चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ जून २०२१

Updated On : Jun 08, 2021 | Category : Current Affairs


अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस २० जुलैला अंतराळात जाणार :
 • अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस जुलै महिन्यात अंतराळ प्रवास करणार आहेत. जेफ बेजोस यांनी ब्ल्यू ओरिजिन नावाची स्पेस कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून जेफ बेजोस यांनी अंतराळ पर्यटनाची घोषणा केली होती. या कंपनीच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळ दर्शन घडवण्यात येणार आहे. कंपनीकडून पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या मानवसहित स्पेसक्राप्टमध्ये ते असणार आहेत.

 • जेफ बेजोसने आपल्या स्पेसक्राफ्टला एनएस-१४ नाव दिलं आहे. या स्पेस क्राफ्टचं चाचणी यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जेफ बेजोस अंतराळात जाणारे पहिले श्रीमंत व्यक्ती असतील. अ‌ॅमेझॉनचे कार्यकारी अधिकारी पद सोडल्यानंतर १५ दिवसांनी ते अंतराळात जाणार आहेत. जेफ बेजोस ५ जुलैला आपलं कार्यकारी अधिकारी पद सोडणार आहेत.

 • कंपनीने लाँच चाचणीदरम्यान नव्या बूस्टर आणि अपग्रेड केलेल्या कॅप्सूलचं परीक्षण केलं होतं. या अपग्रेडेड वर्जनमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा तपासल्या गेल्या. या स्पेसक्राफ्टमध्ये पुश-टू-टॉक सिस्टम, प्रत्येक सीटवर नवीन क्रू अलर्ट सिस्टम, कॅप्सुलमध्ये आवाज कमी करण्यासाठी कुशन लाइनिंग, थंडावा आणि आर्द्रता नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली आहे.

 • न्यू शेपर्ड पूर्णत: ऑटोनॉमस सिस्टम आहे. या प्रवासात जेफ बेजोस आपल्या भावासह अंतराळात जाणार आहेत. “मी पाच वर्षांचा असल्यापासून अंतराळात प्रवास करण्याचं स्वप्न पाहत होतो. आता २० जुलैला मी माझ्या भावासह हा प्रवास करणार आहे. माझ्या सर्वात चांगल्या मित्रासोबत रोमांचकारी प्रवास असणार आहे” अंस त्यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहीलं आहे. या स्पेसक्राफ्टमधून प्रवास ११ मिनिटांचा असणार आहे. या दरम्यान स्पेसक्राफ्ट १०० किलोमीटर उंचीवर असणार आहे.

सर्वाना मोफत लस :
 • करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा सोमवारी केली. नवे धोरण २१ जूनपासून लागू होणार असून, संपूर्ण लसखरेदी केंद्राकडूनच करण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या आर्थिक ओझ्यातून राज्यांची मुक्तता होणार आहे.

 • केंद्राच्या लसीकरणाच्या दुहेरी धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात ओढलेले कठोर ताशेरे आणि राज्यांच्या वाढत्या दबावानंतर आता केंद्राने ‘एक देश, एक लसीकरण’ धोरण स्वीकारले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. आता राज्यांना लसखरेदी करावी लागणार नसून, लसनिर्मितीपकी ७५ टक्के लसमात्रा केंद्र सरकार लस उत्पादकांकडून थेट खरेदी करेल व ती राज्यांना वितरित करेल. उर्वरित २५ टक्के लसमात्रा खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडून खरेदी करता येतील, असे मोदींनी स्पष्ट केले.

 • विद्यमान विकेंद्रित धोरणानुसार, ४५ वर्षांपेक्षा जास्त वर्षे वयोगटातील व्यक्तींचे केंद्राकडून मोफत लसीकरण केले जाते. १८-४४ या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी राज्य सरकारांना लसउत्पादकांकडून लसखरेदी करावी लागते. देशांतर्गत लसनिर्मितीतील ५० टक्के वाटा केंद्र सरकार खरेदी करत असून उर्वरित २५ टक्के लसमात्रा प्रत्येकी राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना खरेदी करता येतात.

 • पण, आता फक्त केंद्र सरकार लसखरेदी करणार असल्याने राज्यांना जागतिक निविदेद्वारे वा अन्य राज्यांशी स्पर्धा करून जास्त किमतीला लसखरेदी करावी लागणार नाही. त्यामुळे राज्यांच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भारही वाचू शकेल.

‘इस्रो’कडून तीन प्रकारची श्वसनयंत्रे :
 • भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या वैज्ञानिकांनी तीन प्रकारची श्वसनयंत्रे तयार केली असून त्याचे तंत्रज्ञान हस्तांतर लवकरच उद्योगांना केले जाणार आहे. करोना १९ साथीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना श्वसनयंत्रे लावण्याची वेळ आली होती.

 • इस्रोने तयार केलेली श्वसन यंत्रे आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाऊ शकतात. त्यातील एकाचे नामकरण ‘प्राण’ (प्रोग्रॅमेबल रेस्पिरेटरी असिस्टन्स फॉर दी नीडी एड) असे करण्यात आले आहे. दुसऱ्या यंत्राचे नाव ‘अंबू’ म्हणजे (आर्टिफिशियल मॅन्युअर ब्रीदिंग) असे करण्यात आले आहे.  दोन्ही यंत्रे अत्याधुनिक असून त्यात दाब संवेदक, प्रवाह संवेदक व प्राणवायू संवेदक आहेत.

