चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ नोव्हेंबर २०२१

Date : 14 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बुद्धिबळाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची प्रेरणा :
  • ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, महिला क्रिकेट कर्णधार मिताली राज आणि पदकविजेते ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकपटू अशा एकूण १२ क्रीडापटूंना शनिवारी राष्ट्रपती रामनाथ र्कोंवद यांच्या हस्ते देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनामधील दरबार सभागृहात झालेल्या शानदार समारंभात ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, जागतिक स्पर्धा गाजवणाऱ्या क्रीडापटूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू या कार्यक्रमाला उपस्थित होते.

  • महाराष्ट्रातील ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने, तर मल्लखांबपटू हिमानी परबला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी व्यक्त केलेले मनोगत-

  • यंदा ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराचा मानकरी ठरल्याबद्दल खूप आनंद झाला आहे. मागील ३५ वर्षे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून केलेले काम तसेच बुद्धिबळाच्या प्रसारासाठी सामाजिक उपक्रमांत घेतलेल्या सहभागाची दखल घेण्यात आली, याचे समाधान आहे.

  • माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीला जागतिक पातळीवर भारत खूप मागे होता. मात्र, आता जगात आपला देश चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय बुद्धिबळाची प्रगती अशीच पुढे सुरू राहावी, यासाठी कार्यरत राहण्यास हा पुरस्कार मला प्रेरणा देत राहील.

नीरज चोप्रासह १२ जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान :
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नीरज चोप्रासह १२ खेळाडूंचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सर्वांना राजभवानात पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • यामध्ये क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनिल छेत्री, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीतसिंह यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, कृष्णा नागर, नेमबाज एम नरवाल, पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमीत अंतिल यांना देखील पुरस्कार देण्यात आला.

  • यामध्ये क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनिल छेत्री, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीतसिंह यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, कृष्णा नागर, नेमबाज एम नरवाल, पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमीत अंतिल यांना देखील पुरस्कार देण्यात आला.

प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवड :
  • राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे कुलगुरू व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर पाच वर्षांसाठी निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या संस्थेतील निवडणुकीत त्यांना हे यश मिळाले आहे.

  • संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी.एस तिरूमूर्ती यांनी प्रा. बिमल पटेल यांचे अभिनंदन केले असून त्यांना या निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पटेल (वय ५१) यांना १९२ सदस्य देशांपैकी १६३ मते मिळाली. त्यात त्यांनी आशिया- पॅसिफक गटातील चीन, दक्षिण कोरिया व  जपान या देशांवर मात केली आहे.

  • प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवड झाली असून आमचे या संस्थेतील योगदान व आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याचे प्रयत्न महत्त्वाचे राहतील असे संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. चीनच्या दंडेलीविरोधात अप्रत्यक्षपणे भारताने आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याचा इरादा व्यक्त करून इशारा दिला आहे. ज्या देशांनी भारताला मतदान केले त्यांचे दूतावासाने आभार मानले आहेत.

  • भारताचे पटेल यांना १६३ मते मिळाली. थायलंडला १६२, जपानला १५४, व्हिएतनामला १४५ मते मिळाली आहेत. चीनला १४२ मतांवर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाला १४०, सायप्रसला १३९ तर मंगोलियाला १२३ मते मिळाली.

 

१५ नोव्हेंबरला जो बायडेन-शी जिनपिंग भेट! भारतासोबतच्या वादावरही चर्चा होणार :
  • गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या १५ नोव्हेंबर रोजी या दोन्ही राष्ट्रप्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारतासोबत चीनच्या बिघडलेल्या संबंधांवर चर्चा होणार आहे.

  • तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका या दोन देशांमधील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • या चर्चेमध्ये चीन आणि अमेरिका यांच्यादरम्यान असलेल्या वादाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात मागे हटणार नसल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “आम्ही नक्कीच सुरक्षेशी संबंधित विषयांवर चर्चा करू. चीनविषयी अमेरिकेला वाटत असलेली चिंता व्यक्त करण्यात जो बायडेन अजिबात हयगय करणार नाहीत”, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे.

  • या वर्षी फेब्रुवारीपासून जो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यात होणारी ही तिसरी बैठक असेल. मात्र, तैवानच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांचे सर्वोच्च नेते पहिल्यांदाच बैठकीत समोरासमोर येत आहेत.

अंतराळात जन्म, तरंगती घरं आणि पृथ्वीवर पिकनिक…जेफ बेझोसनं वर्तवलं मानवजातीचं भविष्य :
  • आपल्या विश्वाच्याही पलीकडे कोणतं विश्व आहे की नाही, याची उत्सुकता गेल्या कित्येक वर्षांपासून मानवाला राहिली आहे. त्यासोबतच पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मर्यादित साठा लक्षात घेता असाच साठा बाहेरच्या जगात कुठे आहे का याचाही शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. पण जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मानानं झळकणाऱ्या जेफ बेझोसनं मात्र मानवजातीच्या भवितव्याविषयी एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे.

  • एखाद्या सायफाय चित्रपटात सापडावं, असं हे भाकित अस्तित्वात आलं, तर माणसाचं आयुष्य किती अमूलाग्र बदलून जाईल, याचीच कल्पना बेझोसच्या या भाकितानंतर केली जाऊ लागली आहे.

  • वॉशिंग्टनमध्ये झालेल्या ‘२०२१ इग्नॅशियस फोरम’मध्ये जेफ बेझोस सहभागी झाला होता. पृथ्वीवरचं जीवनमान वाचवण्यासाठी अंतराळाचा कसा उपयोग होऊ शकतो, याविषयीच्या चर्चेत त्यानं भाग घेतला होता.

  • यावेळी पृथ्वीवरील मानवजातीचं भवितव्य काय असेल? या मुद्द्यावर बेझोसनं एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे. जे सत्यात येण्याची पूर्ण शक्यता असल्याचं देखील त्याचं म्हणणं आहे.

१४ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.