चालू घडामोडी आणि दिनविशेष - 12 एप्रिल 2023

Date : 12 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चंद्रपूर: महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
  • ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (आयपीपीआयए) या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला मिळाला असून याखेरीज ग्राहक जागृती, माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कार मिळाले.
  • महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी बेळगाव येथे एका समारंभात हे पुरस्कार कंपनीच्या वतीने नुकतेच स्वीकारले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रमोद देव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. राजा, आयपीपीएआयचे संचालक हॅरी धौल, हरयाणा विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष आर. एन. प्रशेर आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे माजी संचालक चिंतन शाह उपस्थित होते.
  • महावितरणची सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणून निवड करताना वीज ग्राहक संख्या, विजेची विक्री, विजेची उत्तम उपलब्धता, बिल वसुलीची कामगिरी, वितरण हानी, अपारंपरिक ऊर्जा वापर आणि स्मार्ट मीटरचा वापर, अशा अनेक बाबींचा विचार करण्यात आला. महावितरणला ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणारी सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणूनही पुरस्कार मिळाला. कंपनीला ‘इनोव्हेटीव्ह आयटी ॲप्लिकेशन्स इन पॉवर सेक्टर’ या गटातही पुरस्कार मिळाला आहे.
अ. भा. मराठी नाट्य परिषद निवडणूक : २० उमेदवार बिनविरोध विजयी
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जवळ येत असून नाट्यकर्मींची मातृसंस्था असलेल्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि ‘आपलं पॅनल’ परस्परांसमोर ठाकले आहेत. येत्या १६ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच राज्यभरातील ६० पैकी २० जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली. अनेक ठिकाणी नेमक्याच उमेदवारांनी अर्ज केल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी म्हटले.
  • गेली पाच वर्षे मराठी नाट्य परिषद नाट्य विश्वातील विविध उपक्रमांबरोबरच अंतर्गत वादांमुळे अधिकच चर्चेत होती. करोनाकाळात नाट्यसृष्टी ठप्प झाल्यानंतर परिषदेच्या सभासदांनी आणि पदावर असलेल्या मंडळींनी कलाकार, तंत्रज्ञांना आर्थिक साहाय्य केले होते. परंतु त्यावरूनही परिषदेमधील दोन गटांमध्ये वाद झाले.
  • अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात राज्यभरात एकूण १०३ उमेदवार उतरले असून मतदारांची संख्या २८ हजार ३११ इतकी आहे. राज्यभरात २९ केंद्रांवर हे मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मराठी रंगभूमीच्या संवर्धनासाठी आणि कलेच्या जपणुकीसाठी परिषदेचे आजीव सभासद आणि उमेदवारांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असणार आहे.
भाजपला पुन्हा तीनशेहून अधिक जागा मिळतील: अमित शहा
  • पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला देशभरात तीनशेहून अधिक जागा मिळतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सलग तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत येऊ, असा दावा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मंगळवारी येथे केला.
  • भाजपच्या उर्ध्व आसाम क्षेत्रीय कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभानंतर झालेल्या येथील जाहीर सभेत ते बोलत होते.  आसाममध्ये भाजपला लोकसभेच्या १४ पैकी १२ जागा मिळतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असे ते म्हणाले. देशात लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत.
  • शहा म्हणाले की, ईशान्येकडील प्रांत हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानजा जात होता. पण राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतरही त्या पक्षाला अलीकडील विधानसभा निवडणुकांत येथे यश मिळू शकले नाही. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताचा अवमान केला आहे. त्यांनी देशाचा अवमान आणि सरकारवर खोटे आरोप करणे सुरूच ठेवल्यास ईशान्येकडे काँग्रेसची जी गत झाली, तीच संपूर्ण देशभरात होईल, अशी टीका शहा यांनी केली. काँग्रेस मोदींविरोधात जेवढी गरळ ओकेल, तेवढे भाजपचे कमळ फुलत राहील, असा दावाही त्यांनी केला.
२० एप्रिलला दिल्लीमधील ‘या’ मॉलमध्ये उघडणार अ‍ॅपलचे स्टोअर, जाणून घ्या कधीपासून करता येणार खरेदी
  • Apple ही एक लोकप्रिय टेक कंपनी आहे. या कंपनीचे आयफोन आणि अन्य उपकरण वापरण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. Apple भारतीय बाजारपेठमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अतिशय गंभीरपणे विचार करत आहे. Apple उत्पादनांच्या उत्पादक कंपन्या भारतात सातत्याने आपले प्लांट उभे करत आहेत. फॉक्सकॉन कंपनीने तर तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आता Apple भारतातील आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे.
  • Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग २० एप्रिल रोजी होणार आहे. २० एप्रिल पासून ग्राहक सकाळी १० वाजल्यानंतर या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. म्हणजेच Apple चे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा थर्ड पार्टी स्टोअरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.
  • भारतीय बाजारपेठेमध्ये Apple कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे. मुंबईमधील रिटेल स्टोअरचे लॉन्चिंग १८ एप्रिल रोजी होणार आहे. भारतामध्ये सध्या Apple चे फक्त ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे. इतर स्टोअर्स हे कंपनीचे अधिकृत स्टोअर्स आहेत. Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. याबाबतचे वृत्त Economic Times या वृत्तसंस्थेने दिले आहे.
  • डेटा अ‍ॅनालिटिक फर्म CRE मॅट्रिक्स द्वारे अ‍ॅक्सेस केलेल्या करारानुसार आणि इकॉनॉमिक टाइम्सने मूल्यांकन केल्यानुसार, २२ ब्रँड हे Apple च्या रिटेल स्टोअरजवळ त्यांचे शॉप्स उघडू शक्त नाहीत. तसेच त्यांची जाहिरात देखील करू शकत नाहीत. Amazon, Facebook, Google, LG, Microsoft, Sony, Twitter, Bose, Dell, Devialet, Foxconn, Garmin, Hitachi, HP, HTC, IBM, Intel, Lenovo, Nest, Panasonic आणि Toshiba इत्यादी ब्रँड Apple रिटेल स्टोअर ज्या ठिकाणी लॉन्च होईल तिथे आपले शॉप्स उघडू शकणार नाहीत. 

