चालू घडामोडी आणि दिनविशेष - 19 एप्रिल 2023

Date : 19 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सूर्यकुमारनंतर हरमनप्रीत कौरने केली मोठी कामगिरी, १६ वर्षांनंतर मिळणार हा विशेष सन्मान
  • या दोन देशांमध्ये आयपीएलची जबरदस्त क्रेझ सुरू आहे आणि दररोज प्रत्येक सामन्यातील धडाकेबाज खेळी पाहण्यासाठी सर्व चाहते रोमांचित झाले आहेत. दरम्यान, चाहत्यांना आनंदाने उड्या मारण्याची संधी देणारी बातमी आली असून यामध्ये महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंची चर्चा झाली. तसेच, या खेळाडूने भारतीय महिला क्रिकेटच्या वतीने इतिहास रचला आहे, कारण पहिल्यांदाच महिला खेळाडूने विस्डेन क्रिकेट पुरस्काराच्या यादीत स्थान मिळवले आहे.

हरमनप्रीत कौरने इतिहास रचला, विस्डेनमध्ये नामांकन

  • भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही १८८९च्या परंपरेनुसार विस्डेन व्यवस्थापनाने निवडल्याप्रमाणे ‘विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर’ म्हणून नावाजलेली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीतील इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर त्यात न्यूझीलंडचे टॉम ब्लंडेल आणि डॅरिल मिशेल आणि त्यांच्यासोबत इंग्लंडचे बेन फोक्स आणि मॅथ्यू पॉट्स आहेत.
  • हरमनप्रीत कौरने या यादीत स्थान मिळवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॅंटरबरी येथे १११ चेंडूत १४३ धावांची तिची शानदार खेळी ज्यामुळे भारताला १९९९ नंतर इंग्लिश भूमीवर पहिली वन डे मालिका जिंकण्यात मदत झाली. हरमनप्रीतने बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारताचे नेतृत्व केले. सबमिट वर्ग सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

