चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० जून २०२१

Date : 10 June, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय अमेरिकी मुलीस संशोधनासाठी पुरस्कार :
  • भारतीय अमेरिकी विद्यार्थिनीला तिने १९८४ मधील भोपाळ वायू दुर्घटनेच्या परिणामांमुळे प्रेरित होऊन केलेल्या संशोधनास प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. सोही संजय पटेल असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती टेक्सास हायस्कूलमध्ये शिकते. तिला ‘पॅट्रिक एच हर्ड शाश्वतता पुरस्कार २०२१’ जाहीर झाला आहे.

  • रिजेनेरॉनच्या आंतरराष्ट्रीय आभासी विज्ञान व तंत्रज्ञान मेळ्यात तिला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. तिचा प्रकल्प हा वनस्पतींच्या मदतीने पॉलियुरेथिनसारखा फोम तयार करण्याबाबत असून त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत. घरबांधणीतही या फोमचा वापर करता येतो. पटेल हिच्या या संशोधन प्रकल्पास १९८४ मधील भोपाळ वायू दुर्घटनेची पार्श्वभूमी असून त्या वेळी ४० टन मेथिल आयसोसायनेट वायू कीटकनाशक प्रकल्पातून बाहेर पडला होता. मेथिल आयसोसायनेट हा वायू पॉलियुरेथिन फोम तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो.

  • सोही हिच्या संशोधन प्रकल्पाचे नाव ‘स्केलेबल अँड सस्टेनेबल सिंथेसिस ऑफ नॉव्हेल बायोबेस्ड पॉलियुरेथिन फोम सिस्टीम’ असे असून त्यात पर्यावरणस्नेही पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. तिने दोन बिनविषारी उत्पादने टाकाऊ कचऱ्यापासून तयार केली आहेत, त्यापासून पॉलियुरेथिन तयार करता येते.

  • पर्यावरण विज्ञान संस्थेच्या सल्लागार डॉ. जेनिफर ऑर्मी झॅवॅलेटा यांनी सांगितले, की यंदाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मेळ्यात जे प्रकल्प सादर करण्यात आले ते पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त आहेत. ‘सोसायटी फॉर सायन्स अँड पब्लिशर ऑफ सायन्स न्यूज’ या संस्थेच्या माया अजमेरा यांनी सोही संजय पटेल हिच्या प्रकल्पाचे कौतुक केले आहे.

दहावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर होण्याची शक्यता :
  • राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर के ले आहे. त्यानुसार जुलैमध्ये दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियमित, खासगी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळास्तरावर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक आणि निकाल तयार करण्याची कार्यपद्धती बुधवारी जाहीर के ली आहे.

  • राज्य मंडळाकडून मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी १० जूनला यूट्यूबद्वारे मूल्यमापनाबाबत कार्यशाळा घेतली जाणार आहे. मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्ते  वर्गशिक्षकांकडे सादर करणे, वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून निकाल शाळा समितीकडे सादर करणे यासाठी ११ जून ते २० जूनची मुदत आहे. वर्ग शिक्षकांनी तयार के लेल्या निकालाचे निकाल समितीने परीक्षा आणि नियमन करून ते प्रमाणित करण्यासाठी १२ जून ते २४ जून ही मुदत देण्यात आली आहे.

  • निकाल समितीने प्रमाणित के लेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मुख्याध्यापकांनी मंडळाच्या निकाल प्रणालीमध्ये भरण्यासाठी २१ जून ते ३० जून ही मुदत असेल. २५ जून ते ३० जून या कालावधीत निकाल समितीने प्रमाणित के लेले विद्यार्थ्यांचे निकाल आणि अनुषंगिक  स्वाक्षरी प्रपत्रे मुख्याध्यापकांनी लाखबंद पाकिटात विभागीय मंडळात जमा करायचे आहेत.

भारत आणि थायलंड यांच्या नौदलांची संयुक्त गस्त :
  • भारत व थायलंडच्या नौदलाने बुधवारी अंदमान सागरात तीन दिवसांची संयुक्त गस्त मोहीम सुरू केली आहे. चीनने हिंदी महासागरात सागरी अस्तित्व वाढवल्याने दोन्ही देशांनी ही मोहीम हाती घेतली आहे.

  • भारतीय नौदलाचे आयएनएस शरयू व थायलंडचे क्रॅबी हे जहाज या मोहिमेत सहभागी असून दोन्ही नौदलांनी डार्नियर सागरी गस्त विमानांचाही वापर यात केला आहे. भारत व थायलंड यांची ही आतापर्यंतची ३१ वी संयुक्त गस्त मोहीम असून दोन्ही नौदले दर दोन वर्षांनी अशा प्रकारे संयुक्त कवायती करीत असतात. २००५ पासून या कवायतींचा प्रस्ताव मांडला गेला नंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली. हिंदी महासागरात आता सुरू असलेल्या कवायती हा त्याचाच भाग आहे, असे नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी सांगितले.

