चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ ऑक्टोबर २०२०

Date : 16 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्तानला चर्चेसाठी कोणताही संदेश पाठविला नाही -परराष्ट्र मंत्रालय :
  • पाकिस्तानशी चर्चा करण्याची भारताची इच्छा आहे असा संदेश भारताने पाठविल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने केला. त्याचे भारताने गुरुवारी जोरदार खंडन केले.

  • अशा प्रकारचा कोणताही संदेश भारताने पाठविलेला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

  • इम्रान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी वरील दावा एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केला होता त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीवास्तव यांनी त्याचे खंडन केले.

जम्मू, काश्मीर, लडाख हे भारताचे अंतर्गत भाग :
  • जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि कायम राहतील, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले आणि चीनला भारताच्या अंतर्गत बाबींसंदर्भात भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही भारताने ठणकावले.

  • लडाख या केंद्रशासित प्रदेशाला त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश या राज्याला आमची मान्यता नसल्याचे चीनने म्हटले होते त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी वरील बाब स्पष्ट केली.

  • जम्मू, काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अंतर्गत भाग होते, आहेत आणि काम राहतील ही भारताची स्पष्ट आणि कायम भूमिका आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.

किर्गिझस्तानच्या अध्यक्षांचा राजीनामा :
  • वादग्रस्त संसदीय निवडणुकीनंतर देशात उसळलेला क्षोभ संपुष्टात आणण्याचा प्रयत्न म्हणून किर्गिझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकॉव्ह यांनी गुरुवारी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

  • राजकीय प्रतिस्पर्धी आणि निदर्शकांकडून जीनबेकॉव्ह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, किर्गिझस्तानात शांतता प्रस्थापित होणे, देशाची एकात्मता, जनतेचे ऐक्य आणि सामाजिक शांतता सर्वाहून महत्त्वाची आहे, सत्ता नव्हे असे जीनबेकॉव्ह यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनामध्ये म्हटले आहे.

  • सरकार समर्थक पक्षांनी ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत बाजी मारली असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर देशात क्षोभ उसळला. मतांची खरेदी आणि अन्य गैरप्रकार निवडणुकीत करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.

  • त्यानंतर निदर्शकांनी सरकारी इमारतींवर कब्जा केला, काही कार्यालये लुटण्यात आली. त्यानंतर मध्यवर्ती निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली. त्यानंतर विरोधकांनी जीनबेकॉव्ह यांना हटविण्याची आणि नवे सरकार स्थापन करण्याची योजना जाहीर केली.

लस संशोधन आणि वितरणाचा पंतप्रधानांकडून आढावा :
  • करोना प्रतिबंधक लशींच्या संशोधनाची प्रगती आणि संभाव्य लशींच्या वितरण व लसीकरणाची तयारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा घेतला. देशभर लशींच्या वाटपात सूत्रीकरण ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या समित्या आराखडा तयार करत असून त्याची माहिती मोदींनी बैठकीत घेतली.

  • पुढील वर्षांच्या सुरुवातीला लस बाजारात उपलब्ध होऊ  शकेल, असा अंदाज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केला होता. शिवाय, देशभर लशींचे वितरण कसे केले जाईल, शीतकोठारांमध्ये त्यांच्या साठवणुकीची व्यवस्था कशी असेल, प्रधान्यक्रम काय असतील, यावर लक्ष केंद्रित केल्याचेही सांगितले होते. लशी शीतकोठारांमध्ये साठवणे महत्त्वाचे असून गावपातळीवर लस पोहोचवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या शीतकोठारांचे आरेखन केले जात आहे. त्यानंतर किती अतिरिक्त शीतकोठारांची गरज लागेल हे निश्चित केले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती मोदींनी घेतली.

  • या बैठकीला हर्षवर्धन यांच्यासह निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल उपस्थित होते. लस विकसित करण्यासाठी आवश्यक सर्व मदत केंद्राकडून दिली जाईल, असेही मोदींनी स्पष्ट केले. लशींचे वितरण-वाटप आणि लसीकरण यांचे नियमन करणेही गरजेचे असेल. त्या दृष्टीने नियामक क्षेत्रातील सुधारणांकडेही लक्ष द्यावे लागेल अशीही सूचना मोदींनी केली. संभाव्य यशस्वी लसींची निर्मिती झाल्यानंतर लसखरेदीची प्रक्रिया हा सर्वाधिक महत्त्वाचा भाग असेल. त्या दृष्टीने कोणती तयारी केली जात आहे, याचीही माहिती पंतप्रधानांनी घेतली.

१६ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.