चालू घडामोडी आणि दिनविशेष - 05 एप्रिल 2023

Date : 5 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
Defamation Law आहे तरी काय? अब्रुनुकसानी नेमकी केव्हा होते?
  • गेल्या महिन्यात २३ मार्च रोजी सूरत न्यायालयाने दिलेल्या एका निकालानंतर भारतीय राजकारणाला एक नवीन वळण मिळाल्याचे चित्र आहे. त्या निकालानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी व विरोधक यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचल्याचे देशभर अनुभवास येत आहे.

  • कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक सभेदरम्यान, ‘सर्व चोरांना मोदी हे नाव का आहे?’ असे वक्तव्य केले होते.

  • या वादग्रस्त वक्तव्यानंतर तब्बल दोन वर्षांनी अब्रूनुकसानीच्या (डीफेमेशन) या कायद्यांतर्गत फौजदारी गुन्ह्याखाली त्यांना दोन वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. यानिमित्ताने या कायद्याच्या अनेक पैलूंचा घेतलेला हा आढावा.

भूतानच्या राजांशी पंतप्रधान मोदींची चर्चा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भूतानचे राजे जिग्मे घेसर नामग्याल वांगचुक यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. उभय देशांतील आर्थिक सहकार्यासह विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी या चर्चेत भर दिला.
  • भूतानचे राजे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. चीनने भूतानवर आपला प्रभाव वाढवण्याची चिन्हे दिसत असताना हा दौरा सुरू आहे.
  • भारत-चीन-भूतान या तीन देशांच्या डोकलाम सीमाभागासंदर्भत भूतानचे पंतप्रधान लोटे छिरिंग यांनी केलेले काही वक्तव्ये भूतान चीनला अनुकूल भूमिका घेत असल्याचे संकेत देत आहेत. मात्र, भूतानने सीमावादावर आपल्या भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
NCERT च्या १२वीच्या पुस्तकांमधून मुघलांचा इतिहास हद्दपार; भाजपानं केलं निर्णयाचं स्वागत
  • उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या २४ तासांच्या आता NCERT अर्थात नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रीसर्च अँड ट्रेनिंगनं आपल्या १२वीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास सांगणारे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं भाजपानंही स्वागत केलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

  • भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी यासंदर्भात इंडिया टुडेच्या वृत्ताचा एक व्हिडीओ ट्वीट करून त्यावर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. “एनसीईआरटीनं मुघलांचा खोटा इतिहास हटवण्याचा एक चांगला निर्णय घेतला आहे. चोर, पाकिटमार आणि क्षुल्लक सडकछाप लोकांना मुगल साम्राज्य आणि भारताचे बादशाह म्हटलं जायचं. अकबर, बाबर, शाहजहान, औरंगजेब यासारख्या लबाड लोकांची जाहा इतिहासाच्या पुस्तकात नाही, तर कचरापेटीत आहे”, असं कपिल मिश्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

इतिहास हटवला, आता पुढे काय?

  • दरम्यान, बारावीच्या पुस्तकातून इतिहास हटवल्यानंतर आता पुढे काय? यासंदर्भात कपिल मिश्रा यांनी अजून एक ट्वीट मंगळवारी केलं आहे. यामध्ये “मुघलांचं असत्य इतिहासातून हटवण्यात येत आहे. आता पुढच्या टप्प्यात त्यांचं सत्य सांगितलं जाईल. मुघलांची लूट, व्याभिचार, अत्याचार, घाबरटपणा, मंदिर-मूर्तींचा द्वेष, आपल्याच मुलींशी त्यांचे असणारे नातेसंबंध, त्यांची नशेच्या आहारी गेलेली मुलं, कला-साहित्य-संगीताशी त्यांचं असलेलं शत्रुत्व अशा सर्व गोष्टींबाबतचं सत्य उघड होईल”, असं कपिल मिश्रांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कोणता हिस्सा वगळला?

  • एनसीईआरटीकडून वगळण्यात आलेल्या भागामध्ये १६व्या आणि १७व्या शतकातील मुघल साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश आहे. ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्टरी पार्ट टू’ या पुस्तकातील हा भाग वगळण्यात आला आहे.

PhonePe ने लॉन्च केले Pincode App; शेजारच्या दुकानातूनही ऑनलाईन मागवता येणार ‘हे’ सामान
  • हल्ली पानटपरी, फेरीवाल्याची गाडीर, चहाचा स्टॉल, मोठ्या हॉटेलपासून स्टेशनरीच्या दुकानांपर्यंत सगळीकडे यूपीआय व्यवहार केले जात आहेत. कुठेही काहीही खरेदी करा? ग्राहक दुकानदाराकडे स्कॅनर कोड मागतात. विविध यूपीआय कंपन्यांनी दुकानदारांना कोडसाठी छानसे कार्ड बनवून दिलेली आहेत.

  • पेमेंटसाठी UPI Apps चा वापर सातत्याने वाढत आहे. भारतात बहुतेक लोकं पेमेंटसाठी पेटीएम, फोन पे, गुगल पे इत्यादी वापरतात. UPI द्वारे केलेल्या एकूण व्यवहारांपैकी सुमारे ५० टक्के व्यवहार फोन पेद्वारे केले जातात.

