील संबलपूरी साडीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं, ही बातमी नक्कीच वाचताना रोचक वाटेल, नव्हे ती आहेही! मँचेस्टर येथे नुकत्याच पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ओदिशाच्या मधुस्मिता जेना दास हिने आपल्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. मँचेस्टरनिवासी ४१ वर्षीय मधुस्मिता हिने भारतीय पारंपारिक हातमागावर विणलेली लालसर केशरी रंगातील संबलपूरी साडी परिधान करून ४२.५ किमी (सुमारे २६.४ मैल) अंतराची शर्यत ४ तास ५० मिनिटांत पूर्ण केल्याने प्रेक्षक थक्क झाले!
  • तिच्या ह्या कामगिरीची दखल अनेक ट्विटरयुजर्सनी घेतली असून भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे असे समयोचित प्रदर्शन केल्याबद्दल तिचे भरभरून कौतुकही केले आहे. ४२.५ किमी अंतराची ही स्पर्धा तशीही एवढ्या कमी अवधीत पूर्ण करणं हेच आव्हान असताना ओडिया मधुस्मिताने साडी नेसून ती पूर्ण करणं हे अधिक आश्चर्यकारक आणि आव्हानात्मक असल्याचं बऱ्याच नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. काही युजर्सनी मॅरेथॉनसारख्या स्पर्धेमध्ये असे पाऊल उचलणे हेच अभिनंदनीय असल्याचं म्हटलं आहे. काही युजर्सनी तिच्या या धाडसीपणाला सलाम केला आहे. काहींनी हा अभिमानाचा क्षण असल्याचंही लिहिलं आहे. मॅरेथॉनमधील तिच्या फोटोवर एका युजरने असं म्हटलं आहे की, खरंच इतका सुंदर फोटो पाहण्यासारखा आहे.
  • विदेशी कपड्यांना जास्त पसंती देणाऱ्यांनी आपली संस्कृती जगाला कशी दाखवायची, हे मधुस्मिताकडून शिकलं पाहिजे. एका ट्विटर युजरने स्पर्धेतील तिचा फोटो शेअर करत त्याखाली म्हटले आहे की, फोटोमधून तिचा पारंपारिक पेहरावात स्पर्धेत सहभागी होण्यामागचा दृढनिश्चय आणि आत्मविश्वास झळकतो. आदिवासी आणि समृद्ध संबलपूरच्या सांस्कृतिक वैशिष्ट्याचेही कौतुक त्याने केले आहे. मँचेस्टर मॅरेथॉन य ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाच्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धेत वैभवशाली वारसा लाभलेल्या भारताच्या पारंपारिक पेहराव परिधान करून सहभागी होताना तिने कोणतेही दडपण घेतले नाही किंवा त्यामुळे स्वतःचे लक्ष विचलित होऊन दिले नाही, याबद्दलही काही युजर्सनी तिचे विशेष कौतुक केले आहे.
भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश, पुढली तीन दशके लोकसंख्यावाढ कायम; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
  • United Nations Population Report संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार आता भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकले आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली असून चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. विशेष म्हणजे भारताच्या लोकसंख्येत पुढली तीन दशके वाढ कायम राहणार असून त्यानंतर घट सुरू होईल, असे अनुमान संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने काढले आहे.
  • ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ (यूएनएफपीए) या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०२३’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षाही अधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार भारतामध्ये १५ ते ६४ या कमावित्या वर्षांमधील नागरिकांचे प्रमाण लोकसंख्येच्या ६८ टक्के आहे. शून्य ते १४ या वयोगटात २५ टक्के, १० ते १९ वयोगटात १८ टक्के, १० ते २४ वयोगटात २६ टक्के नागरिक आहेत.
  • ६५ वर्षांवरील निवृत्तीच्या वयातील नागरिकांचे प्रमाण अवघे सात टक्के आहे. देशात केरळ आणि पंजाब या राज्यांमध्ये वृद्धांची संख्या सर्वाधिक असून बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्ये तुलनेने ‘तरुण’ असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. १९५० पासून जागतिक लोकसंख्येची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांमार्फत जाहीर होऊ लागली. त्यानंतर प्रथमच या यादीत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
  • ‘यूएनएफपीए’च्या अंदाजानुसार २०५० सालापर्यंत भारताची लोकसंख्या १६६.८ कोटींपर्यंत गेली असेल तर त्यावेळी चीनची लोकसंख्या १३१.७ कोटींपर्यंत आक्रसण्याची शक्यता आहे. २०३० सालापर्यंत भारतातील वृद्धांची लोकसंख्या आताच्या बरोबर दुप्पट, १९.२ कोटी होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. २०५० सालापर्यंत दर पाच व्यक्तींपैकी एक भारतीय वृद्ध असेल. हे लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षा आणि आरोग्य यासाठी आगामी काळात नियोजन करावे लागेल, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.
२०४७ पर्यंत भारत अमली पदार्थमुक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
  • देशातील अमली पदार्थाचे संकट अधिक तीव्र होऊ लागले असून हे रॅकेट निर्दयपणे मोडून काढले जाईल. अमली पदार्थ व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील. त्यासाठी सर्व राज्यांतील सरकारांच्या सहकार्याची गरज आहे. पण, त्यासाठी राज्य सरकारांना राजकीय मतभेद बाजूला ठेवावे लागतील. केंद्र व राज्ये यांच्या एकत्रित प्रयत्नांतून २०४७ पर्यंत भारत अमली पदार्थमुक्त केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दिली.
  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अमली पदार्थविरोधी कृती दलाच्या प्रमुखांच्या पहिल्या परिषदेत शहा बोलत होते. अमित शहा म्हणाले की, २०४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होतील. पुढील २७ वर्षांमध्ये देश अमली पदार्थमुक्त करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले असून ते पूर्ण केले जाईल. देशातील अमली पदार्थाच्या समस्यांना व्यापारीच प्रामुख्याने जबाबदार असून त्यांच्यामुळे तरुण अमली पदार्थाच्या आहारी जातात. म्हणूनच अमली पदार्थाच्या व्यापाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