हरमनप्रीत कौरशिवाय ‘या’ महिला क्रिकेटपटूंचीही नावे समोर आली आहेत

  • यामध्ये हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त अनेक महिला क्रिकेटपटूंनी नामांकन मिळाले आहेत. विस्डेनच्या या यादीत ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेथ मुनीचा समावेश आहे, जिने गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा येथे आपले नाव नोंदवले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला ५०-षटकांच्या आणि २०- षटकांच्या दोन्ही स्पर्धांमध्ये विश्वचषक जिंकून देणारी तसेच २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळे त्यांचाही समावेश करण्यात आला.
‘अदानीं’वरील कर्जभारात २१ टक्के वाढ, आंतरराष्ट्रीय बँकांवर मदारही वाढली
  • अदानी समूहावरील कर्जाचा बोजा मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढला आहे. यात आंतरराष्ट्रीय बँकांच्या कर्जाचे प्रमाण वाढून एक तृतीयांश पातळीवर गेले आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिले आहे.
  • समूहाच्या निव्वळ कर्जाचे कंपन्यांच्या एकत्रित व्याज, कर व घसारापूर्व उत्पन्नाशी गुणोत्तर मागील आर्थिक वर्षांत ३.२ टक्के होते. हे प्रमाण सप्टेंबर २०१३ मध्ये नोंदवल्या गेलेल्या ७.६ टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय घसरले आहे. अदानी समूहातील प्रमुख सात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण कर्ज ३१ मार्चअखेर वार्षिक तुलनेत २०.७ टक्क्यांनी वाढून २.३ लाख कोटी रुपयांवर (२८ अब्ज डॉलर) पोहोचले आहे. समूहावरील कर्जाचा बोजा २०१९ पासून सातत्याने वाढत आहे आणि सध्या तो कमी करण्यासाठी समूहाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत. तथापि समूहाची कर्ज परतफेड करण्याची क्षमताही वाढल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते.
  • अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने वित्तपुरवठा आणि त्याचा स्रोत अर्थात कर्जदाते यात कशा पद्धतीने बदल केला, हे आकडेवारीतून स्पष्ट होते. समूहातील माहितगार सूत्रांनी दिलेली माहिती आणि गुंतवणूकदारांसमोर कंपन्यांनी केलेले सादरीकरण यातून ही मार्च २०२३ अखेरची ही आकडेवारी समोर आली आहे. अदानी समूहावरील कर्जामध्ये आंतरराष्ट्रीय बँकांच्या कर्जाचा वाटा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, अदानी समूहाच्या कर्जदात्यांच्या यादीत सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बँका ही वर्गवारीच नव्हती.
ब्रिटनमध्ये गुजराती लोकप्रतिनिधी गट स्थापण्यास भारतीयांचा विरोध
  • ब्रिटनमधील भारतीय समुदायाच्या अनेक संघटनांनी ब्रिटिश गुजरातींसाठी नवीन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी गट स्थापन करण्यावर आक्षेप घेणारी पत्रे प्रसृत केली आहेत. ‘हे पाऊल विभाजनकारी ठरू शकते,’ असा आक्षेप इतर भारतीय समुदायांनी घेतला आहे.’ ‘ब्रिटिश गुजराती ऑल पार्टी पार्लमेंटरी ग्रुप’ (एपीपीजी) या नावाने या नव्या गटाची नोंदणी करण्यात आली. त्याद्वारे ब्रिटिश गुजराती समुदायाच्या आर्थिक, आरोग्य, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा ब्रिटिश प्रतिनिधीगृहात मांडल्या जाव्यात. विशेषत: या समुदायासाठी आरोग्य सुविधा,
  • शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल याबाबतचे प्रश्न मांडण्यावर भर देण्यात यावा, या उद्देशाने हा गट स्थापण्यात आला आहे. ब्रिटिश प्रतिनिधीगृहांत अशा लोकप्रतिनिधी गटांना वेगळे स्थान नसते. मात्र हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी तयार केलेले अनौपचारिक गट असतात. विशिष्ट प्रदेश, विशिष्ट धोरणांत समान स्वारस्य असलेली मंडळी यात एकत्र येतात.
  • ब्रिटनमधील ‘फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल’ने (एफआयएसआय) या नव्या गटाच्या सदस्यांना गेल्या आठवडय़ात पाठवलेल्या पत्रात नमूद केले, की हे पाऊल विभाजनकारी आणि ब्रिटिश भारतीय समुदायाच्या हिताच्या विरुद्ध असल्याचे आमचे मत आहे. असा गट स्थापण्यामागे कोणतेही सयुक्तिक कारण आम्हाला समजू शकलेले नाही. कारण या गटाने उपस्थित केलेल्या चिंता इतर ब्रिटिश भारतीय समुदायाच्या समस्यांपेक्षा वेगळय़ा नाहीत. त्यामुळे सर्व भारतीयांच्या गटाद्वारे ‘एपीजीजी’च्या मागण्या मांडल्या जाऊ शकतात.
मुंबई इंडियन्सची हॅटट्रिक! हैदराबादवर 14 धावांनी रोमांचक विजय

 

  • राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या २५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा १४ धावांनी पराभव करत विजयाची हॅटट्रिक नोंदवली. हैदराबादसमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ १९.५ षटकांत १७८ धावांत सर्वबाद झाला. हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती, पण अर्जुन तेंडुलकरने केवळ ४ धावा दिल्या. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेटही घेतली. २०व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर त्याने भुवनेश्वर कुमारला कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
  • हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक ४८ तर हेनरिक क्लासेनने १६ चेंडूत ३६ धावांची स्फोटक खेळी केली. तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने कॅमेरून ग्रीनच्या ६४ आणि इशान किशनच्या ३८ धावांच्या जोरावर ५ गडी गमावून १९२ धावा केल्या.

सनरायझर्स हैदराबादचा डाव -

  • १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. त्यांनी अवघ्या ११ धावांवर पहिली विकेट गमावली. गेल्या सामन्यातील शतकवीर हॅरी ब्रूक ९ धावा करून बाद झाला. बेहरेनडॉर्फने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. लवकरच हैदराबादला आणखी एक धक्का बसला जेव्हा राहुल त्रिपाठी ७ धावा करून बेहरेनडॉर्फच्या चेंडूवर ईशान किशनकरवी झेलबाद झाला.
  • मयंक अग्रवाल आणि मार्कराम यांनी तिसर्‍या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या, परंतु २२ च्या वैयक्तिक धावसंख्येवर तो ग्रीनच्या चेंडूवर हृतिक शोकीनकरवी झेलबाद झाला. अभिषेक शर्माही लगेट १ धावा काढून बाद झाला. परंतु क्लासेन आणि अग्रवाल यांनी ५व्या विकेटसाठी झटपट ५५ धावा जोडून हैदराबादला सामन्यात ठेवले होते. क्लासेनने १६ चेंडूत ३६ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याला पियुष चावलाने बाद केले.

