पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे. जवळपास पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये परतणार असल्याचं त्यांनी सोमवारी सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यात हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे.
करोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं असून याची सुरुवात शाळांपासून होणार आहे. बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली. स्कॉटलंडकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर बेरिस जॉन्सन यांनी ही घोषणा केली. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
ब्रिटनमध्ये मृत्यूदर जास्त असल्या कारणाने आधीच जवळपास चार कोटी जनतेला कडक निर्बंधांमध्ये रहावं लागत आहे. ब्रिटन करोनाला आळा घालण्यात अपयशी ठरलं असून करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी करोनाच्या नव्या प्रकाराला जबाबदार ठरवण्यात आलं आहे.
औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरू होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
या लशी भारत निर्मित असून त्यात आपले वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांनी मोठी भूमिका पार पाडली, अशा शब्दात पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ते म्हणाले, की जगातील सर्वात मोठा कोविड १९ लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू होत असून त्यात वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी सोमवारी ऑक्सफर्डची कोविड १९ लस म्हणजे सीरमची कोव्हिशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.
राष्ट्रीय हवामानशास्त्र बैठकीत मोदी यांनी सांगितले, की भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जगात केवळ मागणीच आहे असे नाही तर ती उत्पादने जगाने स्वीकारली आहेत. गुणवत्ता व संख्या यात गुणवत्ता जास्त महत्त्वाची असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा पाठपुरवा करताना भारतीय उत्पादनांची गुणवत्ता वाढत आहे.
ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड -अॅस्ट्राझेनेका यांची कोविड प्रतिबंधक लस डायलिसिसवर असलेल्या एका ८२ वर्षीय रुग्णास देण्यात आली. याआधीच मान्यता दिलेल्या फायझर-बायोएनटेक लशीच्या मदतीने लसीकरणाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची लस पहिल्यांदा या व्यक्तीस देण्यात आली. ब्रायन पिंकर असे या व्यक्तीचे नाव असून ऑक्सफर्ड विद्यापीठ रुग्णालयात ही लस देण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य सेवेने लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने सुरू केला असून ऑक्सफर्डची लस हे आता तेथील करोना विरोधी लढाईत दुसरे शस्त्र ठरले आहे. याआधी फायझर व बायोएनटेक यांच्या लशीस मान्यता देण्यात आली होती.
मूत्रपिंड विकाराने डायलिसिसवर असलेल्या निवृत्त व्यवस्थापकास ऑक्सफर्डची लस देण्यात आली असून पिंकर यांनी सांगितले, की करोना विषाणूपासून संरक्षण मिळाले याचे समाधान आहे. पिंकर यांच्याव्यतिरिक्त तीन मुलांचा पिता असलेले शिक्षक ट्रेव्हर कोलेट व प्रा. अँड्रय़ू पोलार्ड यांना सोमवारी लस देण्यात आली. पोलार्ड हे बालरोगतज्ज्ञ असून ऑक्सफर्डची लस तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
ऑक्सफर्ड लस गटाचे संचालक व ऑक्सफर्ड लस चाचणीचे मुख्य संशोधक प्रा. पोलार्ड यांनी सांगितले, की ऑक्सफर्ड विद्यापीठाने अॅस्ट्राझेनेकासाठी तयार केलेली लस मिळाली हा अभिमानाचा क्षण आहे. आमच्या चमूने त्यासाठी बरेच कष्ट केले होते व आता ही लस जगात उपलब्ध होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने लस देणे गरजेचे आहे. कारण या रोगाच्या उच्चाटनात त्यांचा मोठा वाटा आहे. नव्या ऑक्सफर्ड लशीची वाहतूक व साठवणूक सोपी आहे. फायझरची लस उणे ७० अंश सेल्सियस तापमानाला ठेवावी लागते, त्यामुळे तिचा वापर सोपा नाही.
टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत भारत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावेल, असा विश्वास भारताचे सुवर्णपदक विजेते नेमबाज अभिनव बिंद्राने व्यक्त केला आहे.
टोक्यो ऑलिम्पिकला २०० दिवस बाकी असल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बिंद्रा म्हणाला, ‘‘भारताने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सहा पदकांची कमाई केली होती. क्रीडा प्रकारात लिखित संहिता नसते. परंतु टोक्योत भारताची कामगिरी उंचावेल.’’
‘‘नेमबाजीप्रमाणेच अन्य काही क्रीडा प्रकारांमध्ये भारताला निश्चित पदकाची शाश्वती आहे. परंतु स्पध्रेच्या दिवसावरच पदकाची समीकरणे अवलंबून असतील,’’ असे बिंद्राने सांगितले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.