चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ फेब्रुवारी २०२१

Date : 5 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मतपेटीवर डोळा ठेवून पूर्वीच्या सरकारचा अर्थसंकल्प :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरून यापूर्वीच्या सरकारांवर गुरुवारी जोरदार टीका केली. यापूर्वीच्या सरकारांनी मतपेटीवर डोळा ठेवून अर्थसंकल्प मांडला आणि जी आश्वासने पूर्ण करता येऊ शकत नाहीत त्याबाबतच्या घोषणा करण्यासाठी अर्थसंकल्पाचा माध्यम म्हणून वापर केला, मात्र देशाची भूमिका आता बदलली आहे, असे मोदी म्हणाले.

  • आपल्या देशात गेल्या अनेक दशकांपासून कोणाच्या नावाने कोणत्या घोषणा केल्या जातात इतकाच अर्थसंकल्पाचा मर्यादित अर्थ होता, अर्थसंकल्प म्हणजे मतपेटीसाठीचे खाते बनले होते, असे मोदी म्हणाले. ऐतिहासिक चौरी चौरा घटनेच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.

  • आपल्या गरजा काय आहेत आणि भविष्यातील जबाबदाऱ्या काय आहेत हे ध्यानात ठेवून तुम्ही सर्व जण आपला घरगुती खर्चाचा ताळमेळ आखता, मात्र यापूर्वीच्या सरकारांनी जी आश्वासने पूर्ण करता येऊ शकत नाहीत त्याबाबतच्या घोषणा करण्याचे अर्थसंकल्प हे माध्यम बनविले होते. मात्र देशाने आता विचार, भूमिका बदलली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. शताब्दी कार्यक्रमाचा आरंभ म्हणून मोदी यांच्या हस्ते या वेळी एका टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.

देशात ४४ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण :
  • देशात केवळ १९ दिवसांमध्ये जवळपास ४४ लाख, ४९ हजार ५५२ लाभार्थ्यांना कोविड-१९ लस टोचण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली.

  • केवळ १८ दिवसांमध्ये ४० लाख लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेतली, प्रत्येक दिवशी लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

  • केवळ २४ तासांत तीन लाख, १० हजार ६०४ जणांचे एकूण आठ हजार ४१ सत्रांमध्ये लसीकरण करण्यात आले, आतापर्यंत ८४ हजार ६१७ सत्रे आयोजित करण्यात आली, असेही सांगण्यात आले. आतापर्यंत एक कोटी, चार लाख, ८० हजार ४५५ जण करोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.१३ टक्क्य़ांवर गेले आहे.

पाकिस्तानला झटका, इराणने केला ‘सर्जिकल स्ट्राइक’ :
  • इराणने पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. इराणने पाकिस्तानात घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश अशी पाकिस्तानची ओळख आहे. त्यामुळेच यापूर्वी भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केले होते. अमेरिकेने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता, तर भारताने उरी सैन्य तळावरील हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइकची कारवाई केली होती, यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.

  • इराणने पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करुन कैदेत असलेल्या आपल्या सैनिकांची सुटका केली. इराणने या आठवड्यात हा सर्जिकल स्ट्राइक केला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड या एलिट फोर्सने गुप्तचर माहितीच्या आधारावर पाकिस्तानात हे ऑपरेशन करुन, आपल्या दोन सैनिकांची सुटका केली. रिव्होल्युशनरी गार्डसने ही माहिती दिली आहे. मंगळवारी रात्री केलेल्या या यशस्वी ऑपरेशनमध्ये दोन सैनिकांची सुटका केली असे आयआरजीसीकडून सांगण्यात आले.

  • जैश-उल-अदल या दहशतवादी संघटनेने अडीचवर्षांपूर्वी इराणच्या दोन सैनिकांचे अपहरण करुन त्यांना बंधक बनवले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ऑपरेशन करुन त्यांची सुटका केली.

देशाच्या एकतेला प्राधान्य राहिल अशी सर्वांनी शपथ घ्यायला हवी - नरेंद्र मोदी :

 

  • देशाच्या एकतेला आपलं प्राधान्य राहिल अशी शपथ सर्वांनी घ्यायला हवी तसेच याचा सर्वांच्यावर सन्मान व्हावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चौरी-चौरा शताब्दी महोत्सवानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एका टपाल तिकीटाचे उद्घाटन करण्यात आले.

  • मोदी म्हणाले, “देशाच्या एकतेला आपलं प्राधान्य राहिल अशी शपथ सर्वांनी घ्यायला हवी तसेच याचा सर्वांच्यावर सन्मान व्हावा. याच भावनेनं आपल्याला देशातील प्रत्येक व्यक्तीसोबत पुढे जायचं आहे.”

टोक्यो ऑलिम्पिकला वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वानवा :
  • जपानमध्ये करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे या संसर्गाशी लढा देताना महत्त्वपूर्ण कार्य बजावणारे डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्याकडे टोक्यो ऑलिम्पिकसाठी सेवा देण्यासाठी पुरेसा वेळ नाही. ऑलिम्पिकसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे संयोजकांपुढील चिंता वाढली आहे.

  • ‘‘करोना संकटाशी दोन हात करताना डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्यावर प्रचंड तणाव आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी वेळ देणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. अनेक डॉक्टर्स आणि परिचारिकांनी स्वयंसेवक म्हणून सेवा देण्याचे मान्य केले होते. पण ते काम करत असलेली रुग्णालये करोनाग्रस्तांनी ओसंडून वाहत आहेत,’’ असे टोक्यो वैद्यकीय असोसिएशनचे संचालक सातूरो अराय यांनी सांगितले.

  • टोक्यो ऑलिम्पिकला स्वयंसेवक, चाहते आणि ज्योत वाहून नेणाऱ्यांचीही वानवा जाणवणार आहे. ऑलिम्पिक संयोजन समितीने २०२० ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ८० हजार स्वयंसेवकांची फौज तैनात केली होती. पण आता त्यापैकी बरेच जण सेवा बजावण्यासाठी उपलब्ध नाहीत.

०५ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.