चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ सप्टेंबर २०२०

Date : 9 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होतील का?; ट्रम्प म्हणाले :
  • येत्या काही दिवसांत अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर निशाणा साधला.

  • कमला हॅरिस यांना लोकांची पसंती नाही. त्या कधीही अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर तो अमेरिकेचा अपमान असेल, असं ट्रम्प यावेळी म्हणाले. तसंच लोकांनी हे लक्षात ठेवावं की जर बिडेन यांचा विजय झाला तर तो चीनचा विजय असेल असंही त्यांनी नमूद केलं.

  • ट्रम्प यांनी उत्तर कॅरोलिनामध्ये एका रॅलीला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. “अमेरिकेची अर्थव्यवस्था जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनच्या विषाणूमुळे आपली अर्थव्यवस्था ठप्प झाली. परंतु आता अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत,” असंही ट्रम्प म्हणाले. त्यांना (अमेरिकेच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस) लोकांची पसंती नाही. त्या कधीही अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाहीत. हा आपल्या देशाचा अपमान असेल,” असं ट्रम्प यांनी नमूद केलं.

२१ सप्टेंबरपासून सुरू होणार ‘या’ इयत्तांच्या शाळा; केंद्राकडून नियमावली जाहीर :
  • करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. लॉकडाउनदरम्यान देशातील सर्व उद्योगधंदे, तसंच शाळा, महाविद्यालयंही बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता. परंतु आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, २१ सप्टेंबरपासून शाळा अंशतः सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासाठी केंद्रानं नवी नियमावली जारी केली आहे.

  • २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी पासून १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा अटी शर्थींसह उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु विद्यार्थ्यांना शाळेत जायचं आहे की नाही हे ऐच्छिक असणार आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्येकामध्ये कमीतकमी ६ फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तसंच मास्कदेखील अनिवार्य असणार आहे. याव्यतिरिक्त कंटेन्मेंट झोनमधील शाळा उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आली नाही.

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच नियमावलीत ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. शाळांना जास्तीतजास्त ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • नववी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी शाळेत जायचं असेल तर त्यांना परवानगी असेल. परंतु त्यांना आपल्या पालकांकडून लेखी स्वरूपात परवानगी घेणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायही उपलब्ध असेल.

शैक्षणिक संस्था २१ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करा :
  • करोनामुळे गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शैक्षणिक संस्था २१ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने इयत्ता नववी ते १२ वीचे वर्ग आणि शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी ते एच्छिक आहे. त्याचप्रमाणे कौशल्य प्रशिक्षणही २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

  • दोन वर्गामध्ये अंतर ठेवणे, उपकरणांची देवाणघेवाण न करणे, स्वतंत्र वेळा, शारीरिक अंतराचा नियम पाळणे आणि वर्गखोल्यांचे र्निजतुकीकरण करणे आदी मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य मंत्रालयाने आखून दिली आहेत.

  • इयत्ता नववी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनाच के वळ वर्गात आभासी अथवा शारीरिकदृष्टय़ा हजर राहण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तर लहान मुलांसाठी ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार आहेत. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे मान्यतापत्र घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळा संक्रमणक्षेत्राच्या बाहेर आहेत त्या सुरू करण्याची परवानगी असेल. महाविद्यालये आणि शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतर असणे गरजेचे आहे.

फाइव्ह जी तंत्रज्ञान विकासात भारत-अमेरिका-इस्रायल सहकार्य :
  • मोबाइलच्या ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यात हुआवे या चीनच्या कंपनीला अमेरिका व भारतासह अनेक देशांनी वगळले असतानाच आता ही यंत्रणा उभारण्यासाठी भारत, इस्रायल व अमेरिका हे सहकार्य करणार आहेत.

  • खुली, विश्वासार्ह, सुरक्षित फाइव्ह जी संदेशवहन यंत्रणा उभारण्यास प्राधान्य दिले जाईल, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. फाइव्ह जी तंत्रज्ञानात या तीन देशांनी पुढाकार घेतला असून अमेरिकेतील भारतीय लोक व इस्रायल यांच्यातील संपर्कातून हा प्रस्ताव पुढे आला आहे. या तीन देशांनी सहकार्य करावे, असे जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील भेटीत सूचित केले होते.

  • यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या संस्थेच्या उपप्रशासक बोनी ग्लिक यांनी सांगितले की, हे सहकार्य म्हणजे हिमनगाचे टोक आहे. अनेक क्षेत्रात आम्ही सहकार्य करणार आहोत.

  • भारत-अमेरिका-इस्रायल यांच्या आभासी शिखर बैठकीत त्यांनी सांगितले की, जगातील विकासाची आव्हाने हे तीन देश एकत्र येऊन पेलू शकतात. इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का व त्यांचे इस्रायलमधील समपदस्थ संजीव सिंगला यांची भाषणे झाली.

०९ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.