चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 06, 2021 | Category : Current Affairs


अमेरिकी, अफगाणी नागरिक ओलिस असलेली सहा विमाने तालिबानच्या ताब्यात; अमेरिकेची माहिती :
 • तालिबानने अमेरिकन नागरिक आणि कायमस्वरूपी रहिवाशांच्या सहा विमानांना ताब्यात घेतलं असून त्यांना सोडण्यापासून रोखत आहे. तालिबानने विमानातील लोकांना ओलिस ठेवल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचे प्रतिनिधी मायकल मॅककॉल यांनी फॉक्स न्यूजला रविवारी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी दावा केला की, सहा विमाने मजार-ए-शरीफ आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून थांबवण्यात आली आहे.

 • जोपर्यंत अमेरिका तालिबानला अफगाणिस्तानचे सरकार म्हणून मान्य करत नाही, तोपर्यंत ही विमाने उड्डाणे ओलिस ठेवली जाणार आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असला तरी अमेरिकन अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे तसे मानण्यास नकार दिला आहे.

 • परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्यांनी कायदेकर्त्यांना सांगितले की, विमानांना दोहा, कतारला जाण्याची परवानगी असेल. तिथे जे अफगाणी विशेष स्थलांतरित व्हिसासाठी अर्ज करत आहे, त्यांच्या अर्जांवर प्रक्रिया करत आहे. मात्र जेव्हा तालिबान उड्डाणांना परवानगी देईल तेव्हाच या लोकांचं बाहेर पडणं शक्य होईल.

 • अडकलेल्या लोकांमध्ये १९ अमेरिकन नागरिक आणि २ ग्रीन कार्ड धारकांसह ६०० ते १२०० लोकांचा समावेश आहे, ही संख्या अधिक दखील असून शकते अशी माहिती मिळतीए. यामध्ये महिला पर्वतारोही, स्वयंसेवी संस्था कामगार, पत्रकार आणि धोका असलेल्या महिलांचा समावेश आहे, असे असिंडच्या कार्यकारी संचालक मरीना लेग्री यांनी सांगितले.

पुस्तकासाठी मी पुन्हा येईन; भारतात येण्याचे सलमान रश्दींचे संकेत :
 • प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी हे आपल्या पुढच्या कादंबरीसाठी लवकरच भारतात येतील असे संकेत त्यांनी दिले आहेत. सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे असून सध्या ते न्यूयॉर्कमध्ये असतात. टाईम्स लीट फेस्टमध्ये रविवारी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

 • रश्दी म्हणाले, गेली १० वर्षे पाश्चिमात्य कादंबरी, पुस्तकं लिहिल्यानंतर मी पूर्णपणे भारतीय कादंबरी लिहिण्याच्या विचारात आहे. ज्यासाठी मला भारतात यावं लागेल. २०१२ मध्ये सलग जयपूर फेस्टमधून माघार घेतल्यानंतर भारतीय लिटफेस्टमध्ये पहिल्यांदाच दिसले आहेत.

 • मी मुंबईत शेवटच्या वेळी सात वर्षांपूर्वी होतो.एकतर धार्मिक आक्षेपांमुळे किंवा सुरक्षा कार्यात अडकल्याने काही वेळा माझं भारतात येणं बंद होण्याची शक्यता होती, खूप अडचणीही येत होत्या. “जर तुमच्यासोबत बंदुका असलेल्या पुरुषांची फौज असेल तर कुलाबा कॉजवेवर तुमच्या मित्रांसोबत कॉफी पिणे शक्य नाही”, असंही त्यांनी हसत हसत म्हटलं आहे.

 • सलमान रश्दी यांच्या इस्लामवर वादग्रस्त भाष्य करणाऱ्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर १३ देशांनी बंदी घातली होती. इराणी धर्मगुरूंनी फतवा काढल्याने त्यांना आपली ओळख बदलून देशोदेशी फिरत राहावं लागलं होतं.

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचे शक्तिप्रदर्शन :
 • हरियाणात शेतकऱ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर, रविवारी उत्तर प्रदेशात मुझफ्फनगरमधील महापंचायतीत शेतकरी संघटनांनी भाजपविरोधातील आक्रमक आंदोलनाचे रणिशग फुंकले. इथे आगामी सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होत असून योगी सरकारविरोधात मिशन उत्तर प्रदेश सुरू केले जाणार असून २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. महापंचायतीला १० लाख शेतकऱ्यांची गर्दी झाल्याचा दावा मोर्चाने निवेदनाद्वारे केला.

