चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ सप्टेंबर २०२०

Date : 5 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी चांगले काम करत आहेत, अमेरिकन भारतीय मला मतदान करतील - ट्रम्प :
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून ते सध्या चांगलं काम करत आहेत. असे वक्तव्य अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. तीन नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्याधर्तीवर ट्रम्प संबोधित करत होते. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी मोदी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

  • अमेरिकन भारतीय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या नात्यावर ट्रम्प यांनी प्रकाश टाकला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मला विश्वास आहे की, तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीत अमेरिक भारतीय नागरिक मला मतदान करतील. अमेरिकन भारतीय नागरिकांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आपल्याला समर्थन आहे. अमेरिकेतील भारतीय लोक मला मतदान करतील असा विश्वास आहे.

  • ट्रम्प यांचा “आणखी चार वर्ष” हा प्रचाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ ट्रम्प विक्ट्री फायन्स कमेटीचे राष्ट्रीय अध्यक्ष किम्बर्ली गुइलफॉय यांनी ट्वीट केला होता आणि त्यांचा मुलगा डोनाल्ड ट्राइ जूनियर यांनी रिट्विट केला होता. या व्हिडीओवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं डोनाल्ड ट्रम्प उत्तर देत होते. या व्हिडीओत गेल्यावर्षी ह्यूस्टनमध्ये मोदी ट्रम्प यांच्या संयुक्त भाषण आणि यावर्षी अहमदाबाद येथे झालेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमातील एक छोटी क्लीप आहे.

आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत राहुल तेलरांधे यांनी टिपलेल्या छायाचित्रास पुरस्कार :
  • जागतिक छायाचित्रण दिनानिमित्य आयोजित आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत वर्धा येथील युवा छायाचित्रकार राहुल तेलरांधे यांनी काढलेल्या छायाचित्रास पुरस्कार मिळाला आहे.

  • नागपूरच्या फोटोग्राफर अ‍ॅण्ड डिझाईनर असोसिएशनतर्फे ही ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. करोना व टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेसाठी ‘स्ट्रीट लाईफ ’ हा विषय ठरवण्यात आला होता. स्पर्धेला भारतातील विविध राज्यातील छायाचित्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. राहूल तेलरांधे यांनी आपल्या कॅमेराच्या तीक्ष्ण नजरेतून रस्त्यावरील एका मजूर कुटुंबाला टिपले. त्याच्या या छाचित्राला तृतीय पुरस्कार मिळाला. स्पर्धेचे परीक्षण प्रसिध्द छायाचित्रकार सी.आर. शेलारे यांनी केले होते.

  • हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वर्धा छायाचित्रकार संघटनेने तेलरांधे यांचे अभिनंदन केले. छायाचित्राच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांची वेदना समाज व शासनापूढे मांडण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. या छाचित्राच्या माध्यमातून हीच भावना आपण मांडल्याचे तेलरांधे यांनी सांगितले आहे.

जेईई-नीट संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली :
  • जेईई आणि नीट परीक्षा लांबणीवर टाकण्यासंदर्भातील सहा बिगरभाजप राज्यांनी केलेली फेरयाचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

  • करोनाकाळात लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. १७ ऑगस्ट रोजी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती. त्यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय या राज्यांनी एकत्रितपणे घेतला होता.

  • फेरविचार याचिका आणि संबंधित दस्तऐवज न्यायालयाने बारकाईने पाहिलेली असून त्यावर सुनावणी घेण्याची गरज नसल्याचे मत नोंदवत न्या. अशोक भूषण, न्या. भूषण गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांनी ही याचिका फेटाळली. दोन आठवडय़ांपूर्वी सात बिगरभाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. त्यात १७ ऑगस्टच्या याचिकेवरील निकालावर पुन्हा न्यायालयात दाद मागण्यावर सहमती झाली होती. त्यानुसार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, झारखंड आणि छत्तीसगढ या राज्यांच्या वतीने याचिका दाखल केली गेली.

  • १७ ऑगस्टची मूळ याचिका न्या. अरुण मिश्रा यांनी फेटाळली होती. ते निवृत्त झाल्यामुळे फेरयाचिकेवरील सुनावणी न्या. अशोक भूषण यांच्यासमोर झाली. करोनाची आपत्ती असली तरी आयुष्य सुरू राहाते. विद्यार्थ्यांचे व्यावसायिक आयुष्य धोक्यात घालणे योग्य नाही, अशी टिप्पणी करत न्या. मिश्रा यांनी याचिका फेटाळली होती. जेईईची परीक्षा ७-११ एप्रिल काळात होणे अपेक्षित होते, मात्र ती पुढे ढकलून नव्या तारखा (१८-२३ जुलै) जाहीर केल्या गेल्या. त्यानंतर १-६ सप्टेंबर या काळात घेण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. ३ मे रोजी होणारी नीट परीक्षाही १३ सप्टेंबरला होणार आहे.

उपकंपन्या चीनमधून भारतात हलवण्यास जपानचे अनुदान :
  • जगातून चीनला विरोध वाढत असतानाच आता जपानने आणखी एक दणका चीनला दिला आहे. जपानने चीनमधून बाहेर पडणाऱ्या उपकंपन्यांना बांगलादेश व भारतात स्थलांतर केल्यास आर्थिक प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. यात भारत हा जपानी कंपन्यांच्या उत्पादन साखळ्यातील एक महत्त्वाचा देश  ठरण्याची शक्यता आहे.

  • जपानने त्यांच्या कंपन्यांना त्यांच्या उपकंपन्या चीनमधून भारत किंवा बांगलादेशात स्थलांतरित करण्याचे सूचित केले असून त्यासाठी विस्तारित कार्यक्रम राबवण्यात आला आहे. जे जपानी उत्पादक त्यांचे प्रकल्प चीनमधून इतर आसियान देशात हलवतील त्यांना आर्थिक मदत देण्याचे जपानच्या अर्थ, व्यापार व उद्योग मंत्रालयाने जाहीर केले आहे.

  • जपानच्या पुरवणी अर्थसंकल्पात त्यासाठी २३.५ अब्ज येनची  तरतूद करण्यात आली आहे. त्यातून उत्पादन प्रकल्प भारत किंवा बांगलादेशात हलवणाऱ्या कंपन्यांना अनुदान देण्यात येणार आहे. जपानचा यात चीनवरचे अवलंबित्व कमी करण्याचा इरादा असून जपानच्या कंपन्यांना वैद्यकीय साधने व इलेक्ट्रॉनिक घटकांचा पुरवठा करण्यासाठीची स्थायी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. त्यात भारताला फायदाच होणार आहे. जपानी कंपन्यांच्या पुरवठा साखळ्या चीनवर जास्त अवलंबून आहेत, पण कोविड १९ साथीत चीनमधून पुरवठा थांबला आहे.

०५ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.