 

भारताच्या रणगाडाविरोधी हेलिना क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :
  • भारताने सोमवारी रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र हेलिनाची पोखरण येथे यशस्वीरित्या चाचणी केली. स्वदेशी बनावटीच्या आधुनिक हलक्या हेलिकॉप्टरमधून ही चाचणी करण्यात आली. हेलिना हे जगातील सर्वात आधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र असल्याची माहिती डीआरडीओतर्फे (संरक्षण संशोधन विकास संस्था) देण्यात आली.  

  • हेलिनाची कमाल पल्ल्याची क्षमता ही सात किलोमीटर आहे. त्याची रचना ही शस्त्रास्त्रयुक्त आधुनिक हलक्या हेलिकॉप्टरसाठी (एएलएच ) करण्यात आली आहे.  

  • सोमवारी घेण्यात आलेली ही चाचणी डीआरडीओने विकसित केलेल्या तिसऱ्या पिढीतील फायर अ‍ॅन्ड फरगेट म्हणजेच डागा आणि विसरा श्रेणीतील क्षेपणास्त्रांच्या वापरसिद्धता चाचण्यांचा भाग होती.

नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाझ शऱीफ झाले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; बिनविरोध निवडून आल्यानंतर घेतली शपथ :
  • पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाझ शरीफ यांनी यांनी बिनविरोध निवडून आल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इम्रान खान यांना शनिवारी अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर आता शहबाझ शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होत आहेत. पंतप्रधान पदाच्या निवडणुकीआधीच इम्रान खान यांनी संसद सदस्यपदाचा राजीनामा दिला. आपण चोरांसोबत बसणार नाही, असंही त्यांनी राजीनामा देताना सांगितलं.

  • इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक ए इन्साफने मतदानावर बहिष्कार टाकला आणि तिथून बाहेर पडले. त्यामुळे शरीफ हे पंतप्रधान म्हणून बिनविरोध निवडून आले. पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाने शाह महमूद कुरेशी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून उभं केलं होतं.

  • मात्र अधिवेशन सुरू होण्याच्या काही काळ आधीच माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं की पाकिस्तान ए तेहरिकचे सर्व सदस्य संसदेचा राजीनामा देतील आणि परकीय अजेंड्याखाली तयार होणाऱ्या कोणत्याही सरकारचा ते भाग नसतील. इम्रान खान यांनी अमेरिकेने विरोधी पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी कटकारस्थान रचण्यात मदत केल्याचा आरोप केला होता. त्या संदर्भाने चौधरी यांनी हे विधान केलं.

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरु; जाणून घ्या कुठे आणि कसे करता येणार रजिस्ट्रेशन :
  • दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावेळी ही यात्रा ३० जूनपासून सुरू होणार असून ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाचे सीईओ नितीश्वर कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी नोंदणीबाबत माहिती दिली होती.