 • या देशाची संपत्ती विकणारे कोण (मोदी) आहेत हे लोकांना समजले पाहिजे. त्यासाठी मुझफ्फरनगरसारख्या जंगी महापंचायती घेतल्या जातील. उत्तर प्रदेश वा उत्तराखंड भाजपपासून वाचवायचा नाही तर, संपूर्ण देशाला वाचवले पाहिजे. मोदी सरकार शेतजमीन, महामार्ग, वीज, आयुर्वमिा कंपनी, बँका अशी देशाची सगळी संपत्ती अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या कंपन्यांना विकत आहे.

 • अवघा देश मोदी सरकारने विकायला काढला आहे असा आरोप करत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी रविवारी किसान महापंचायतीतील भाषणात केला. पश्चिम उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर हा टिकैत यांच्या शेतकरी संघटनेचा गड मानला जातो.  २०१७ मध्ये या भागांतील ७२ विधानसभा मतदारसंघांत भाजपने वर्चस्व मिळवले होते.

‘किसान महापंचायती’ देशभर :
 • महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतानाच; उत्तर प्रदेशसह शेजारच्या राज्यांतील हजारो शेतकऱ्यांनी रविवारी मुझफ्फरनगर येथे ‘किसान महापंचायत’ आयोजित केली. ‘देश वाचवण्याच्या उद्देशाने’ हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

 • केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमधील शासकीय इंटर कॉलेज मैदानावर या महापंचायतीचे आयोजन केले होते.

 • ‘असे मेळावे देशभर घेतले जातील. आम्हाला देश विकला जाण्यापासून रोखायचा आहे. शेतकऱ्यांना व देशाला वाचवायला हवे, त्याचप्रमाणे उद्योग, कर्मचारी आणि युवक यांनाही वाचवणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे’, असे भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले. मेधा पाटकर व योगेंद्र यादव हे या मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित होते.

क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी घडवावेत :
 • मुलांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे काम कौतुकास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्षकांच्या कामाचा शिक्षक दिनानिमित्त  गौरव केला. कोविड साथीत कमी काळात शिक्षकांनी डिजिटल माध्यमांचे शिक्षण घेऊन मुलांचे शिक्षण थांबू दिले नाही, असेही ते म्हणाले.

 • देशातील ४४ शिक्षकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ आभासी पद्धतीने प्रदान करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात अभिनव पद्धती विकसित करण्याच्या योगदानासाठी त्यांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

 • प्रत्येक मुलाची क्षमता व बुद्धिमत्ता वेगळी असते, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले, की  शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध गरजा व हित  लक्षात घेऊन त्यांचा सर्वागीण विकास करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक मुलाची  क्षमता , सामाजिक पार्श्वभूमी तसेच आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा उपयोग करून घेत शिक्षकांनी त्यांच्याकडे  लक्ष द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.

विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी : युक्रेनने फ्रान्सला बरोबरीत रोखले :
 • जगज्जेत्या फ्रान्सला विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीच्या सलग दुसऱ्या सामन्यात केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. बोस्निया आणि हर्जेगोव्हिनापाठोपाठ युक्रेनने फ्रान्सला १—१ असे बरोबरीत रोखले. डेन्मार्कने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवताना फेरो आयलंडवर १-० अशी मात केली. हा पात्रता फेरीतील डेन्मार्कचा सलग पाचवा विजय ठरला. तसेच हॉलंड आणि नॉर्वे या संघांनाही विजय मिळवण्यात यश आले.

 • पात्रतेच्या ‘ड’ गटामधील फ्रान्स आणि युक्रेन यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत संपला. मायकोला शापरेन्कोने ४४ व्या मिनिटाला गोल केल्याने या सामन्यात मध्यंतराला युक्रेनकडे १-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात फ्रान्सने खेळात सुधारणा केली. ५० व्या मिनिटाला आघाडीच्या फळीतील अँथनी मार्शियालने गोल करत फ्रान्सला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर मात्र युक्रेनचा भक्कम बचाव फ्रान्सला भेदता आला नाही आणि हा सामना बरोबरीतच संपला. फ्रान्सचे पात्रता फेरीत पाच सामन्यांमध्ये नऊ गुण झाले आहेत.

 • दुसरीकडे, हॉलंडने माँटेनिग्रोचा ४-० असा धुव्वा उडवला. त्यांच्याकडून मेम्फिस डिपेने दोन, तर जिनी वाईनआल्डम आणि कोडी गॅकपोने प्रत्येकी एक गोल केला. तसेच नॉर्वेने लात्व्हियाचा आणि रशियाने सायप्रसचा २-० असा, तर स्कॉटलंडने मोल्दोवाचा आणि क्रोएशियाने स्लोव्हाकियाचा १-० असा पराभव केला.

०६ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

टिप्पणी करा (Comment Below)