चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० सप्टेंबर २०२०

Date : 10 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीनची दादागिरी मोडण्यासाठी भारत-जपान एकत्र, दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार :
  • इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचे विस्तारवादी धोरण लक्षात घेऊन भारत आणि जपानने एकत्र येऊन एक महत्त्वाचा लष्करी सहकार्य करार केला आहे. संरक्षण सचिव अजय कुमार आणि जपाचने राजदूत सुझूकी सातोशी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.

  • या करारामुळे संरक्षण सहकार्य दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांच्या सैन्य दलांना परस्परांचे सैन्य तळ वापरता येणार आहेत. भारताने अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर सुद्धा अशाच प्रकारचा करार केला आहे. २०१६ साली अमेरिकेबरोबर केलेल्या करारातंर्गत भारताला डिजीबाऊटी, गारसिया, गुआम या तळांवर सैन्य दलाशी संबंधित साधनांमध्ये इंधन भरता येऊ शकते.

  • ऑगस्ट २०१७ साली डिजीबाऊटी येथे चीनचा परदेशातील पहिला सैन्य तळ कार्यरत झाला. त्यानंतर चिनी नौदलाच्या हिंदी महासागरातील हालचाली वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपलाही पल्ला वाढवण्याच्या दृष्टीने भारतीय नौदलाला या कराराचा फायदा होईल. ग्वादर, कराची या पाकिस्तानी बंदरांमध्ये चिनी युद्धनौका, पाणबुडयांचा विनाआडकाठी मुक्तपणे वावर सुरु असतो.

कोविड-१९ आजाराला हलक्यात घेऊ नका; पंतप्रधानांचं जनतेला आवाहन :
  • लॉकडाउनंतर देशात आता बहुतेक सर्व गोष्टींचे व्यवहार सुरु झाले आहेत. दरम्यान, देशातील करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ आजाराला हलक्यात घेऊ नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील जनतेला केले. तसेच तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा केले आहे.

  • भारतात चोवीस तासात आजपर्यंतचे सर्वाधिक ९६,००० नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४४ लाखांच्या पार पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने याबाबत माहिती दिली.

  • दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच म्हटलं आहे की, करोनाच्या संसर्गाचं आपल्यासमोर आणि संपूर्ण मानवजातीसाठी अभूतपूर्व आव्हान आहे. भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखील कोविड-१९ आजाराशी लढण्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे. आपल्या या मेहनतीची संपूर्ण जगानं दखल घेतली आहे. त्याचबरोबर जोपर्यंत यावर लस येत नाही तोवर आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.

मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण :
  • वसई : वसई विरार शहरातील करांचे समानीकरण पूर्ण झाल्यानंतर आता पालिकेने करांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शहरातील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून प्रभागनिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी खास ‘अ‍ॅप’ तयार  केले जाणार जाणार आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत ४०० कोटींची भर पडण्याची  शक्यता आहे.

  • वसई विरार महापालिका हद्दीत आठ लाख  दहा हजार मालमत्ता आहेत. मात्र, दिवसेंदिवस शहरातील मालमत्तांमध्ये वाढ होत आहे. याशिवाय हजारो मालमत्तांवर करआकारणी झालेली नाही. अनेक ठिकाणी वाढीव बांधकामे झालेली आहेत, तसेच घरगुती मालमत्तांचे व्यावसायिक मालमत्तांमध्ये रूपांतर झालेले आहे. त्यावर कर आकारणी झाली नसल्याने पालिकेचा महसूल बुडत आहे.

  • शहरातील मालमत्तांचे नव्याने कर सर्वेक्षण करावी ही मागणी सातत्याने होत होती. अखेर पालिकेने शहरांतील मालमत्तांचे नव्याने कर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी प्रत्येक मालमत्ताधारकांच्या दारात जाऊन  मोजणी केली जाणार आहे. अचूक आणि तात्काळ मोजणी करता यावी यासाठी खास ‘अ‍ॅप’ तयार करण्यात आले आहे.

जॉन्टी ऱ्होड्स बनला स्वीडन क्रिकेट संघाचा प्रशिक्षक :
  • दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रख्यात क्षेत्ररक्षक अशी ओळख मिळवलेल्या जॉन्टी ऱ्होड्सने नवीन जबाबदारी स्विकारली आहे. जॉन्टी ऱ्होड्स स्वीडनच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. स्विडीश क्रिकेट फेडरेशनने जॉन्टी ऱ्होड्ससोबत करार केला आहे.

  • सध्याच्या घडीला स्वीडनमध्ये क्रिकेट हा दुसऱ्या पसंतीचा खेळ मानला जातो. त्यामुळे स्वीडनमधील तरुण खेळाडूंना जॉन्टी ऱ्होड्सच्या अनुभवाचा फायदा होईल असं स्विडीश क्रिकेट फेडरेशनने म्हटलं आहे.

  • “माझ्या परिवारासोबत स्वीडनमध्ये जायला मी उत्सुक आहे. माझ्यासाठी अगदी योग्य वेळेला ही संधी आलेली आहे. नवीन वातावरण आणि नव्या उमेदीच्या खेळाडूंसोबत काम करायला आणि त्यांना मार्गदर्शन करायला मला आवडेल. मी लवकरच स्वीडन संघासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

  • ” swedishcricket.org शी बोलताना जॉन्टीने आपली प्रतिक्रिया दिली. जॉन्टी ऱ्होड्स सध्या युएईत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे. नोव्हेंबर महिन्यात तो स्वीडनला परिवारासोबत रवाना होणार आहे.

१० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.