राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) प्रश्नपत्रिकेच्या रचनेत बदल करण्यात आला असून आता २०० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून त्यातील १८० गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यात परीक्षेसाठी चार शहरेही वाढवण्यात आली आहेत.
नीटमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र या विषयांचे मिळून १८० प्रश्न विचारण्यात येत होते. सर्व प्रश्न सोडवणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक होते. मात्र यंदा या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. एकूण २०० गुणांची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून त्यातील १८० गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. प्रत्येक विषयासाठी पाच गुणांचे वैकल्पिक प्रश्न असतील. दरम्यान, परीक्षेचा अभ्यासक्रम गेल्या वर्षीप्रमाणेच असणार आहे.
देशभरात १२ सप्टेंबर रोजी नीट होणार असून त्याचे अर्ज मंगळवारपासून उपलब्ध झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत मुदत आहे.
नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा हे मंगळवारी पाचव्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांची नेमणूक पंतप्रधानपदी अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी केली आहे.
राज्य घटनेच्या अनुच्छेद ७६ (५)नुसार ही नेमणूक करण्यात आली आहे, असे ‘दी हिमालयन टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निकालानुसार ७४ वर्षीय देऊबा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयाने आदेश दिला होता की, के. पी शर्मा ओली यांना काढून देऊबा यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा करावा. अध्यक्षीय सूत्रांनी सांगितले, त्यांच्या कार्यालयाने देऊबा यांची पंतप्रधानपदी नेमणूक करीत असल्याचे कळवले आहे. शपथविधी कधी होणार हे अजून ठरवण्यात आलेली नाही.
तत्कालीन पंतप्रधान ओली यांनी २१ मे रोजी प्रतिनिधीगृह बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घटनाबाह्य़ होता व त्यामुळे देऊबा यांची पंतप्रधानपदी नेमणूक करण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. सरन्यायाधीश न्या. चोलेंद्र समशेर राणा यांनी सांगितले की, ओली यांनी पंतप्रधानपदासाठी केलेला दावा अवैध व घटनाबाह्य़ आहे.
सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंध्र प्रधान यांनी पदवी प्रवेशासाठीची NEET प्रवेश परीक्षा या वर्षी १२ सप्टेंबर रोजी घेतली जाणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी एमडी, एमएस किंवा पदव्युत्तर पदविका अर्थात पीजी डिप्लोमा अशा अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी NEET PG परीक्षा ११ सप्टेंबरला घेतली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या परीक्षांची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
गेल्या वर्षभरापासून देशात करोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वच परीक्षांचं भवितव्य अधांतरी झालेलं असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी NEET UG अर्थात पदवी प्रवेशासाठीची परीक्षा १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याचं जाहीर केलं. आजपासून अर्थात १३ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून या परीक्षेचे अर्ज देखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानंतर आता NEET PG ची देखील घोषणा करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलैपासून केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलत (डीआर) मध्ये ३ टक्क्यांनी वाढव करण्यात येणार आहे.
केंद्र सरकार याबाबत विचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये डीए आणि वाढलेला महागाई भत्त्याचा लाभ सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे. हा अहवाल अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (एआयसीपीआय) च्या आकडेवारीवर आधारित आहे.
जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा तपशील असलेला एआयसीपीआय अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला असून जुलैपासून त्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना सध्या ७ व्या वेतन आयोगांतर्गत १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. महागाईचा सामना करण्यास मदत करण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना देण्यात आलेल्या पगाराचा एक भाग म्हणजे महागाई भत्ता (डी.ए.).
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला येत्या २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या स्पर्धकांसाठी मोठ्या रकमेचं बक्षीस जाहीर केलं आहे.
राज्यातील सुवर्ण पदक जिंकणाऱ्या स्पर्धकांना राज्य सरकारकडून ६ कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. तर रजत आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे ४ कोटी आणि २ कोटी रुपये दिले जाणार आहे. तर सांघिक खेळात सुवर्ण पदक पटकवाणाऱ्या खेळाडूंना ३ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच रजत आणि कांस्य पदक पटकवणाऱ्या खेळाडूंना १ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
त्यासोबत टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना राज्य सरकारकडून १०-१० लाख रुपये दिले जाणार आहेत. उत्तर प्रदेशातून १० स्पर्धक ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. यात नेमबाज सौरभ चौधरी, मैराज खान आणि भालाफेकपटू शिवपाल सिंह, अन्नु राणी यांचा समावेश आहे.
“खूप खेळा, खूप शिका” या अभियानांतर्गत खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण देण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. प्रशिक्षण देण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. उत्तर प्रदेशात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानांची निर्मिती केली जात आहे. तसेच खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
देशातील तिन्ही सैन्य दलांसाठी सर्वोत्तम अधिकारी घडवणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या नौदल विभागाच्या निकालांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषणा केली. नेव्हल अकादमी परीक्षा (२) २०२० च्या निकालांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये ४७८ जणांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे यापैकी ३२ जण हे महाराष्ट्रातील आहेत. निवड करण्यात आलेल्या ४७८ विद्यार्थ्यांपैकी अदित्य सिंह राणा याने सर्वाधिक म्हणजेच १११६ गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये दुसऱ्या क्रमाकांकावर नकुल सक्सेना असून त्याने १०७७ गुण मिळवलेत. तर तिसऱ्या क्रमांकावर देवेन नामदेव शिंदे असून त्याने १०७१ गुण मिळवलेत.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.