टी-२० विश्वचषकात भारताने स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भारत उपांत्य फेरीत जाणार की नाही याकडे सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळेच भारत कोणकोणत्या परिस्थितीत उपांत्या फेरीत दाखल होऊ शकतो यावर चर्चांना उधाण आलंय. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडाळाने (ICC) देखील ट्वीट करत भारताच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर भाष्य केलंय.
आयसीसीने आपल्या ट्वीटमध्ये स्कॉटलंडवरील दणदणीत विजयचा उल्लेख केलाय. तसेच भारताचे उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच एका लेखाची लिंक शेअर केली. त्यात भारत कोणत्या परिस्थितीत उपांत्या फेरीत पोहचू शकतो यावर भाष्य केलं.
न्यूझीलंड जिंकल्यास काय होईल - अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंड जिंकल्यास ‘मेन इन ब्लॅक’ अगदी सहजपणे उपांत्य फेरी गाठेल. त्यावेळी भारताचं नेट रन रेटही (NRR) महत्त्वाचं राहणार नाही. अशा परिस्थितीत भारत थेट विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर जाईल. या विजयासह किवीचे ८ पॉईंट होतील. हा टप्पा गाठणं भारताच्या आवाक्याबाहेर राहिल. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय हा भारतासाठीच सर्वात वाईट शक्यता आहे.
अफगाणिस्तान जिंकल्यास काय होईल - न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला तर भारतासाठी आशेचा किरण कायम राहिल. मात्र, यास्थितीत उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी अफगाणिस्तानचीही दावेदारी राहील. भारताला आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी पुढील नामिबिया विरोधातील सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल तरच नेट रन रेटच्या आधारावर भारत उपांत्या फेरी गाठू शकेल. मात्र, अफगाणिस्तानचं नेट रन रेट देखील निर्णयाक ठरेल.
महापुराच्या दुर्घटनेनंतर केदारनाथ पूर्ण गौरवाने उभे राहील, असा विश्वास होता. तसा माझा आतला आवाज सांगत होता. हा विश्वास पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. केदारनाथची सेवा करण्यापेक्षा पुण्य दुसरे नाही. येथे केलेले कार्य हे ईश्वरी कृपा आहे. याचे श्रेय कोणी घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान शुक्रवारी केदारनाथ धाममध्ये होते. त्यांनी येथील विकासकामांचा आढावा घेतला. नंतर मंदिराच्या गर्भगृहात १८ मिनिटे प्रार्थना केली. त्यांनी आदिगुरू शंकराचार्यांच्या १२ फूट उंच आणि ३५ टन वजनाच्या मूर्तीचे अनावरणही केले. यानंतर त्यांनी पुतळ्याजवळ बसून पूजा केली. ही मूर्ती म्हैसूर येथील एका शिल्पकाराने बनवली आहे. आदिगुरू शंकराचार्य समाधीची मूळ मूर्ती २०१३ मध्ये महापुरात वाहून गेली होती. यावेळी मोदींनी ४०० कोटीपेक्षा अधिक रुपयांचे पुनर्बांधणी प्रकल्पांचे उद्घाटन केले.
आज मी सैनिकांच्या भूमीवर आहे. सणाचा आनंद मी माझ्या सैनिकांसोबत साजरा केला आहे. १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. गोवर्धन पूजेच्या दिवशी मला केदारनाथ धाम येथे दर्शन-पूजा करण्याचे भाग्य लाभले आहे, असे मोदी म्हणाले.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आता कुटुंबासह दुसऱ्या देशात स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी यासाठी ब्रिटनची निवड केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. म्हणजेच अंबानींचे दुसरे घर आता लंडनमध्ये असेल.
माहितीनुसार अंबानी कुटुंब लंडनला स्थलांतरित होण्याचा विचार करत आहेत. त्यांनी स्टोक पार्क, बकिंगहॅमशायर (Buckinghamshire), लंडन येथे ३०० एकरची मालमत्ता घेतली. जिथे ते कुटुंबासह स्थायिक होतील, अशी माहिती मिड-डे ने दिली आहे.
अंबानींच्या नवीन घरात ४९ बेडरूम आहेत. तसेच अत्याधुनिक उपचार सुविधाही उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा महाल नुकताच सेट करण्यात आला आहे. अहवालानुसार, लॉकडाऊन आणि साथीच्या काळात अंबानींच्या कुटुंबाने त्यांचा बहुतांश वेळ त्यांच्या मुंबईत असलेल्या होम अँटिलियामध्ये घालवला आहे.
तेव्हाच अंबानी कुटुंबांच्या लक्षात आले की त्यांना घर म्हणण्यासाठी आणखी एक मालमत्ता आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी लंडनची मालमत्ता आपले मुख्य घर बनवण्याचा निर्णय घेतला आहे, जी या वर्षाच्या सुरुवातीला अंबानींनी ५९२ कोटी रुपयांना विकत घेतली होती.
करोना संसर्गाबाबत युरोप हे पुन्हा एकदा जगाचे मुख्य केंद्र होऊ शकतं असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे विभागीय संचालक डॉ हांस क्लाज यांनी दिला आहे. युरोपममधील ५३ देशांमध्ये गेल्या एक महिन्याचा आढावा घेतला तर करोना संसर्गाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर पुन्हा एकदा गेल्या वर्षाप्रमाणे करोना संसर्गाची स्थिती ही युरोपमध्ये निर्माण होऊ शकते डॉ हांस क्लाज यांनी स्पष्ट केलं आहे.
युरोपमधील देशांकडे पुरेसा लशींचा साठा आहे. मात्र म्हणावं तसं लसीकरण झालेलं नाही. उलट काही देशांमध्ये ४० टक्के पण लसीकरण झालेलं नाही. असं असतांना विकसनशील देशांना लस पाठवल्या जात आहेत. तेव्हा उपलब्ध लसींद्वारे देशातील नागरीकांचे लसीकरण करावे, नाहीतर फेब्रुवारीपर्यंत परिस्थिती चिघळेल असं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं आहे.
करोनाची लस उपलब्ध झाल्यावर नियम पाळण्यात लोकांमध्ये बेफिकीरपणा आलेला आहे. करोनाच्या नियमित चाचण्या करणे, करोना बाधित व्यक्तीशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, घरात वायुवीजन व्यवस्था योग्य ठेवणे हे करणे आवश्यक आहे. विशेषतः हिवाळा सुरु होत असल्याचा पार्श्वभुमिवर सतर्क रहाणे आवश्यक असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.