वर्षभरात ६ लाख किलो अमली पदार्थ जप्त

  • जून २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात ७ हजार ११७ कोटी रुपये किमतींचे ६ लाख ७३ हजार ६०७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. २००६ ते १३ या सात वर्षांमध्ये १ हजार २५७ गुन्हे दाखल केले गेले तर, १ हजार ३६३ जणांना अटक झाली. १ लाख ५२ हजार २०६ किलो अमली पदार्थ जप्त केले गेले. या अमली पदार्थाची किंमत ५ हजार ९३३ कोटी होती. २०१४ ते २२ या काळात ३ हजार ५४४ गुन्हे नोंदवण्यात आले असून ५ हजार ४०८ जणांना अटक झाली. १५ हजार ८७६ कोटींचे ३ लाख ७३ हजार ४९५ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
  • केंद्र सरकारच्या बहुविध उपायांमुळे अमली पदार्थ जप्त होण्याच्या प्रमाणात १४५ टक्के वाढ झाली. तर गुन्ह्यांच्या नोंदणीमध्ये १८१ टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) दिली आहे.

 

बार कौन्सिलकडून विजय मराठे ज्येष्ठ विधिज्ञ पुरस्काराने सन्मानित :
  • बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाने ठाणे येथे आयोजित केलेल्या वकील परिषदेत सोलापूरचे माजी जिल्हा सरकारी वकील विजय भास्कर मराठे यांना ज्येष्ठ विधिज्ञ पुरस्काराने गौरविण्यात आले. फौजदारी, दिवाणी, सहकार, औद्योगिक, कामगार, स्थानिक स्वराज्य संस्था आदी संबंधित कायदेविषयक असंख्य खटले अ‍ॅड. मराठे यांनी यशस्वीपणे चालविले आहेत.