  • कोरपॅट नावाने या कवायती प्रसिद्ध असून त्या दोन देशांच्या नौदलां दरम्यान होतात. सागरी प्रदेशातील अवैध मासेमारी, अमली पदार्थ तस्करी, सागरी दहशतवाद, सशस्त्र दरोडे व चाचेगिरी रोखण्यासाठी त्याची गरज असते, असे त्यांनी म्हटले आहे. या कवायतींमुळे दोन्ही देशांत माहितीची देवाणघेवाण होते. तस्करीचे प्रयत्न रोखण्यास मदत होते. अवैध स्थलांतर व इतर गोष्टींना आळा बसतो.

  • भारतीय नौदलाच्या सागर म्हणजे ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन’ या कवायतींमध्ये हिंदी महासागरातील देशांशी प्रादेशिक सागरी सुरक्षा माहितीची देवणाघेवाण होते.

भारतीय वंशाच्या नागरिकांना अमेरिकेत सापत्नतेचा अनुभव :
  • भारतीय अमेरिकी व्यक्तींना अमेरिकेत अनेक वेळा सापत्नभावाच्या वागणुकीला सामोरे जावे लागते किंवा वेगळे पाडल्याचे अनुभव येतात, असे एका पाहणीत दिसून आले आहे.

  • ‘सोशल रिअ‍ॅलिटिज ऑफ इंडियन अमेरिकन्स अ‍ॅटीट्यूड सर्व्हे’मध्ये म्हटले आहे, की १२०० भारतीय अमेरिकी लोकांची ऑनलाइन पाहणी करण्यात आली. २०२० मध्ये कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस, जॉन हॉपकिन्स, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनिया यांनी हा अहवाल तयार केला आहे. १ ते २० सप्टेंबर २०२० या काळातील हा पाहणी अहवाल आहे. ‘युगव्ह’ या आस्थापनेचाही या पाहणीत समावेश होता.

  • अहवालात म्हटल्यानुसार भारतीय अमेरिकी लोकांना नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळते. दोन भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी एकाला तरी एक वर्षात सापत्नभावाच्या वागणुकीला तोंड द्यावे लागते. अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय अमेरिकी व्यक्तींना अशा प्रकारांना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते.

  • परदेशात जन्मलेल्या भारतीय व्यक्तींना फारसे अशा प्रकारांना सामोरे जावे लागत नाही. भारतीय अमेरिकी लोकांमध्ये विवाह आपल्याच समुदायात करण्याचे प्रमाण जास्त आहे. दहा पैकी आठ जणांचे जोडीदार हे भारतीय वंशाचे आहेत.

‘क्वाड’ देशांकडून एक अब्ज लशींचा पुरवठा :
  • क्वाड देश आग्नेय आशियातील देशांना एक अब्ज लशींचा पुरवठा करणार आहेत. भारतासह काही देशांमध्ये दुसरी लाट आली असून इतर काही देशांतही अजून करोना ओसरलेला नाही.

  • मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया, भारत, जपान व अमेरिका या देशांनी क्वाड गटाची पहिली आभासी बैठक घेतली होती. आता या गटाने आग्नेय आशियातील देशांना एक अब्ज लशी पुरवण्याचे ठरवले आहे. या लशी भारतात तयार करण्यात येणार होत्या पण त्याचवेळी भारतात दुसरी लाट सुरू झाल्यामुळे भारताकडून लशी मिळण्याची शक्यता कमी आहे. परिणामी क्वाड गटातील देश २०२२ पर्यंत तरी त्यांचे आश्वासन पूर्ण करणार का, अशी शंका निर्माण झाली आहे.

  • व्हाइट हाऊसचे भारत प्रशांत विभाग धोरण सल्लागार कुर्त कॅम्पबेल यांनी सांगितले, की आम्ही आमच्या भागीदार देशांशी चर्चा करीत आहोत. भारताच्या मित्र देशांना हा कठीण काळ आहे. अमेरिका सध्या भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून सरकारी व खासगी क्षेत्राचा याला पाठिंबा आहे. खासगी क्षेत्रातील व्यक्तींशी तसेच सरकारी गटांशी चर्चा करण्यात आली असून २०२२ पर्यंत तरी लस उपलब्ध केली जाईल.

१० जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.