 

ला रोडा बुद्धिबळ स्पर्धा - भारताच्या गुकेशला अजिंक्यपद :
  • भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने स्पेन येथे झालेल्या ४८व्या ‘ला रोडा’आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

  • १५ वर्षीय गुकेशने नऊ फेऱ्यांमध्ये अपराजित राहताना एकूण आठ गुणांसह ही स्पर्धा जिंकली. गुकेशला सात सामने जिंकण्यात यश आले, तर त्याचे दोन सामने बरोबरीत सुटले. त्याने अखेरच्या फेरीत इस्राइलच्या व्हिक्टर मिखालेव्स्कीवर मात करत अग्रस्थान मिळवले. दुसऱ्या स्थानावरील अर्मेनियाच्या हेक मार्तिरोस्यानच्या खात्यावर ७.५ गुण होते. गुकेशने या स्पर्धेत मिखालेव्स्कीसह अल्बेर्तो हर्नाडेझ रॅमोस, डॅनिएल रोमेरो पलारेस, हाविएर बेर्नाबेऊ लोपेझ कार्लोस, जॉर्ज रेन्टेरिया आणि नाहुल गवारेते यांना पराभूत केले.

  • गुकेशचा सहकारी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेअंती प्रज्ञानंदसह अन्य चार खेळाडूंचे सात गुण होते. मात्र, टायब्रेकमधील सरस गुणांच्या बळावर प्रज्ञानंदला तिसरे स्थान मिळाले. सहाव्या फेरीत प्रज्ञानंद आणि गुकेश आमनेसामने आले होते. या सामन्यात प्रज्ञानंदला विजयाची संधी होती. मात्र, गुकेशने दमदार पुनरागमन केल्यामुळे ४१ चालींअंती हा सामना बरोबरीत सुटला. प्रज्ञानंदने अखेरच्या फेरीत हेक मार्तिरोस्यानवर २६ चालींमध्ये विजय मिळवला. गुकेशप्रमाणचे प्रज्ञानंदही या स्पर्धेत अपराजित राहिला.

ऑलिम्पियाड युवकांसाठी सुवर्णसंधी -आनंद

  • चेन्नई : भारतात होणाऱ्या ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत युवकांना आपले आदर्श असलेल्या खेळाडूंचा खेळ पाहता येईल. ही युवकांसाठी सुवर्णसंधी असेल, असे मत भारताचा पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंदने व्यक्त केले. यंदा प्रतिष्ठेची बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा चेन्नईमध्ये २८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. आता या स्पर्धेला १०० दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

श्रीलंकेत १७ सदस्यांच्या नव्या मंत्रिमंडळाची नियुक्ती :
  • श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी सोमवारी १७ सदस्यांच्या नव्या मंत्रिमंडळाची नियुक्ती केली. पंतप्रधान महिंदराजपक्षे वगळता अध्यक्षांच्या इतर जवळच्या नातेवाईकांना या मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. देशाला भेडसावणाऱ्या आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटामुळे अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांनी ‘व्यवस्था परिवर्तनाचे’ (सिस्टीम चेंज) आवाहन केले.

  • देशव्यापी आणीबाणी व संचारबंदी यांचे उल्लंघन करून हजारो लोक सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरल्यानंतर, या महिन्याच्या सुरुवातीला अध्यक्ष गोताबया व त्यांचे मोठे भाऊ पंतप्रधान महिंदवगळता श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला होता.

  • अध्यक्षांना विरोधी पक्षांच्या सदस्यांसह सहमतीचे सरकार स्थापन करता यावे यासाठी पूर्वीच्या मंत्रिमंडळाने मार्ग मोकळा करून दिला होता. तथापि, विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.

  • ७२ वर्षांचे राजपक्षे यांनी सोमवारी १७ सदस्यीय मंत्रिमंडळाला शपथ दिली. तीन मंत्र्यांची त्यांनी याआधीच नियुक्ती केली होती.