  • १९७२ पासून पाच दशके त्यांना वकिलीचा अनुभव आहे. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाने त्यांना ठाण्यातील वकील परिषदेत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक यांच्या हस्ते ज्येष्ठ विधिज्ञ पुरस्कार देऊन गौरविले.

  • या वेळी बार कौन्सिलचे अध्यक्ष व्ही. डी. साळुंके, उपाध्यक्ष राजेंद्र उमाप, माजी अध्यक्ष मिलिंद थोबडे यांच्यासह महाराष्ट्र व गोव्यातील बहुसंख्य वकिलांची उपस्थिती होती. मूळचे माढा तालुक्यातील निमगावचे अ‍ॅड. विजय मराठे हे वकिली व्यवसायासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करीत असताना मिळालेल्या संपूर्ण मानधनाची रक्कम कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी कल्याण निधीत जमा केली होती.

  • अलिकडे करोना महामारीच्या संकटकाळातही त्यांनी पाच लाख रुपयांची रक्कम पंतप्रधान सहायता निधीसाठी पाठविली होती. विधिक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी अ‍ॅड. विजय मराठे यांना ज्येष्ठ विधिज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्याबाबतचा प्रस्ताव अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडे पाठविला होता.

पारंपरिक औषधांच्या चाचण्या जागतिक दर्जाच्या व्हाव्यात-मोदी ; जामनगरमधील वैश्विक केंद्राचे भूमिपूजन :
  • जगातील वेगवेगळे देश साथरोगांवर मात करण्यासाठी पारंपरिक औषधांकडे वळत असल्याने आयुर्वेद, सिद्ध, युनानी औषध उत्पादनांना मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगरमधील वैश्विक पारंपरिक औषधांच्या केंद्रात (जीसीटीएम) या औषधांची तपासणी आणि प्रमाणन हे जागतिक दर्जाचेच व्हायला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बजावले.

  • या केंद्राचे भूमिपूजन मोदी यांच्याहस्ते झाले. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रिवद कुमार जगन्नाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडोस घेब्रेसस उपस्थित होते. मोदी म्हणाले की, आणखी २५ वर्षांनी जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला शंभर वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी प्रत्येक घरात पारंपरिक उपचारांना स्थान मिळालेले असेल.

  • जगभरातील पारंपरिक औषधोपचारांना या केंद्रात स्थान मिळाले पाहिजे. त्यामुळे पुढील पिढय़ांना लाभ मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या केंद्राबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने भागिदारी केली असून त्यातून भारताच्या या क्षेत्रातील योगदानाचा गौरव झाला आहे, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.

ला रोडा बुद्धिबळ स्पर्धा - भारताच्या गुकेशला अजिंक्यपद :
  • भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने स्पेन येथे झालेल्या ४८व्या ‘ला रोडा’आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

  • १५ वर्षीय गुकेशने नऊ फेऱ्यांमध्ये अपराजित राहताना एकूण आठ गुणांसह ही स्पर्धा जिंकली. गुकेशला सात सामने जिंकण्यात यश आले, तर त्याचे दोन सामने बरोबरीत सुटले. त्याने अखेरच्या फेरीत इस्राइलच्या व्हिक्टर मिखालेव्स्कीवर मात करत अग्रस्थान मिळवले. दुसऱ्या स्थानावरील अर्मेनियाच्या हेक मार्तिरोस्यानच्या खात्यावर ७.५ गुण होते. गुकेशने या स्पर्धेत मिखालेव्स्कीसह अल्बेर्तो हर्नाडेझ रॅमोस, डॅनिएल रोमेरो पलारेस, हाविएर बेर्नाबेऊ लोपेझ कार्लोस, जॉर्ज रेन्टेरिया आणि नाहुल गवारेते यांना पराभूत केले.

