चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ ऑक्टोबर २०२१

Updated On : Oct 12, 2021 | Category : Current Affairs


आता RSS च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार ‘या’ राज्यांतले सरकारी कर्मचारी :
 • हरियाणा सरकारने आपले दोन महत्त्वाचे आदेश रद्द केल्याने आता राज्यातले सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत, तसंच संघाच्या शाखेतही जाऊ शकणार आहेत. हरियाणा सरकारच्या या आदेशावरुन काँग्रेस मात्र जोरदार टीका करत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी याबद्दलचे आदेश जारी केले आहेत.

 • १९८० साली हरियाणाच्या तत्कालीन मुख्य सचिव कार्यालयाने आदेश काढत सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यास मनाई केली होती. तर अशाच प्रकारचा आदेश १९६७ सालीही काढण्यात आला होता. मात्र हे दोन्ही आदेश आता हरियाणा सरकारने रद्द केले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची मुभा मिळाली आहे

 • काँग्रेस मात्र हरियाणा सरकारच्या या नव्या आदेशामुळे संतप्त झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला आक्षेप नोंदवला आहे. आता हरियाणाच्या सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या शाखेत जाण्याची मुभा, सरकार चालवत आहात की भाजपा-संघाची शाखा? असा खोचक सवाल सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

भारताला मिळणार आणखी एक विमान सेवा; राकेश झुनझुनवालांच्या ‘आकासा एअरलाईन्स’ला सरकारची NOC :
 • शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ‘आकासा’ एअर या ब्रँड नावाने काम करेल.

 • जर सर्व प्रक्रिया योग्यवेळी पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये आकासा एअरलाईन्सची स्वस्त दरातील विमान सेवा सुरु करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

 • आता एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या आकासा एअर या ब्रँड नावाने उड्डाण करणार आहे.. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे असतील, ज्यांनी यापूर्वी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.

 • इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष, राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे हे आकासाचे सह-संस्थापक असतील.

नेशन्स लीग फुटबॉल - एम्बापेमुळे फ्रान्सला विजेतेपद :
 • अखेरची १० मिनिटे शिल्लक असताना किलियान एम्बापेने केलेल्या निर्णायक गोलमुळे जगज्जेत्या फ्रान्सने अंतिम सामन्यात स्पेनचा २-१ असा पराभव करत नेशन्स लीग फुटबॉलचे जेतेपद मिळवले. सॅन सिरो स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना आक्रमणात चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती.

 • उत्तरार्धात मात्र सामन्यात रंगत आली. ६४व्या मिनिटाला मिकेल ओयार्झाबालने गोल करत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी केवळ दोन मिनिटेच टिकू शकली. अनुभवी करीम बेन्झेमाने उत्कृष्ट गोल केल्यामुळे फ्रान्सने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ८०व्या मिनिटाला थिओ हर्नाडेझच्या पासवर एम्बापेने गोल नोंदवून फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 • अखेरच्या काही मिनिटांत स्पेनने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोलरक्षक ह्य़ुगो लॉरीसने दोनदा अप्रतिमरीत्या चेंडूला गोलजाळ्यात जाण्यापासून अडवत स्पेनला बरोबरी साधू दिली नाही.

आयपीएल गाजवलेल्या ‘त्या’ तिघांसाठी टीम इंडियाची दारं होणार खुली :
 • आयपीएल २०२१च्या अंतिम फेरीनंतर दोन दिवसांनी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेत विराट कोहली शेवटचे भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही.

 • अशा परिस्थितीत, विराटसह, बीसीसीआयची देखील इच्छा आहे, की त्याने कर्णधार म्हणून आपली आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्द विश्वचषक ट्रॉफीसह संपवावी. यासाठी बीसीसीआय आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही स्टार खेळाडूंना टीम इंडियासोबत जोडू शकते. या खेळाडूंमुळे संघाच्या प्रशिक्षण आणि कंडीशनिंग सत्रांमध्ये संघाला मदत होऊ शकते.

 • क्रिकबझच्या अहवालानुसार, निवड समितीने आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल, केकेआरचा फलंदाज व्यंकटेश अय्यर आणि गोलंदाज शिवम मावी, या सर्व खेळाडूंची निवड केली आहे. त्यांच्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षणामध्ये आवश्यक मदत देईल. यापैकी किमान दोन खेळाडूंना दुबईमध्ये राहण्यास सांगितले जाऊ शकते, जिथे सध्या भारतीय खेळाडू क्वारंटाइन आहेत.

१२ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)