चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ जून २०२०

Date : 8 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दहावी बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिलं स्पष्टीकरण : 
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारणपणे हे निकाल दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरूवातीला लागणारा दहावी-बारावीचे निकाल यंदा लॉकडाउनमध्ये अडकला आहे. गेल्या आठवडाभरापासून दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियावर निकालासंदर्भात बातम्या प्रकाशित होत आहेत. त्यासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  • राज्यातील दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. अद्याप निकालाची तारीख ठरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी निकालाच्या कोणत्याही तारखांवर विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी लोकसत्ताला दिली आहे.

  • करोना विषाणू संसर्गामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा दहावी – बारावीचा निकाल जाहीर करता आलेला नाही. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा निकाल जाहीर होण्यास थोडा उशीर होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांत दहावी – बारावीच्या निकालाच्या तारखांची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी निकालाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले.

रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड मिळणारे जावेद अख्तर ठरले पहिले भारतीय :
  • सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे आणि विचारक्षमता यासाठी अख्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान प्राप्त करणारे जावेद अख्तर पहिले भारतीय ठरले आहेत. यापूर्वी हा पुरस्कार अमेरिकेतील विनोदवीर बिल मगर आणि दार्शविक क्रिस्टोफर हिचेंस यांना देण्यात आला होता.

  • ७५ वर्षीय जावेद अख्तर ट्विटरवर सक्रीय असतात. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते सोशल मीडियाद्वारे मत व्यक्त करताना दिसतात. नुकतंच त्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), तबलिगी जमात, इस्लामोफोबिया यावरुन सडेतोड मत व्यक्त केले होते.

  • जावेद अख्तर यांना पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी तसेच पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांना २०२०मधील रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार देण्यात आला आहे.

५ वर्षात मोदी सरकार देणार ५ कोटी नोकऱ्या; गडकरींनी व्यक्त केला विश्वास :
  • “एमएसएमईचं अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे या क्षेत्रावर संकट आलं आहे. केंद्र सरकारनं सर्व क्षेत्रांना उभारी देण्यासाठी २० लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. यापैकी तीन लाख कोटी रूपयांचा फायदा एमएसएमई क्षेत्राला होणार आहे,” अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसंच पुढील पाच वर्षांमध्ये पाच कोटी नोकऱ्यांचं उद्दिष्ट्य ठेवण्यात आल्याचंही ते म्हणाले.

  • “करोनामुळे नक्कीच एमएसएमई क्षेत्रासोबतच संपूर्ण उद्योग क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु याची एक सकारात्मक बाजू आहे,” असंही गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी पीपीई किट्सवरही भाष्य केलं.

  • “दोन महिन्यांपूर्वी आपण पीपीई किट्सचं उत्पादन करत नव्हतो. आपण चीनमधून पीपीई किट्स मागवले होते. परंतु आता देशात एका दिवसांत ३ लाख पीपीई किट्सचं उत्पादन करण्यात येत आहे. आता पीपीई किट्सच्या निर्यातीचा विचार सुरू आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

सीमांचे रक्षण करण्यात भारत यशस्वी :
  • नवी दिल्ली : अमेरिका व इस्रायल या दोन राष्ट्रांव्यतिरिक्त कोणता देश आपल्या सीमांचे रक्षण करण्यात यशस्वी झाला असेल तर तो फक्त भारतच आहे, हे आता जगानेही मान्य केले आहे, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी आभासी सभेत काढले.

  • एक काळ होता, जेव्हा कोणीही आपल्या देशाच्या सीमा ओलांडून घुसखोरी करत असे. आपल्या जवानांचे शीर कापण्याचे अघोरी प्रकारही केले गेले पण, दिल्लीतून (तत्कालीन केंद्र सरकार) एक हुंकार देखील उमटला नाही. पण, आता भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात उरी आणि पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला केला गेला. पण, सीमेपलीकडे जाऊन ‘सर्जकिल स्ट्राइक’ केला गेला. शत्रूच्या घरात जाऊन त्यांचा पराभव केला गेला, असेही शहा म्हणाले.

  • सीमेच्या रक्षणासंदर्भात शहा यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला टोला लगावला असला तरी सध्या लडाखमध्ये चीनशी सीमाप्रश्नावरून सुरू असलेल्या संघर्षांचा उल्लेख केला नाही.

अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल - कोटक महिंद्रा सीईओ :
  • भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे रुळावर येण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल. यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता भासेल. सरकारी प्रोत्साहनानेच हे उद्दिष्टय साध्य करता येईल असे मत कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्त केले. भारतीय औद्योगिक महासंघ अर्थात सीआयआयचे ते नवीन अध्यक्ष आहेत.

  • भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेग पकडेल असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवडयात सीआयआयच्या कार्यक्रमात व्यक्त केला होता. त्यावर बोलताना उदय कोटक म्हणाले की, “करोनानंतर आपण पूर्णपणे नव्या काळामध्ये असू. अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि त्याचे मुल्यमापन सरासरीच्या आधारावर करणे योग्य ठरणार नाही.

  • सीआयआयमध्ये आम्ही विकासासंबंधी अंदाज किंवा जीडीपी किती राहिल याबद्दल अंदाज वर्तवायचा नाही असे ठरवले आहे.” हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मते व्यक्त केली.

०८ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.