चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ नोव्हेंबर २०२०

Date : 5 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विजय निश्चितीच्या आधीच बायडेन म्हणाले, “पहिल्या ७७ दिवसांमध्ये हे काम पूर्ण करणार” :
  • अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथील मतदार वर्ग राजकीय दृष्टय़ा दुभंगल्याचे स्पष्ट झाले.  आहेत. त्यामुळे निकाल फिरवू शकतील अशा मोजक्या राज्यांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत ५३८ प्रातिनिधिक मतांपैकी (इलेक्टोरल व्होट्स) बायडेन यांना २२४, तर ट्रम्प यांना २१३ मते मिळाली होती. विजयासाठी २७० प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे. बायडेन हे विजयाच्या अगदी जवळ असून तुलनेने ट्रम्प बरेच मागे पडले आहेत.

  • अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये चुरस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जागतीक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील नागरिक राजकीय दृष्ट्या दुभंगल्याचे चित्र आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये दिसत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन या दोघांनी आपापले पारंपरिक मतदार गड राखले असले तरी काही महत्वाच्या राज्यांमध्ये अद्याप मतमोजणी सुरु असल्याने लढत अधिक रंजक झाली आहे. 

  • ५३८ प्रातिनिधिक मतांपैकी (इलेक्टोरल व्होट्स) बायडेन यांना २६४, तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. विजयासाठी २७० प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे. बायडेन हे विजयाच्या अगदी जवळ असून तुलनेने ट्रम्प बरेच मागे पडले आहेत. त्यामुळेच बायडेन आणि त्यांच्या समर्थकांचा उत्साह वाढला असून बायडेन यांनी विजय टप्प्यात आलेला असतानाच विजयाची औपचारिक घोषणा पूर्ण होण्याआधीच सत्तेत आल्यानंतर ७७ दिवसांमध्ये हवामान बदलविषयक पॅरिस करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होईल असं म्हटलं आहे.

मार्लन सॅम्यूएल्सची निवृत्ती :
  • वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लन सॅम्यूएल्स याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडिजने जिंकलेल्या दोन्ही ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सॅम्यूएल्सने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या.

  • सॅम्यूएल्स डिसेंबर २०१८मध्ये अखेरचा सामना खेळला असून त्याने आपला निवृत्तीचा निर्णय जून महिन्यातच वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला कळवला होता. मंडळाचे अध्यक्ष जॉनी ग्रेव्ह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

  • ३९ वर्षीय सॅम्यूएल्सने ७९ कसोटी, २०७ एकदिवसीय आणि ६७ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ११ हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा काढल्या असून १५० बळीही मिळवले आहेत. २०१२ आणि २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या अंतिम सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण खेळी साकारल्या होत्या. २०१२मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध ५६ चेंडूंत ७८ धावा फटकावल्या होत्या. चार वर्षांनंतर त्याने ६६ चेंडूंत ८५ धावांची खेळी करत विंडीजला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून दिला होता.

ट्रम्प आणि बायडेन दोघांनाही प्रत्येकी २६९ मते मिळाल्यास कोण होणार राष्ट्राध्यक्ष :
  • अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथील मतदार वर्ग राजकीय दृष्टय़ा दुभंगल्याचे स्पष्ट झाले. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन या दोघांनी आपापले पारंपरिक मतदार गड राखले आहेत. त्यामुळे निकाल फिरवू शकतील अशा मोजक्या राज्यांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • भारतीय वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत ५३८ प्रातिनिधिक मतांपैकी (इलेक्टोरल व्होट्स) बायडेन यांना २२४, तर ट्रम्प यांना २१३ मते मिळाली होती. विजयासाठी २७० प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे. बायडेन हे विजयाच्या अगदी जवळ असून तुलनेने ट्रम्प बरेच मागे पडले आहेत. असं असलं तरी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरु शकते असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात. त्यामुळेच दोघांना समान म्हणजे २६९ मते मिळाल्यास काय यासंदर्भात आता चर्चा सुरु झाली आहे.

  • बायडेन यांनी २०१६ हिलरी क्लिंटन यांनी जिंकलेल्या सर्व राज्यांबरोबरच मिशीगन, विस्कॉन्सीन आणि अॅरेझॉनामध्ये विजय मिळवल्यास दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजेच २६९ मते मिळतील. किंवा हिलरी यांनी जिंकलेली सर्व राज्ये आणि मिशीगन तसेच पेनसिल्वेनिया बायडन यांनी जिंकल्यास दोन्ही उमेदवारांना समान मतं होतील.

या’ भारतीयाने सलग दुसऱ्यांदा जिंकली निवडणूक :
  • अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक खासदार राजा कृष्णमूर्तींनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. २०१० पासून निवडणूक लढणाऱ्या कृष्णमुर्ति यांचा पहिल्याचा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर ते २०१६ साली दुसऱ्या प्रयत्नात निवडूण आले होते. त्यानंतर आता पुन्हा ते निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे ते आता ते दुसऱ्यांदा अमेरिकेतील निर्वाचित सदस्यांच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये दिसणार आहेत.

  • बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंतच्या (भारतीय प्रमाणवेळ) मतमोजणीनुसार ४७ वर्षीय कृष्णामूर्ति यांना ७१ टक्के मतं मिळाली आहेत. त्यांनी लिबरटेरियन पक्षाचे उमेदवार प्रेस्टन नेल्सन यांचा पराभव केला आहे. दिल्लीत जन्मलेल्या कृष्णमूर्ति यांचे आई-वडील हे तामिळनाडूचे आहेत. असोसिएट फ्री प्रेसच्या आकडेवारीनुसार कृष्णामूर्ति यांना एक लाख ४६ हजारहून अधिक मतं मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधकाला म्हणजेच नेल्सन यांना ६० हजार मतं मिळाली आहेत. म्हणजेच कृष्णामूर्ती यांनी दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारापेक्षा दुप्पटीहून अधिक मतं मिळवलीू आहेत.

  • याचबरोबर काँग्रेसच्या सदस्या प्रमिला जयपाल या वॉशिंग्टनमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणाऱ्या प्रेस्टन कुलकर्णी यांचा पराभव झाला आहे. टेक्साससारख्या मुख्य राज्यामधून कुलकर्णी निवडणूक लढवत होते. रिपब्लिकन उमेदावर ट्रॉय नेहल्स यांनी टेक्सासमधून विजय मिळवला आहे. नेहल्स यांना ५१ टक्के मते मिळाली तर कुलकर्णी यांना ४४ टक्के मते मिळाल्याचे असोसिएट प्री प्रेसने म्हटलं आहे.

राज्यातील चित्रपटगृहं, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं सुरु होणार :
  • राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह ५ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत. करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना ही संमती देण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

  • करोना प्रतिबंधित क्षेत्रं अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहं, शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.

  • सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरु होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याच सोबत करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे.

  • थिएटर्स सुरु करण्यात येणार असले तरीही करोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात SOP पाळणं बंधनकारक असणार आहे. कंटेन्मेंट झोन म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असणाऱ्या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उघडण्यास संमती देण्यात आली आहे.

  • अनलॉक ५ मध्ये ठाकरे सरकारने हॉटेल आणि रेस्तराँ ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उद्यापासून उघडणार आहेत. त्यामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

०५ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.