चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ ऑगस्ट २०२१

Date : 5 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव :
  • भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे.

  • अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.

  • उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.

‘एमपीएससी’ची संयुक्त पूर्वपरीक्षा ४ सप्टेंबरला :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी संयुक्त पूर्वपरीक्षा गट-ब अखेर ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • करोनाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती. मात्र, एप्रिलमध्ये करोना संसर्ग वाढल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्य शासनाने परीक्षा लांबणीवर टाकली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कमी होतानाही परीक्षेची नवी तारीख जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत होता.

  • परीक्षेची तारीख जाहीर न झाल्यास क्रांतिदिनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही परीक्षार्थीनी दिला होता. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी दिली नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात येत होते.

“देशाला हॉकी संघाचा अभिमान”; ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदींकडून भारतीय संघाला शुभेच्छा :
  • उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने भारतीय पुरुष संघाने गुरुवारी बलाढय़ जर्मनीशी लढत कांस्यपदकावर नाव कोरले आहे. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताचे पदकाचे स्वप्न आता साकार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. “ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, विशेषत: आपल्या तरुणांच्या कल्पनाशक्तीवर विजय मिळवला आहे. भारताला आमच्या हॉकी संघाचा अभिमान आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

  • भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.

भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्या सुरू :
  • भारताच्या ‘विक्रांत’ या सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. ही युद्धनौका स्वदेशी असून भारतीय नौदलासाठी या सागरी चाचण्या ऐतिहासिक ठरत आहेत.

  • नौदलाने सांगितले की, या विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्या सुरू झाल्या असून भारत आता विमानवाहू युद्धनौका तयार करण्यात स्वयंपूर्ण असलेल्या निवडक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. २०१३ सालापासून या युद्धनौकेची बांधणी करण्याचे काम चालू झाले होते. ही विमानवाहू युद्धनौका ४० हजार टन वजनाची आहे. पन्नास वर्षापूर्वी याच नावाच्या युद्धनौकेने १९७१ च्या युद्धात मोठी कामगिरी केली होती. विक्रांत युद्धनौका तयार करण्यास २३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून भारतीय नौदलात ही युद्धनौका सामील करण्याची प्रक्रिया पुढील वर्षीच्या उत्तरार्धात सुरू होईल.

  • भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी सांगितले, की भारतासाठी हा अभिमानाचा दिवस असून विक्रांतचा पुनरावतार आता सागरी चाचण्यांसाठी सिद्ध झाला आहे. आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडियाचे उद्दिष्ट साध्य करणारा हा उपक्रम असून स्वदेशी विमानवाहू युद्धनौका तयार केल्याने भारत आता निवडक देशांच्या यादीत गेला आहे.

अयोध्येतील राम मंदिरासंबंधी मोठी बातमी - २०२३ मध्ये भक्तासांठी खुलं होणार मंदिर :
  • अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर प्रभू रामाची वाट पाहाणाऱ्या राम भक्तांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. हे रामाचे भक्त आता डिसेंबर २०२३ पासून प्रभू रामाचे दर्शन घेऊ शकणार आहेत. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली होती, तेव्हापासून मंदिराला मूर्त स्वरूप देण्यास सुरुवात झाली.

  • मंदिराच्या बांधकामासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून देणग्या गोळा केल्या जात होत्या. त्याचबरोबर राम मंदिर निर्माण समिती बांधकामासाठी काम करत आहे. जुलैच्या झालेल्या राम मंदिर बांधकाम समितीमध्ये यावर चर्चा झाली. २०२३ मध्ये म्हणजे नियोजित वेळेच्या एक वर्ष आधी, भव्य राम मंदिरात रामाचे दर्शन घेता येणार आहे असे सांगण्यात आले होते.

  • बैठकीत राम मंदिराचा परिसर पर्यावरणपूरक असेल असा निर्णय घेण्यात आला. येथे त्रेतायुगाच्या सुंदर दृश्यांसह, भक्तांसाठी आधुनिक सुविधांवर पूर्ण लक्ष असेल. संपूर्ण परिसर २०२५ च्या अखेरीस विकसित केला जाईल.

बारावीच्या गुणांवरच पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश :
  • राज्यातील विद्यापीठे-महाविद्यालयांतील पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशांची प्रक्रिया बारावीच्या गुणांनुसारच राबवली जाणार आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) होणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी स्पष्ट केले.

  • यंदा बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनानुसार जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानंतर विद्यापीठे-महाविद्यालयांतील पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा विचार उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण विभागाकडून करण्यात येत होता. त्यामुळे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे काय, सीईटी होणार का, असे प्रश्न निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कु लगुरूंसह बैठक झाल्यानंतर सामंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली.

  • सामंत म्हणाले, की पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियेसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यास आता पुरेसा अवधी नाही. त्यामुळे बारावीच्या गुणांनुसारच प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय कु लगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला.

  • त्यामुळे महाविद्यालयांना आता प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल. बारावीचा निकाल वाढल्यामुळे जागा कमी पडत असल्यास आवश्यकतेनुसार तुकडीवाढ करता येईल.

०५ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.