चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जून २०२०

Date : 17 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत विरुद्ध चीन: सीमेवर झालेल्या हिंसेबद्दल संयुक्त राष्ट्र संघाची पहिली प्रतिक्रिया : 
  • संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीनदरम्यान उसळलेल्या अभूतपूर्वी संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम ठेवावा असं आवाहन गुतारेस यांनी केलं आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात अचानक उसळलेल्या अभूतपूर्व संघर्षांमध्ये चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.

  • भारताचेही २० जवान शहीद झाले असून, यात भारताच्या कर्नल हुद्दय़ाच्या लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे. चीनच्या सीमेवर अशा प्रकारे भारतीय जवान शहीद होण्याची अशी घटना १९७५नंतर प्रथमच घडली आहे. भारत आणि चीन दोन्ही बाजूच्या सैन्याची जिवीतहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

  • भारतीय लष्कराने जारी केलेल्या माहितीनुसार पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान ठार अथवा जखमी झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांना प्राण गमावावा लागल्याने गुतारेस यांनी दुख: व्यक्त केलं आहे. गुतारेस यांचे प्रवक्त्यांनी मंगळवारी रात्री उशीरा एक पत्रक जारी केलं.

भारत विरुद्ध चीन: कोणाकडे किती विमाने, रणगाडे, जहाजे आणि पाणबुड्या :
  • प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात अचानक उसळलेल्या अभूतपूर्व संघर्षांमध्ये चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. भारताचेही २० जवान शहीद झाले असून, यात भारताच्या कर्नल हुद्दय़ाच्या लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी नवी दिल्लीत अत्युच्च पातळीवर रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या.

  • एकीकडे यासंदर्भात उच्च स्तरांवर चर्चेचा प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे चीनच्या सीमेवर अशा प्रकारे भारतीय जवान शहीद होण्याची अशी घटना १९७५ नंतर प्रथमच घडली आहे. त्यामुळेच दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर युद्धांच्या जोरदार चर्चा सोशल मिडियावर सुरु झाल्या आहेत.

  • मात्र खरोखरच दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर काय होईल? कोणत्या देशाकडे जास्त सैन्य आहे?, कोणता देश समुद्रातून हल्ला करण्यासाठी जास्त शक्तीशाली आहे? या आणि अशा अनेक प्रश्नासंदर्भात सोशल मिडियावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत आणि चीनचे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची केलेली ही तुलना…

ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन अवास्तव -एडिंग्स :
  • करोनाच्या पाश्र्नभूमीवर यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अवास्तव वाटते, असे भाकीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष एर्ल एडिंग्स यांनी वर्तवले.

  • ‘‘नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विश्वचषकाचे आयोजन होणे मला तरी अशक्य वाटते. अद्यापही अनेक देशात करोनाग्रस्तांच्या संख्येचे प्रमाण वाढतच असून पुढील २-३ महिन्यांत अचानक सर्वकाही सुरळीत होईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. अशा परिस्थितीत १६ संघांतील खेळाडूंना ऑस्ट्रेलियात आणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे फार आव्हानात्मक असेल,’’ असे एडिंग्स म्हणाले.

  • त्याशिवाय विश्वचषक रद्द झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ‘आयपीएल’चे आयोजन करण्यास इच्छुक असल्यास ऑस्ट्रेलियाचे खेळाडू नक्कीच ‘आयपीएल’ खेळतील, असेही एडिंग्ज यांनी सांगितले.

१७ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.