चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ जुलै २०२१

Date : 8 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याचे आठ जण :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले असून या चार मंत्र्यांमुळे राज्याला मिळालेल्या मंत्रीपदाची संख्या आठ झाली आहे.  माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर व अकोल्याचे खासदार व शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांची मात्र वगळण्यात आले आहे.

  • महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (रस्तेबांधणी व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री), पियुष गोयल (रेल्वेमंत्री व उद्य्ोगमंत्री) व ग्राहक संरक्षण व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे या तिघांचे मंत्रीपद कायम राहिले आहे. मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एकमेव घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.

  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नव्या रचनेत डॉ. भारती पवार या राज्यातून मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला मंत्री आहेत. नारायण राणे यांच्यामुळे मराठा, कपिल पाटील यांच्यामुळे आगरी, भागवत कराड यांच्यामुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे.

मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे :
  • पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथील ३५ वर्षांचे खासदार निसिथ प्रामाणिक हे नव्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री असून, ७२ वर्षांचे सोम प्रकाश हे सर्वात ज्येष्ठ आहेत. सध्या मंत्रिमंडळात ७७ मंत्री आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ५० वर्षांहून कमी वयाच्या मंत्र्यांमध्ये स्मृती इराणी (४५), किरेन रिजिजु (४९), मनसुख मंडाविया (४९), कैलाश चौधरी (४७), संजीव बालयान (४९), अनुराग ठाकूर (४६),

  • डॉ. भारती पवार (४२), अनुप्रिया पटेल (४०), शंतनू ठाकूर (३८), जॉन बारला (४५) व डॉ. एल. मुरुगन (४४) यांचा समावेश आहे.

  • नव्याने शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांचे सरासरी वय ५६ वर्षे असून, नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे आहे. यापूर्वीच्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ६१ वर्षे होते.

राज्यभरात आज ९ हजार ५५८ नवीन करोनाबाधित ; १४७ रूग्णांचा मृत्यू :
  • राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. तर, दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कमी तर कधी जास्त असल्याचे दिसत आहे. याशिवाय अद्यापही करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच आहे.

  • आज दिवसभरात राज्यात आज ९ हजार ५५८ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ८ हजार ८९९ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १४७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

  • राज्यात आजपर्यंत एकूण ५८,८१,१६७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.०५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्के एवढा आहे.

राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर :
  • शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी बॅक टू स्कूल मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. गावस्तरावर समिती स्थापना करणे आवश्यक असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी देखील आवश्यक असणार आहे.

  • यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकात म्हटले आहे की, १५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनी ठराव करून खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

  • ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.

इंग्लंडनं रचला इतिहास, डेन्मार्कला नमवत पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल :
  • यूरो कप २०२० स्पर्धेतील उपांत्य फेरीत डेन्मार्कला नमवत इंग्लंडनं इतिहास रचला आहे. यूरो चषकाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच इंग्लंडनं  जागा मिळवली आहे. इंग्लंडनं डेन्मार्कचा २-१ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली.

  • पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक गोल नोंदवला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात विजयी गोल मारण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु होती. मात्र ९० मिनिटांचा खेळ संपला तरी दोन्ही संघांना विजयी गोल मारता आला नाही. त्यामुळे सामन्याच्या निकालासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला.

  • अतिरिक्त वेळेत इंग्लंडने २-१ ने आघाडी घेतली. हॅरी केननं अतिरिक्त वेळेतील १४ मिनिटाला म्हणजेच १०४ व्या मिनिटाला गोल झळकावला. त्यानंतर डेन्मार्कच्या संघाला बरोबरी साधण्यात अपयश आलं. आता अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना इटलीसोबत असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचं निधन :
  • हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरभद्र सिंग यांचं निधन झालं आहे. गुरुवारी शिमला येथे पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असणारे विरभद्र सिंग यांनी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनक राज यांनी दिली आहे.

  • विरभद्र सिंग यांना सोमवारी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं अशी माहिती डॉक्टर जनक राज यांनी दिली आहे. नऊ वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार राहिलेल्या विरभद्र सिंग यांनी सहा वेळा हिमालच प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं.

  • विरभद्र सिंग यांना जून महिन्यात करोनाची लागण झाली होती. दोन महिन्यात दोन वेळा त्यांनी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. याआधी १२ एप्रिलला त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना चंदिगडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

०८ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.