चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जून २०२१

Updated On : Jun 17, 2021 | Category : Current Affairs


डीएपी खतावरील अनुदानात १४,७७५ कोटी रुपयांनी वाढ :
 • खतांच्या किमती वाढत असल्या, तरी शेतकऱ्यांवर त्यांचा बोजा पडू नये यासाठी डीएपीसह इतर काही खतांवरील अनुदानात केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी १४,७७५ कोटी रुपयांनी वाढ केली.

 • युरियानंतर, डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) हे देशात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे खत आहे. डीएपी खतावरील अनुदान १४० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्राने गेल्या महिन्यात घेतला होता.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी डीएपी खतावरील अनुदानात वाढ करण्यास आर्थिक व्यवहारांबाबतच्या मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली असल्याचे रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

खुद्द गुगलचे सीईओ सुंदर पिचई सरप्राईज देतात तेव्हा :
 • जगभरात ८० टक्क्यांहून जास्त नेटिझन्स ज्या सर्ज इंजिनचा वापर करतात, त्या गुगलचे सीईओ म्हणजे सुंदर पिचई! गुगलचा एकूणच पसारा बघता सुंदर पिचई त्यांच्या रोजच्या जीवनात किती बिझी असतील, याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. पण त्यातूनही सुंदर पिचई जेव्हा एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीला सरप्राईज देतात, तेव्हा त्या व्यक्तीसाठी ती एखाद्या अकल्पित स्वप्नासारखीच गोष्ट ठरते!

 • अमेरिकेच्या केंटुकी भागातल्या लेक्झिंग्टनमधल्या मायलो गोल्डिंग याच्यासाठी हे असंच एक अकल्पित आणि स्वप्नवत सरप्राईज ठरलं, जेव्हा खुद्द सुंदर पिचई यांनीच थेट मायलोला व्हिडीओ कॉल केला होता! तोही एक गुड न्यूज देण्यासाठी!

 • गुगलतर्फे दरवर्षी Doodle for Google स्पर्धा घेतली जाते. यामधील विजेत्याचे डूडल गुगलतर्फे त्यांच्या होमपेजवर दिले जाते. दरवर्षी या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या संकल्पना (थीम) ठेवल्या जातात. या वर्षी स्पर्धेसाठी ‘I am strong because…’ अर्थात ‘मी सक्षम आहे कारण…’ अशी थीम ठेवण्यात आली होती. या वर्षी केंटकीच्या मायलो गोल्डिंगनं तयार केलेल्या डूडलची निवड करण्यात आली. मात्र, हे मायलो गोल्डिंगला नेहमीच्या पद्धतीने कळवण्याऐवजी सुंदर पिचई यांनी वेगळाच मार्ग निवडला!

CBSE बारावीच्या निकालासाठी ३०:३०:४० फॉर्म्युला वापरण्याची शक्यता! जाणून घ्या कसा लागेल निकाल :
 • १ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे देशभरातील CBSE बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र परीक्षा रद्द झाल्यानंतर आता विद्यार्थी उत्सुकतेने त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत.

 • मात्र परीक्षेचा निकाल कोणत्या आधारावर लावला जाईल, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) दहावी, अकरावीच्या अंतिम परीक्षा गुणांच्या आणि १२वीच्या पूर्व बोर्डाच्या गुणांच्या आधारे निकाल तयार करू शकेल, अशी चर्चा माध्यमांमध्ये आहे.

 • काय आहे ३०:३०:४० फॉर्म्युला - सीबीएसईने नियुक्त केलेली १३ सदस्यीय समिती बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी ३०:३०:४० फॉर्म्युलाचा बाजूने आहे. म्हणजेच दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास ३०% वेटेज दिले जाईल. इयत्ता १२ वीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला ४०% वेटेज दिले जाईल.

 • १७ जूनला न्यायालयात सादर करणार फॉर्म्युला - हा फॉर्म्युला सीबीएसईने नियुक्त केलेली समिती १७ जून २०२१ ला सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर घोषित करण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात करोनामुळे परीक्षा रद्द करा, अशी जनहित याचीका पालकांनी न्यायालयात केला होती. त्यानंतर सीबीएसईने १ जूनला बारावीची परीक्षा रद्द केली होती, यानंतर अनेक राज्यांनी परीक्षा रद्द केली.

फ्रान्सच्या कंपनीकडून औरंगाबादमध्ये जैवऊर्जेत गुंतवणुकीचे संकेत :
 • औरंगाबाद येथे जैव ऊर्जाक्षेत्रात गुंतवणूक करण्यास फ्रान्स येथील टोटल एनर्जीज ही कंपनी तयार असल्याचे संकेत बुधवारी महापालिकेला मिळाले. ही कंपनी तेल क्षेत्रातही काम करत असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळू शकेल काय, याची चाचपणी केली जात असून तशी चर्चा दृकश्राव्यसंवाद माध्यमातून झाल्याचे सांगण्यात आले.

 • औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त व प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय, औरंगाबाद स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, टोटल एनर्जीजचे ज्यूल डिऔर, अदानीचे ग्रीन एनर्जी लिमिटेडचे प्रताप मोंगा आणि इन्व्हेस्ट इंडियाचे वेदांत राज यांची या बैठकीस उपस्थिती होती. या निमित्ताने औरंगाबाद-फ्रान्सच्या ऐतिहासिक संबंधांना पुन्हा उजाळा देण्यात आला.

 • औरंगाबाद हे आता ग्रामीण व शहरी जोडणी सुलभ करते. बराचसा भाग पशुधनावर अवलंबून असल्याने जैव ऊर्जेला येथे वाव असल्याचेही सांगण्यात आले. जैव ऊर्जा उत्पादनासाठी पेंढा व इतर जैव कचरा हा शेतातील अवशेष कच्चा माल म्हणून वापरता येतील, असे तिवारी म्हणाले. नवी गुंतवणूक येऊ शकते असे संकेत आता मिळू लागले आहेत.

Copa America - ब्राझिलसमोर पेरूचे आव्हान :
 • गतविजेत्या ब्राझिलने यंदाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेला दमदार विजयासह प्रारंभ केला. मात्र शुक्रवारी पहाटे होणाऱ्या ‘ब’ गटातील पेरू संघाविरुद्धच्या लढतीत त्यांना विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागू शकतो.

 • नेयमारच्या चमकदार कामगिरीमुळे ब्राझिलने पहिल्या सामन्यात व्हेनेझुएलावर ३-० असे वर्चस्व गाजवले. दुसरीकडे पेरूचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. यजमान ब्राझिलने २०१९मध्ये अंतिम फेरीत पेरूला ३-१ नमवून विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे पेरू संघ त्या पराभवाचा वचपा काढणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

 • गेल्या पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी पेरूला एकच लढत जिंकता आल्याने त्यांच्यावर कामगिरी उंचावण्याचेही दडपण असेल. तत्पूर्वी, गुरुवारी मध्यरात्री कोलंबिया आणि व्हेनेझुएला आमनेसामने येतील. कोलंबियाने पहिल्या लढतीत इक्वाडोरला १-० असे नमवले. तर व्हेनेझुएला स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.

१७ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)