चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ एप्रिल २०२२

Date : 9 April, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी प्रथमच कृष्णवर्णीय महिला :
  • अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात एका कृष्णवर्णीय महिलेची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. केतनजी ब्राऊन जॅक्सन असे या महिलेचे नाव आहे. जॅक्सन या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झालेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत.

  • जॅक्सन न्यायमूर्ती स्टीफन ब्रेयर यांची जागा घेतील. जॅक्सन यांच्या नियुक्तीमुळे आता सर्वोच्च न्यायालयात प्रथमच चार महिला न्यायमूर्ती असतील. त्यापैकी दोन कृष्णवर्णीय न्यायमूर्ती आहेत.  

  • अमेरिकेच्या दृष्टीने ही घटना मैलाचा दगड आणि अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी विजयाचा क्षण असल्याचे मानले जाते. बायडेन यांनी निवडणूक प्रचारात तसे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण केले.

१८ वर्षांवरील सर्वाना सशुल्क वर्धक मात्रा; लसीकरणास उद्यापासून प्रारंभ, केंद्राची घोषणा :
  • येत्या रविवारपासून (१० एप्रिल) १८ वर्षांवरील सर्वाना करोनाची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) सशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी केली. करोनाची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ९ महिने पूर्ण झालेले १८ वर्षांवरील सर्व नागरिक सशुल्क वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. १८ वर्षांवरील सर्वाना खासगी लसीकरण केंद्रांवर वर्धक मात्रा सशुल्क उपलब्ध करण्यात येईल, असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ‘सीरम’निर्मित कोव्हिशिल्डच्या एका वर्धक मात्रेसाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.

  • वर्धक मात्रेमुळे करोनापासून एक अतिरिक्त संरक्षण मिळेल. दोन्ही मात्रा घेतलेल्या १८ वर्षांवरील पात्र नागरिकांना १० एप्रिलपासून सर्व खासगी लसीकरण केंद्रांवर वर्धक मात्रा देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी केले. आतापर्यंत १५ वर्षांवरील सर्व लोकांपैकी सुमारे ९६ टक्क्यांनी करोना लशीची एक मात्रा घेतली आहे, तर सुमारे ८३ टक्के लोकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. आरोग्य कर्मचारी, आघाडीवरील कामगार-कर्मचारी आणि ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना दोन कोटी ४० लाख वर्धक मात्रा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, १२ ते १४ वयोगटातील ४५ टक्के लाभार्थीनाही पहिली मात्रा देण्यात आली असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

  • कुठे मिळेल ? सर्व खासगी लसीकरण केंद्रांवर

  • केव्हापासून मिळेल?  रविवार, १० एप्रिलपासून

  • पात्र कोण?  करोना लशीच्या दोन मात्रा घेऊन ९० दिवस झालेले.

कोरिया खुली बॅडिमटन स्पर्धा : श्रीकांत, सिंधू विजयी :
  • भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी शुक्रवारी दिमाखदार विजयांसह कोरिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने बुसानन ओंगबामरुंगफानवर २१-१०, २१-१६ असा विजय मिळवला.

  • तिसऱ्या मानांकित सिंधूने बुसाननविरुद्ध १७-० असे वर्चस्व राखले. पुढील फेरीत सिंधूची कोरियाच्या अ‍ॅन सेयंगशी गाठ पडेल. सेयंगने सिंधूला गतवर्षी दोनदा हरवले होते.

  • पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीतील माजी अग्रस्थानावरील खेळाडूंमधील झुंज रंगतदार ठरली. पण  श्रीकांतने कोरियाच्या सन वॅन हू याच्यावर २१-१२, १८-२१, २१-१२ अशी मात केली. श्रीकांतची सन वॅनविरुद्ध ४-७ अशी कामगिरी होती. यापैकी शेवटचे तिन्ही सामने श्रीकांतने गमावले होते.

  • श्रीकांतचा उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या तिसऱ्या मानांकित जोनाथन ख्रिस्टीशी सामना होईल. पुरुष एकेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. कॅग मिनहुक आणि सेओ सेयंगजाई जोडीविरुद्ध त्यांनी २०-२२, २१-१८, २०-२२ असा पराभव पत्करला.

१० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस; केंद्र सरकारचा निर्णय :
  • करोना व्हायरसच्या बूस्टर डोसबाबत मोठी माहिती समोर येत आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना करोनाचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार १० एप्रिलपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकाना बूस्टर डोस मिळेल. खासगी केंद्रांवर हा बूस्टर डोस दिला जाणार आहे.

  • एखाद्याला बूस्टर डोस घ्यायचा असेल, तर खासगी हॉस्पिटलमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय १८ वर्षांहून अधिक आहे आणि दोन्ही डोस घेतले असून, दुसऱ्या डोसला ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे, ते करोनाचा प्रतिबंधात्मक डोस घेऊ शकतात. खासगी केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

  • तसेच आरोग्य सेवा कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहील आणि त्याला गती दिली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगणयात आलं आहे.

  • या अगोदर केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच बूस्टर डोस दिला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांना बूस्टर डोस कधी मिळणार याची प्रतिक्षा होती.

०९ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.