  • जम्मू-काश्मीर प्रशासनाने दक्षिण काश्मीरमधील अमरनाथ धामच्या वार्षिक यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी २० हजार क्षमतेचा यात्री निवास तयार केला आहे. २०२० आणि २०२१ मध्ये, कोविड१९ मुळे, ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेची यात्रा प्रतीकात्मक आधारावर आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे यंदा भाविकांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. या प्रवासासाठी तुम्ही नोंदणी कशी करू शकता ते जाणून घेऊया.

  • अमरनाथ यात्रेची तारीख हिंदू कॅलेंडर आणि मासिक शिवरात्रीवर अवलंबून असते. दरवर्षी यात्रेची सुरुवातीची तारीख निश्चित नसते, परंतु यात्रेची शेवटची तारीख श्रावण पौर्णिमा असते. यावेळी अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरू होणार असून ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

  • अमरनाथ यात्रेचा कालावधीही ठरलेला नसतो. हे एका विशिष्ट वर्षी जास्तीत जास्त ३५ दिवस ते ६० दिवसांसाठी निश्चित करण्यात आले आहे. पूर्वी अमरनाथ यात्रा ६० दिवसांसाठी आयोजित केली जात होती, नंतर अनेक स्थानिक समस्यांमुळे हा कालावधी वर्षानुवर्षे कमी होत गेला. यंदा ही यात्रा ४३ दिवसांची असेल.

दहावीपर्यंत ‘हिंदी’ अनिवार्य करण्यास ईशान्येचा विरोध ; निर्णय मागे घेण्याची केंद्राकडे मागणी :
  • ईशान्येकडील राज्यांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत हिंदी हा विषय अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आसाम साहित्य सभेसह ईशान्येच्या अनेक संस्था-संघटनांनी विरोध केला असून हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.

  • सरकारने स्थानिक भाषांचे संवर्धन आणि प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आसाम साहित्य सभेने केले आहे. साहित्य सभेने त्याबाबतचे एक निवेदन शनिवारी प्रसिद्ध केले.

  • त्यात ‘‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामी आणि इतर स्थानिक भाषांच्या विकासासाठी पावले उचलायला हवी होती; परंतु हिंदी अनिवार्य करण्याचे पाऊल आसामी आणि ईशान्येकडील सर्व स्थानिक भाषांचे भवितव्य अंधकारमय करणारे आहे,’’ अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. दहावीपर्यंत हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

१ जुलैपासून प्लास्टिकबंदी ; केंद्राच्या अधिसूचनेनुसार राज्य सरकारचा निर्णय :
  • एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलैपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने प्लास्टिकच्या पिशव्या, ताटे, वाटय़ा, ग्लास, काटे, चमचे, अन्नपदार्थ, मिठाई यांच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा समावेश आह़े

  • केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्यात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या अविघटनशील कचऱ्याचा सागरी व वन्यजीव तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो़  प्लास्टिक कचरा शहरांमधील नाले, गटारात अडकून राहिल्याने अनेकदा पूरपरिस्थती निर्माण झाली आह़े  त्याला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने २००६ मध्ये प्लास्टिक बंदीचा कायदा केला.

  • या संदर्भात केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने देशात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, साठा, वाहतूक, विक्री, आयात, वितरण व वापरावर बंदी घालण्यासंबंधी २१ ऑगस्ट २०२१ रोजी एक अधिसूचना प्रसृत केली. राज्यात १ जुलै २०२२ पासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वंतत्र अधिसूचना काढली आहे.

  • बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक वस्तूंमध्ये सर्व प्रकारच्या पिशव्या (कॅरी बॅग्ज), ताटे, वाटय़ा, ग्लास, काटे, चमचे, सुऱ्या, स्ट्रॉ, कानकाडय़ा, हवाई फुग्यांसाठी वारण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या काडय़ा, प्लास्टिक ध्वज, मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेट पॅकेट्सच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या फिल्म, प्लास्टिक फलक, सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकोल इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. 

  • केंद्र सरकारच्या अधिसूचेनुसार राज्यातील सर्व प्लास्टिक वस्तूंचे उत्पादक, साठवणूक करणारे, घाऊक विक्रेते, फेरीवाले, ई-कॉमर्स कंपन्या, तसेच मॉल, बाजार, दुकान संकुले, चित्रपटगृहे, पर्यटन स्थळे, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इत्यादी आस्थापना व सामान्य जनतेला प्लास्टिक वस्तूंवरील बंदीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

१२ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.