  • गुकेशचा सहकारी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेअंती प्रज्ञानंदसह अन्य चार खेळाडूंचे सात गुण होते. मात्र, टायब्रेकमधील सरस गुणांच्या बळावर प्रज्ञानंदला तिसरे स्थान मिळाले. सहाव्या फेरीत प्रज्ञानंद आणि गुकेश आमनेसामने आले होते. या सामन्यात प्रज्ञानंदला विजयाची संधी होती. मात्र, गुकेशने दमदार पुनरागमन केल्यामुळे ४१ चालींअंती हा सामना बरोबरीत सुटला. प्रज्ञानंदने अखेरच्या फेरीत हेक मार्तिरोस्यानवर २६ चालींमध्ये विजय मिळवला. गुकेशप्रमाणचे प्रज्ञानंदही या स्पर्धेत अपराजित राहिला.

  • ऑलिम्पियाड युवकांसाठी सुवर्णसंधी -आनंद चेन्नई : भारतात होणाऱ्या ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत युवकांना आपले आदर्श असलेल्या खेळाडूंचा खेळ पाहता येईल. ही युवकांसाठी सुवर्णसंधी असेल, असे मत भारताचा पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंदने व्यक्त केले. यंदा प्रतिष्ठेची बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा चेन्नईमध्ये २८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. आता या स्पर्धेला १०० दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

धर्मस्थळांतील ध्वनिक्षेपकांचा आवाज आवारापुरता मर्यादित ; उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश :
  • पुढील महिन्यात येणाऱ्या अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद या सणांच्या दिवशी ध्वनिक्षेपकांचा आवाज वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियमावली लागू करण्याचे निर्देश दिले.

  • धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असली तरी ध्वनिक्षेपकांचा आवाज धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असला पाहिजे. आवाराबाहेर आवाज जाता कामा नये आणि त्याचा त्रास इतरांना होता कामा नये, असे योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले.

  • अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड करू नये, असा स्पष्ट इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला. प्रत्येकाला आपल्या धार्मिक परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रम, उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये.

  • ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी आहे. मात्र त्यामुळे होणाऱ्या आवाजाचा त्रास इतरांना झाला नाही पाहिजे. ज्या कार्यक्रमांना आधी परवानगी दिली आहे, त्यांनीच ध्वनिक्षेपकाचा वापर करावा. नव्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास बंदी असून आता नव्याने कुणालाच परवानगी मिळणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

करोना आकडेवारी केंद्राला देत नसल्याचा दावा केरळला अमान्य :
  • केरळ सरकार करोना रुग्णांची दैनंदिन माहिती केंद्राला देत नसल्याचे वृत्त केरळ सरकारने मंगळवारी फेटाळले. हे आरोप खोटे असून, राष्ट्रीय स्तरावर यासंदर्भात चाललेला अपप्रचार निषेधार्ह असल्याची टीका केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी केली.

  • केरळ सरकार करोना रुग्णांची आकडेवारीची माहिती दर पाच दिवसांनी देते. त्यामुळे नव्या करोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि संक्रमण दराविषयीच्या भारताच्या करोना साथविषयक मुख्य निरीक्षण निर्देशांकावर परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्राने केरळ सरकारला दैनंदिन अद्ययावत आकडेवारी देण्यास सांगितले आहे.

  • मात्र, या संदर्भात आरोग्यमंत्री जॉर्ज यांनी सांगितले, की केरळने दररोज करोनाविषयक आकडेवारी केंद्राला विहित स्वरुपात कळवली आहे. त्यात आतापर्यंत कुठलाही खंड पडलेला नाही. या संदर्भातील संगणकीय पुरावेच असल्याने ते कुणालाही नाकारता येणारच नाहीत.

  • केंद्रीय सहसचिवांनी या संदर्भात पाठवलेल्या पत्राची प्रत राज्याच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांपर्यंत पोहोचण्याआधीच प्रसारमाध्यमांकडे गेल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

२० एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.