चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० एप्रिल २०२१

Date : 20 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ICSE बोर्डाकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय :
  • करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

मंगळ ग्रहावर नासाच्या हेलिकॉप्टरचं यशस्वी उड्डाण :
  • अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मंगळ ग्रहावर पाठवलेल्या हेलिकॉप्टर इन्जेन्युटीनं यशस्वी उड्डाण केलं. या उड्डाणानंतर नासातील शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. नासानं या हेलिकॉप्टर उड्डाणाचं लाईव्ह प्रसारण केलं होतं. दूसऱ्या ग्रहाच्या पृष्ठभागावरून उड्डाण करणं आणि नियंत्रित करणं शक्य असल्याचं नासाकडून सांगण्यात आलं आहे.

  • वजनानं हलक्या असण्याऱ्या या हेलिकॉप्टरकडे जगातील शास्त्रज्ञांचं लक्ष लागून होतं. नासानं या उड्डाणाचं थेट प्रक्षेपण केलं. अनेकांना हे उड्डाण यशस्वी होईल की नाही याबद्दल धाकधूक लागून होती. मात्र हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं आणि शास्त्रज्ञांनी सुटकेचा निश्वास सोडला. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी या हेलिकॉप्टरनं उड्डाणाचं प्रसारण सुरु झालं होतं. १० फूट हवेत फिरल्यानंतर हेलिकॉप्टरनं पुन्हा लँडिंग केलं. ही संपूर्ण घटना अवघ्या ३० सेंकदाची होती.

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही मोहीम फत्ते करण्यात यश आलं. यापूर्वी ११ एप्रिलला हा प्रयोग करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र कमांडच्या क्रमाबाबत गोंधळ झाल्याने त्यावेळी उड्डाण टाळण्यात आलं. त्यानंतर नासातील शास्त्रज्ञांनी सॉफ्टवेअरही अपडेट केलं होतं. या उड्डाणानंतर नासातील शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. मोहीम यशस्वी करण्यासाठी ध्येय आणि चिकाटी हवी असते असंही नमूद केलं.

१८ वर्षांवरील सर्वांना लस :
  • करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवताना १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा सोमवारी केली. लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मेपासून सुरू होणार असून, केंद्राने राज्ये, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापनांना थेट निर्मार्त्यां कडून लसमात्रा खरेदी करण्यास मुभा दिली आहे.

  • महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने रुग्णवाढ होत असल्याने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्याची मागणी विरोधकांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली होती. अखेर ही मागणी मान्य करत केंद्राने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

  • केंद्राच्या नव्या लसीकरण धोरणानुसार लसनिर्माते मासिक ५० टक्के लशी केंद्र सरकारला तर उर्वरित ५० टक्के लशी राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विकू शकतात. त्यासाठी लसनिर्मात्या कंपन्यांना राज्यांना आणि खुल्या बाजारात विक्री करण्यात येणाऱ्या ५० टक्के लशींच्या किमती १ मेआधी जाहीर करणे आवश्यक आहे. त्याआधारे राज्य सरकारे, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापने लशींची मागणी नोंदवू शकतील.

  • शासकीय केंद्रावरील लसीकरण यापुढेही सुरु राहणार असून, ते नि:शुल्क असेल. मात्र, लसनिर्मात्र्यांनी खुल्या बाजारात लसविक्री केल्यानंतर लसमात्रांची किंमत काय असेल, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वी उड्डाण :
  • नासाचे इनजेन्युइटी हेलिकॉप्टर सोमवारी मंगळावरील विरल वातावरणात यशस्वीरीत्या झेपावले. कुठल्याही परग्रहावर हेलिकॉप्टरचे हे पहिले नियंत्रित उड्डाण होते. ही एक मोठी कामगिरी मानली जात असून या कामगिरीला ‘राइट बंधू क्षण’ असे संबोधण्यात आले आहे.

  • चार पौंड म्हणजे १.८ किलो वजनाच्या इनजेन्युइटी हेलिकॉप्टरमध्ये १९०३ मधील राइट बंधूंच्या विमानाचे काही अवशेष ठेवण्यात आले होते. त्या काळात उत्तर कॅरोलिनात किटी हॉक येथे असाच इतिहास घडला होता. प्रकल्प व्यवस्थापक मिमी आँग यांनी सांगितले की, परग्रहावर आम्ही रोटो क्राफ्ट फिरवण्यात यश मिळवले आहे.

  • कॅलिफोर्नियातून हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे नियंत्रण करणाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर उडी मारावी तसे सुरुवातीला वर उचलले गेले. नंतर ते परसिव्हरन्स या रोव्हर गाडीपासून २०० फूट म्हणजे ६५ मीटर अंतरावर गेले. प्रत्यक्षात ते रोव्हर गाडीशी जोडलेले होते. त्यामुळे परत आल्यानंतर ते प्राचीन नदीच्या त्रिभुज प्रदेशात असलेल्या मूळ यानापासून फार दूर नाही. सदर हेलिकॉप्टर ८.५० कोटी डॉलर्सचे आहे.

  • श्रीमती मिमी आँग यांनी म्हटले आहे की, हे माझे खरे स्वप्न होते ते साकार झाले. आँग व त्यांच्या चमूने पृथ्वीपासून १.७८ कोटी मैल म्हणजे २.८७ कोटी किलोमीटर अंतरावरील हेलिकॉप्टर यशस्वी उडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. एक आठवड्यापूर्वी आज्ञावलीतील चुकीमुळे  हेलिकॉप्टर भरारी घेऊ शकले नव्हते. त्यानंतर तो दोष दुरुस्त करण्यात आला. 

  • हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर नियंत्रण कक्षात एकच जल्लोष झाला. सुरुवातीला या हेलिकॉप्टरची सावली असलेले कृष्णधवल छायाचित्र सामोरे आले नंतर हेलिकॉप्टर पुन्हा मंगळाच्या पृष्ठभागावर उतरत असतानाची रंगीत छायाचित्रे आली. नासाला यात ४० सेकंदांचे उड्डाण अपेक्षित होते त्यात ते १० फूट म्हणजे ३ मीटर उंच उडावे, ३० सेकंद त्याने घिरट्या माराव्यात असे अपेक्षित होते. या सर्व अपेक्षा या हेलिकॉप्टरने पूर्ण केल्या.

‘पूर्ण लॉकडाउन अशक्य’; न्यायालयाने आदेश देऊनही योगी सरकारचा लॉकडाउनसाठी नकार :
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाउन लागू करण्यास नकार दिला आहे.

  • करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभरासाठी लॉकडाउन लागू करावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिला होता.

  • उत्तर प्रदेश सरकारने सध्या तरी लॉकडाउन अशक्य असल्याचं म्हटलं आहे.

२० एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.