  • यापूर्वीच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री राजपक्षे कुटुंबातील ज्येष्ठतम सदस्य चामल राजपक्षे व महिंदूा यांचे पुत्र नमल राजपक्षे, तसेच राज्यमंत्री असलेले पुतणे शशींद्र यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्कर प्रमुख, ३० एप्रिलला जनरल नरवणेंकडून पदभार स्वीकारणार :
  • लेफ्टनंट जनरल मनोज पांडे ( Lieutenant General Manoj Pande ) यांचे नाव देशाच्या नव्या लष्कर प्रमुख पदी निश्चित करण्यात आलं आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज ( General Manoj Mukund Naravane ) नरवणे हे येत्या ३० एप्रिलला निवृत्त होत आहेत. नवी दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात मनोज पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या श्रेणीत मनोज पांडे हे नरवणे यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.

  • विशेष म्हणजे ‘इंजिनीयर कोर’मधील मनोज पांडे पहिले अधिकारी आहेत जे लष्कर प्रमुख पदी विराजमान होणार आहेत. पांडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे स्नातक असून ते इंजिनीयर कोरमध्ये १९८२ला सेवेत दाखल झाले होते. डिसेंबर २००१ ला संसदेवरील हल्ल्यानंतर लष्कराने ऑपरेशन पराक्रम ( Operation Parakram ) ही मोहिम राबवली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सशस्त्र सैन्य हे पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात आले होते. तेव्हा जम्मूमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या पल्लनवाला भागात इंजिनीयरच्या तुकडीचे नेतृत्व पांडे यांनी केले होते.

  • जनरल नरवणे हे निवृत्त होत असले तरी त्यांचे नाव हे संरक्षण दल प्रमुख (Chief of Defence Staff )पदासाठी चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाल्याने ते पद रिक्त आहे. तेव्हा नरवणे निवृत्त होतांना संरक्षण दल प्रमुख पदाबाबतही काय निर्णय होणे अपेक्षित आहे.

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार; मार्चमध्ये घाऊक महागाई दर १४.५५ टक्क्यांवर :
  • पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस सुरू असलेल्या वाढीमुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. मार्च महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर १४.५५ टक्के इतका वाढला असून, हा महागाईचा उच्चांकी स्तर असल्याचं सांगितलं जात आहे. या अगोदर फेब्रुवारीत हा दर १३.११ टक्के इतका होता. पेट्रोल-डिझेल, सीएनजी, घरगुती गॅस, भाजीपाला, दूध आदींसह खाद्यान्न व दररोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमतीत वाढ झालेली असल्याने किरकोळ तसेच घाऊक बाजारात महागाईचा दर प्रचंड वाढल्याचे दिसत आहे.

  • मार्च २०२१ मध्ये महागाई दर ७.८९ टक्के होता. जो की आता दुप्पट झाल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने मार्च २०२२ या महिन्याची महागाईची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर १४.५५ टक्के इतका असून, किरकोळ महागाई दर ६.९५ टक्के झाला आहे जो की मागील १७ महिन्यातील सर्वाधिक आहे.

  • मार्चमध्ये खाद्यपदार्थांचा घाऊक महागाई दर ८.४७ टक्क्यांवरून ८.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्राथमिक वस्तूंच्या घाऊक महागाईचा दर फेब्रुवारीमधील १३.३९ टक्क्यांवरून १५.५४ टक्के झाला आहे. याचबरोबर इंधन आणि उर्जेच्या घाऊक महागाईचा दर फेब्रुवारीमधील ३१.५० टक्क्यांवरून ३४.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

  • उद्योग विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मधील महागाईचा उच्च दर मुख्यत्वे कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल, बेस मेटल्सच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे आहे. रशिया-युक्रेन तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती, याचा देखील परिणाम आहे.

मॉंटे कार्लो टेनिस स्पर्धा - त्सित्सिपासला दुसऱ्यांदा जेतेपद :
  • ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने सलग दुसऱ्यांदा मॉंटे कार्लो मास्टर्स टेनिसचे जेतेपद मिळवले. त्याने अंतिम सामन्यात स्पेनच्या बिनमानांकित अलेहान्द्रो डेव्हिडोव्हिचला ६-३, ७-६ (३) असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

  • मॉंटे कार्लो स्पर्धा दोन वेळा जिंकणारा त्सित्सिपास हा राफेल नदालनंतरचा पहिलाच खेळाडू ठरला. अंतिम सामन्याचा पहिला सेट त्सित्सिपासने मोठय़ा फरकाने जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्ये डेव्हिडोव्हिचने त्याला चांगली झुंज दिली. मात्र, त्याने टायब्रेकरमध्ये सेट जिंकत सामनाही जिंकला.

१९ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.