चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ सप्टेंबर २०२२

Date : 14 September, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बॅडिमटन क्रमवारीत प्रणॉय १६व्या स्थानी :
  • सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारताचा बॅडिमटनपटू एच.एस. प्रणॉयने जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी मजल मारली आहे. प्रणॉयच्या क्रमवारीत दोन क्रमांकांनी सुधारणा झाली आहे. किदम्बी श्रीकांतचेही स्थान दोन क्रमांकांनी सुधारले असून, तो आता १२व्या स्थानावर आला आहे. पहिल्या १० जणांमध्ये केवळ लक्ष्य सेनला स्थान मिळाले आहे. तो नवव्या स्थानावर आहे.

  • जागतिक अजिंक्यपद आणि जपान खुल्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतरही पी. व्ही. सिंधूने ताज्या क्रमवारीत सातवे स्थान टिकवले आहे. लंडन ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालने तीन स्थानांनी आगेकूच करीत ३०व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. दुहेरीत राष्ट्रकुल विजेतेपदानंतर चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी यांचे आठवे स्थान कायम राहिले आहे.

  • महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-एन, सिक्की रेड्डी २८व्या स्थानावर आहेत. मिश्र दुहेरीत तनिशा क्रॅस्टो-इशान भटनागर ३३व्या स्थानावर असून, कारकीर्दीतील ही त्यांची सर्वोत्तम क्रमवारीतील कामगिरी आहे.

‘बीसीसीआय’ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळासंदर्भात आज सुनावणी :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळ निश्चित करण्यावरून प्रलंबित असलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  • ‘बीसीसीआय’ने घटनादुरुस्तीची परवानगी मागताना पदाधिकाऱ्यांच्या स्थगित कार्यकाळाची (कूिलग ऑफ पिरेड) अट रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा संबंधित राज्य संघटनांमधील सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांना घटनेनुसार ‘बीसीसीआय’मधील पदांवर कायम राहता येणार नाही. त्यामुळेच स्थगित कार्यकाळाची अट रद्द करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची परवानगी ‘बीसीसीआय’ने मागितली आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

महाराणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रांगा ; पार्थिव एडिनबरा येथून लंडनला विमानाने नेणार, १९ सप्टेंबरला अंत्यसंस्कार :

 

  • ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव मंगळवारी स्कॉटलंडमधील एडिनबरा येथून लंडनला नेण्यात येणार आहे. दरम्यान, महाराणींना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी जमली होती.

  • सोमवारी, राणीची चारही मुले – राजे चार्ल्स तिसरे, प्रिन्सेस अ‍ॅन, प्रिन्स अँडर्य़ू आणि प्रिन्स एडवर्ड यांच्या उपस्थितीत महाराणींचे पार्थिव एडिनबरामधील सेंट गिल्स चर्चमध्ये नेण्यात आले.

  • सोमवारी एडिनबराच्या रस्त्यावरून निघालेल्या अंत्ययात्रेत राजघराण्यातील ही सर्व शोकाकुल भावंडे सहभागी झाली होती. या वेळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी चर्चबाहेर मोठय़ा संख्येने नागरिक जमले होते.

  • लंडनमध्ये राणीचे पार्थिव आणले जाणार आहे. तेथे नागरिकांना बुधवारपासून श्रद्धांजली वाहता येईल. मात्र, सोमवारपासूनच वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेच्या बाहेर नागरिकांनी रांगा लावल्या. श्रीलंकन वंशाच्या ५६ वर्षीय व्हेनेसा नाथकुमारन या रांगेतील पहिली व्यक्ती होती. त्यांचे कुटुंब राजघराण्याचे चाहते आहे. महाराणींचे पार्थिव मंगळवारी संध्याकाळी ‘रॉयल एअरफोर्स’च्या (आरएएफ) विमानाने एडिनबराहून लंडनला नेण्यात येईल. परंपरेनुसार, किंग चार्ल्स तिसरे आणि त्यांची पत्नी राणी कन्सोर्ट कॅमिला उत्तर आर्यलडच्या शोक दौऱ्यावरून परतल्यानंतर लंडनमध्ये महाराणींच्या पार्थिवास अभिवादन करतील. त्यानंतर पार्थिव रात्रभर बकिंगहॅम पॅलेसच्या ‘बो रूम’मध्ये ठेवण्यात येईल, जिथे शाही कुटुंबातील सदस्य तिला श्रद्धांजली वाहतील.

कोहिनूर हिरा जगन्नाथ देवस्थानाचा! ; ओडिशातील संस्थेचा दावा; ब्रिटनमधून परत आणण्यासाठी राष्ट्रपतींकडे मध्यस्थीची मागणी :
  • ओडिशातील एका सामाजिक-सांस्कृतिक संस्थेने कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा म्हणजे देवस्थानचा असल्याचा दावा केला आहे. ब्रिटनमधून ऐतिहासिक पुरी मंदिरात तो परत आणण्यासाठी संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र चार्ल्स राजे बनले आहेत. परंपरेनुसार, १०५ कॅरेटचा हा अतिमूल्यवान हिरा त्यांच्या पत्नी क्वीन कन्सोर्ट कॅमिला यांच्याकडे जाईल.

  • पुरीस्थित श्री जगन्नाथ सेनेने राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात कोहिनूर हिरा हा पुरी येथील बाराव्या शतकातील मंदिरात परत आणण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

  • श्री जगन्नाथ सेनेचे निमंत्रक प्रियदर्शन पटनायक यांनी निवेदनात नमूद केले, की कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा आहे. आता तो इंग्लंडच्या राणीकडे आहे. कृपया आपण पंतप्रधानांना हा हिरा भारतात आणण्यासाठी पावले उचलण्याची विनंती करावी. कारण महाराजा रणजितसिंह यांनी कोहिनूर भगवान जगन्नाथास समर्पित केला होता.

  • अफगाणिस्तानच्या नादिरशाहविरुद्धच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर पंजाबचे महाराजा रणजितसिंह यांनी भगवान जगन्नाथांना हा हिरा समर्पित केला होता, असा दावा पटनायक यांनी केला. इतिहासकार आणि संशोधक अनिल धीर यांनी सांगितले, की मात्र, त्यावेळी हा हिरा लगेच मंदिराला सुपूर्द करण्यात आला नाही आणि रणजितसिंह यांचा १८३९ मध्ये मृत्यू झाला आणि ब्रिटिशांनी दहा वर्षांनंतर हा हिरा जगन्नाथ देवस्थानला देण्यात आल्याचे ठाऊक असताना रणजितसिंह यांचे पुत्र मुलगा दुलीप सिंह यांच्याकडून जबरदस्तीने घेतला.

१४ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.