चालू घडामोडी - १३ एप्रिल २०१७

Date : 13 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

हरभजन सिंग चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सदिच्छादूतपदी निवड

चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 साठी एकूण आठ क्रिकेटपटूंची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली असून यामध्ये हरभजन सिंगचा समावेश आहे. यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा एक जून ते 18 जूनदरम्यान पार पडणार आहे.

 

भारतीय स्पिनर हरभजन सिंग याची चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठ सदिच्छादूतांमध्ये हरभजन सिंग याच्यासोबत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, बांगलादेशचा हबिबूल बशर, इंग्लंडचा इयान बेल, न्यूझीलंडचा शेन बॉण्ड, ऑस्ट्रेलियाचा माईक हसी, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्थिम यांचा समावेश आहे.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.