चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जून २०२१

Date : 15 June, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार :
  • ऑनलाइन व ऑफलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या जी ७ देश व अतिथी देशांच्या निवेदनावर  भारताने रविवारी स्वाक्षरी केली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन स्वातंत्र्यामुळे लोकशाहीचे रक्षण होत असते तसचे लोकांना भय व दडपशाहीपासून मुक्तता मिळत असते, असे या निवेदनात म्हटले आहे. जी ७ देशांनी सादर केलेल्या चीन विरोधातील मानवी हक्क व मूलभूत स्वातंत्र्ये या निवेदनावर भारताने व निमंत्रित देशांनी स्वाक्षरी केली नाही.

  • राजकीय हेतूने प्रेरित होऊन इंटरनेट बंद करण्याच्या प्रकारांना यात विरोध करण्यात आला असून त्यापासून देशाचे स्वातंत्र्य व लोकशाहीला धोका असल्याचे म्हटले आहे. दी ओपन सोसायटीज स्टेटमेंट हे निवेदन जी ७ बैठकीच्या अखेरीस संमतीसाठी मांडण्यात  आले.

  • आभासी पद्धतीने या बैठकीत सहभागी होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, लोकशाही व स्वातंत्र्य हे भारतीय संस्कृतीचे घटक आहेत. खुले समाज हे काही वेळा गैर माहिती व सायबर हल्लय़ांना बळी पडू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, मोदी यांनी सायबर क्षेत्र  हे लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी महत्त्वाचे राहिले पाहिजे त्याचा गैरवापर होता कामा नये असे मत व्यक्त केले. भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांनी या निवेदनाला मान्यता दिली आहेत.

देशात आता करोनाचा  ‘डेल्टा प्लस’ विषाणू :
  • भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या करोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा  नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे.

  • डेल्टा प्लस अर्थात एवाय.१ हा करोनाचा विषाणू भारतात सध्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे त्याची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या नव्या प्रकारामुळे करोनाची लागण कितपत तीव्र असू शकते, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, हा प्रकार मोनोक्लोनल प्रतिपिंड मिश्रण या करोनावरील उपचारांना दाद देत नाही. भारतामध्ये अलीकडे याच उपचारपद्धतीला मान्यता देण्यात आलेली आहे.

  • दिल्लीतील सीएसआयआर-इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अ‍ॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) संस्थेचे शास्त्रज्ञ यांनी रविवारी याबाबत ट्वीट केले आहे. करोनाना हा नवा विषाणू  के४१७ एन उत्परिवर्तनातून तयार झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नवे उत्परिवर्तन हे सार्स-कोव्ही-२ च्या स्पाईक प्रोटीनमधील बदलाने झाले आहे. हे प्रथिन विषाणूला मानवी पेशीत शिरकाव करण्यासाठी मदत करते.

  • ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ने दिलेल्या माहितीनुसार, डेल्टामध्ये (बी.१.६१७.२) के४१७ एन उत्परिवर्तन झालेले ६३ जिनोम आतापर्यंत दिसून आले आहेत.

‘बीसीसीआय’ची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक :
  • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक ठरवण्यासाठी तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांची मुंबईत या आठवडय़ात बैठक होणार आहे.

  • सद्यपरिस्थितीचा आढावा घेत ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी पोषक वातावरण आहे की नाही, यावरही चर्चा केली जाणार आहे.

  • ‘आयसीसी’ने विश्वचषकाच्या आयोजनाविषयीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ला २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे.  या बैठकीत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा ठरवण्याविषयी तसेच परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेविषयी चर्चा करण्यात येईल.

देशात लसीकरणानंतर ४८८ जणांचा मृत्यू; तर २६ हजार २०० जणांमध्ये दिसले गंभीर :
  • करोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सरकारी माहितीच्या आधारे सीएनएन न्यूज १८ ने दिलेल्या आखडेवारीनुसार देशात लसीकरणामुळे आतापर्यंत ४८८ जणांचा मृत्यू झालाय. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत.

  • वैज्ञानिक भाषेमध्ये अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला अ‍ॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंगी इम्यूनायझेशन म्हणजेच एईएफआय असं म्हटलं जातं. लसीकरण मोहीम हाती घेणाऱ्या प्रत्येक देशामध्ये अशाप्रकारची आकडेवारी गोळा केली जाते. भविष्यामध्ये लसीकरणाचा दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावा यासाठी ही आकडेवारी गोळा केली जाते. ही आकडेवारी १६ जानेवारी ते ७ जून दरम्यानची आहे.

  • आकडेवारी पाहिल्यास लसीकरणामुळे मृत्यू झालेल्याचं प्रमाणात फारच कमी आहे. देशामध्ये ७ जूनपर्यंत २३ कोटी ५० लाख जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये एईएफआयची एकूण २६ हजार २०० प्रकरणं समोर आली आहेत. म्हणजेच टक्केवारीत सांगायचं झालं तर केवळ ०.०१ टक्के लोकांना लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेत.

  • आणखीन सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर १४३ दिवसांच्या कालावधीमध्ये लस घेणाऱ्या प्रत्येक १० हजार जणांमागे केवळ एका व्यक्तीला लसींचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेत. तर लस घेणाऱ्या प्रत्येक १० लाख लोकांमागे दोन जणांचा मृत्यू झालाय.

१५ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.