२०१३ मध्ये उत्तर भारतातील काही भागात झालेल्या ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले होते. केदारनाथ आणि परिसरालाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला होता. तेव्हा हा परिसर विकसित करण्याचे, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र आता या परिसरात विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे, अनेक कामे ही पुर्ण झाली आहेत, अनेक कामे पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या केदारनाथ दौऱ्यात भावना व्यक्त केल्या. मोदी म्हणाले म्हणाले, ” २०१३ नंतर लोकं विचार करत होती की केदारनाथ पुन्हा उभं राहील का ?. पण माझा आतला आवाज सांगत होता की केदारनाथ पुन्हा उभं राहील, विकसित होईल. कच्छ इथे भूकंपनानंतर केलेल्या पुर्नउभारणीचा अनुभव मला होता. मी दिल्लीत बसून इथल्या कामावर लक्ष ठेवून होतो. ड्रोनने घेतलेल्या फुटेजच्या मार्फत इथल्या विकास कामांचा आढावा घेत होतो”
पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथ इथे आज १३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उ्घाटन केले. या विकास कामांमध्ये मंदाकिनी नदीच्या बाजुला संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. पुरोहीत यांच्यासाठी निवास व्यवस्था, मंदाकिनी नदीवर पूल अशा विविध कामांचा समावेश आहे.
याआधीच केदारनाथसह चारही धाम यांना बारमाही रस्त्याने जोडण्याच्या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसंच केदारनाथ इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, सोईसुविधा, केदारनाथ इथे सुसज्ज रुग्णालय, पर्यटन सुविधा केंद्र अशी विविध कामे सुरु आहेत. यामुळे भविष्यात केदारनाथ इथला प्रवास सुखकर होणार आहे.
बदलते जग आणि युद्धाच्या पद्धती लक्षात घेऊन भारताने आपली लष्करी क्षमता वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. जम्मू-काश्मीरमधील राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये दिवाळीनिमित्त सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भाष्य केले.
दळणवळण आणि सैन्य तैनातीचा विस्तार करण्यासाठी आधुनिक पायाभूत सीमा सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. संरक्षण क्षेत्रातील विकासासाठी सरकारच्या गेल्या काही वर्षांतील प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की, संरक्षण अर्थसंकल्पातील सुमारे ६५ टक्के निधी देशांतर्गत संरक्षणासाठीच्या खरेदीवर खर्च होत आहे.
सीमावर्ती भागातील संपर्क सुधारला आहे. लडाख ते अरुणाचल प्रदेश, जैसलमेर ते अंदमान निकोबार बेटे असो, सीमा आणि किनारी भागात आता रस्ते आणि ऑप्टिकल फायबरने जोडली गेली आहेत, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की आमची तैनात क्षमता वाढविण्यात आम्हाला मदत झाली आहे.
आज अर्जुन रणगाडे देशात तयार होत आहेत, तेजससारखी विमानेही देशात बनवली जात आहेत. पूर्वी, सुरक्षा दलांसाठी संरक्षण उपकरणे खरेदी करण्यासाठी अनेक वर्षे लागायची. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची वचनबद्धता हाच जुन्या पद्धती बदलण्याचा एकमेव मार्ग आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
इंग्लंडने करोनाच्या यशस्वी उपचारासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या अँटीव्हायरल गोळीच्या सशर्त वापरास मान्यता दिली आहे. ही गोळी किती लवकर उपलब्ध होईल हे स्पष्ट नसले तरी या गोळीवर उपचार करणे योग्य असल्याचे ओळखणारा इंग्लंड हा पहिला देश आहे.
१८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या करोना संक्रमित लोकांना ही गोळी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्यामध्ये किमान एक घटक दिसून येतो ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. या औषधाचे नाव ‘मोल्नुपिरावीर’ (molnupiravir) आहे. कोविडचा सौम्य संसर्ग असलेल्या लोकांना ही गोळी दिवसातून दोनदा घ्यावी लागेल.
ही अँटीव्हायरल गोळी करोनाची लक्षणे कमी करते आणि लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल.
इंग्लंडचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले, “आमच्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. इंग्लंड जगातील पहिला देश आहे ज्याने अशा अँटीव्हायरसला मान्यता दिली आहे जे करोनावर उपचारासाठी घरीच घेतल्या जाते.”
जपानला मागे टाकत चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. आता जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेशी टक्कर देण्याचा प्रयत्न चीन करत आहे. व्यापार, उद्योग, अवकाश तंत्रज्ञान, खेळ, संशोधन, विज्ञान, वहातुक अशा विविध क्षेत्रात चीन अमेरिकेवर कुरघोडी करत जगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्रही मागे नाहीये. चीन गेल्या दोन दशकांपासून वेगाने संरक्षण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
असं असतांना अमेरिकेच्या संरक्षण विभागाने चीनच्या लष्करी तयारीबाबत खास करुन अण्वस्त्र क्षमतेबाबत एक अहवाल तयार केला आहे. यानुसार चीनकडे २०३० पर्यंत एक हजार अण्वस्त्र असतील असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी चीनकडे सुमारे ३५० अण्वस्त्रे असावीत असा एक अंदाज होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून चीनचे लष्करी सामर्थ्य वाढत असून २०३० पर्यंत एक हजार अणु बॉम्ब तयार करण्याची क्षमता चीनकडे झालेली असेल असं या अहवालात म्हंटलं आहे.
चीनकडे जमिनवरुन जमिनीवर मारा करणारी, पाण्याखालून पाणबुडीतून जमिनीवर मारा करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. तसंच दीर्घ पल्ला असलेली बॉम्बफेकी विमानेही चीनकडे तयार होत आहेत.
एवढंच नाही तर लष्कर, लढाऊ विमाने, युद्धनौका, पाणबुडी यांमध्ये लक्षणीय वाढ चीन दरवर्षी करत आहे. यामुळेच जास्तीत जास्त अण्वस्त्र वाहून नेता येतील, वेळप्रसंगी हल्ला करता येईल अशी क्षमता चीनची तयार होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अण्वस्त्रासाठी आवश्यक असलेल्या प्लुटोनियमच्या निर्मितीकडे चीनकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या ‘फास्ट ब्रीडर रिएक्टर’ प्रकारातील अणुभट्टीबाबत मोठी गुंतवणूक चीन करत आहे.
‘एआयबीए’ जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या मखमूद सबायरखान याच्याकडून पराभवामुळे भारताच्या पदार्पणवीर आकाश कुमारला (५४ किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
२१ वर्षीय आकाशने मखमूदकडून ०-५ अशी हार पत्करली. आकाशच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. विजेंदर सिंग, विकास क्रिशन, शिवा थापा, गौरव बिधुरी, अमित पंघाल आणि मनीष कौशिक यांच्यानंतर जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारा आकाश हा सातवा भारतीय पुरुष बॉक्सिंगपटू ठरला. या पदकासह त्याने २५ हजार डॉलरचे बक्षीसही जिंकले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.