 • पीप - म्हणजे पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशरचाही यात वापर करण्यात आला असून त्यात नियंत्रण झम्डपांचाही समावेश आहे. श्वसनयंत्राच्या मदतीने रुग्णाला आवश्यक तेवढाच प्राणवायू पुरवला जातो. प्राणवायूमिश्रित हवा रुग्णाच्या फुप्फुसात सोडली जाते. पण हे प्रमाण योग्य असावे लागते.

 • इस्रोने म्हटले आहे, की श्वसन यंत्राने दोन पद्धतींनी प्राणवायू देता येतो. त्यात सातत्यपूर्ण श्वसनाची व्यवस्थाही नियंत्रित पद्धतीने केली आहे. त्यासाठी अलगॉरिदमचा वापर केला असून जर काही धोका निर्माण झाला तर आपोआप सुरक्षा झडपा उघडून बॅरोट्रॉमा, अ‍ॅसफिक्सिया व अ‍ॅपनिया हे प्रकार टाळले जातात. दोन्ही प्राणवायू यंत्रे ही अतिदक्षता विभागात सुरक्षित पद्धतीने वापरली जाऊ शकतात. त्यात जीवाणू व विषाणू यांना दूर करणारी  हवेची गाळणी किंवा फिल्टर्स बसवलेले आहेत.

१५ वैद्यकीय महाविद्यालयांत ६०१ पदव्युत्तरच्या जागा वाढणार :
 • देशात सर्वाधिक करोनाचे रुग्ण व मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले. राज्यातील बऱ्याच जिल्ह्य़ांत रुग्णांच्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्टरांचीचा तुटवडा जाणवला. ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यातील १५ वैद्यकीय महाविद्यालयांत पदव्युत्तरच्या ६०१ जागा वाढवण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (एनएमसी) पाठवला आहे.

 • विविध जिल्ह्य़ांतील १५ महाविद्यालयांमध्ये बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये अथवा महापालिकेच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. २०२२-२३ या शैक्षणिक सत्रापासून हे वाढीव प्रवेश व्हावेत यासाठी शासनासह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडूनही प्रयत्न सुरू आहेत.

 • ‘एनएमसी’ला सादर झालेल्या प्रस्तावानुसार, मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजला ९२, चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ८९, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ६७, गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ६४, पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजला ६३, नागपूरच्या  मेडिकलला ५०, नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ३५, पुण्याच्या पी. सी. एम. सी. जीपी इन्स्टिटय़ूटला २४, औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला २२ पदव्युत्तरच्या जागा वाढवून मागितल्या आहेत.

 • कोल्हापूरच्या आर. सी. एस. एम. शासकीय महाविद्यालयाला १८, मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १६, नागपूरच्या  मेयोला १४, धुळेच्या एस. बी. एच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १३, यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ३१, बीडच्या एस. आर. टी. आर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ३ पदव्युत्तर जागा वाढवून मागण्यात आल्या आहेत.

बारावीची परीक्षा रद्द केल्याने पदवी प्रथम वर्षांच्या प्रवेशावर संकट :
 • राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली. बारावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षण विभागाने अद्याप कुठलाही मार्ग सुचवलेला नाही. शिवाय पदवी प्रथम वर्षांला अनेक अभ्यासक्रम असल्याने प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रवेशपूर्व परीक्षा (सामायिक परीक्षा) घेणे शक्य नाही. त्यामुळे  व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांसमोर आहे.

 • करोनामुळे प्रथमच सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यापूर्वी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले. आता केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणेच राज्यातही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीनंतर अभियांत्रिकीसह आर्किटेक्ट, औषध निर्माण व कृषी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी राज्यात सीईटी परीक्षा घेतली जाते.

 • बारावीची परीक्षा रद्द झाल्यास विज्ञान, वाणिज्य, कला या पारंपरिक अभ्यासक्रमासह तीन व चार वर्षीय इतर पदवी अभ्यासक्रमासाठी सामयिक प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी महाविद्यालयांकडून होऊ लागली आहे. मात्र, पदवी प्रथम वर्षांला अनेक अभ्यासक्रम असल्याने सीईटी घेणे अडचणीचे जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी एकसूत्री कार्यक्रम आखावा अशी मागणी होऊ लागली आहे.

IPL २०२१चं वेळापत्रक झालं जाहीर..! ‘या’ खास दिवशी होणार अंतिम सामना :
 • करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये करोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतर लीग पुढे ढकलण्यात आली. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. आता या लीगच्या आयोजनाची तारीखही समोर आली आहे.

 • एएनआयच्या वृत्तानुसार, १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशा कालावधीत आयपीएल २०२१चा उर्वरित टप्पा खेळवण्यात येणार आहे. लीगचा अंतिम सामना १५ तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होणार आहे.

 • आयपीएल २०२० प्रमाणे आयपीएल २०२१चे उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी त्यांची संमती दर्शविली आहे.

०८ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

टिप्पणी करा (Comment Below)