  • दरम्यान , PhonePe ने Pincode नावाचे नवीन App लॉन्च केले आहे. ओएनजीसीचा एक भाग आहे. ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स हा सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे जिथे वस्तू आणि सेवांची डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नेटवर्कवर देवाणघेवाण केली जाऊ शकते. म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणाहून कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्मवरून सामान खरेदी किंवा विक्री करू शकता. परंतु वेबसाइट देखील ONDC चा एक भाग आहे.

  • सध्या कंपनीने हे नवीन App सध्या बंगळुरूमध्ये सुरु करण्यात आले आहे. या App च्या माध्यमातून लोक सुरुवातीला किराणा, औषधे आणि खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकतील. म्हणजेच आता तुम्हाला शेजारील दुकानातूनसुद्धा ऑनलाइन स्वरूपात सामान मंगवता येणार आहे. कंपनीने म्हटले आहे की ते हळूहळू इतर शहरांमध्येही हे अ‍ॅप्लिकेशन सुरू करणार असून या वर्षाच्या अखेरीस दररोज १ लाख ऑर्डर घेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

आयपीएलचा ‘हा’ नियम पुढील वर्षी डब्ल्यूपीएलमध्ये लागू होणार, पण संघांची संख्या वाढणार नाही
  • डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्राचे आयोजन शानदारा पार पडले होते. या यशाने आनंदित झालेले आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रापासून होम आणि अवे फॉरमॅट लागू करण्याचा विचार करत आहोत. परंतु पुढील हंगामासाठी तीन वर्षे संघाची संख्या पाच राहील. डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम चाहत्यांना आणि खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय होता, परंतु ही स्पर्धा महिला टी-२० विश्वचषकानंतर लगेचच व्यस्त वेळापत्रकात आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे बीसीसीायने सर्व सामने दोन ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.
  • डब्ल्यूपीएलचे आयोजन हे आपल्या कार्यकाळातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगून धुमल म्हणाले की, होम आणि अवे स्वरूप संघाला चाहता वर्ग तयार करण्यात खूप मदत करेल. बोर्ड पुढील वर्षीच त्याची अंमलबजावणी करू इच्छित आहे. धुमल यांनी पीटीआयला सांगितले, “चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम पूर्ण झाले. डब्ल्यूपीएलने चांगली सुरुवात केली आहे आणि आम्ही आतापर्यंत जे पाहिले आहे, त्यापेक्षा भविष्य खूप चांगले असेल. आम्ही पाच संघांसह सुरुवात केली. परंतु खेळाडूंचा पूल लक्षात घेता भविष्यात अतिरिक्त संघांना वाव आहे.”
  • धुमल म्हणाले, “आम्हाला संघांची संख्या वाढवण्याची आशा आहे, परंतु पुढील तीन हंगामात केवळ पाच संघ असतील. आम्ही निश्चितपणे आमच्या होम आणि अवे सामन्यांचे स्वरूप पाहत आहोत, भारताच्या आंतरराष्ट्रीय बांधिलकी लक्षात घेता, कोणाकडे वेळ आहे ते आम्ही पाहू आणि नंतर निर्णय घेऊ. चाहत्यांच्या व्यस्ततेच्या दृष्टीकोनातून हे खूप महत्वाचे आहे की आम्ही स्वतः आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर सामन्याचे स्वरूप स्वीकारवे.”

 

आयपीएलचा अंतिम सामना कोठे खेळवला जाणार, मोठी माहिती आली समोर :
  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होऊन जवळपास आठवडा झाला आहे. या हंगामात सुरुवातीपासून सर्व सामने अटीतटीचे होत आहेत. आज या हंगामाचा १२ वा सामना खेळवला जातोय. दरम्यान, आयपीएलचा उपांत्य आणि अंतिम सामना कोठे खेळवला जाणार याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. उपांत्य आणि अतिम सामने खेळवण्यासाठी दोन मैदानांची निवडदेखील करण्यात आली आहे.

  • बीसीसीआयने आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी ६ मार्च रोजी शेड्यूल जारी केले होते. यावेळी बोर्डाने आयपीएलच्या ७० सामन्यांचे वेळापत्रकही जारी केले होते. यावेळी उपांत्य तसेच अंतिम सामने कोठे खेळवले जातील याबद्दल निश्चित माहिती सांगण्यात आली नव्हती. मात्र आता हे सामने कोठे होणार हे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे.

  • आयपीएल २०२२ मधील क्वालीफायर आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाण्याची शक्यता आहे. तसेच या सूचीमध्ये अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमचाही समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

  • दरम्यान आयपीएलचे ७० सामने महाराष्ट्रात खेळवले जात आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट अकॅडमी स्टेडियम तसेच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या चार स्टेडियमवर हे सामने खेळवले जात आहेत.

एसटीच्या निवृत्त वाहकांची नियुक्ती ; कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय "
  • राज्यातील एसटी सेवा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी चालक मोठय़ा प्रमाणावर घेण्यात असतानाच वाहकांचीही कमतरता महामंडळाला भासत आहे. त्यामुळे एसटीतून निवृत्त झालेल्या वाहकांची पुन्हा भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात निकष ठरवण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. हे वाहक कंत्राटी पद्धतीनेच घेणार की अन्य प्रकारे यावर निर्णय होईल.

  • गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या संपामुळे राज्यातील एसटी सेवा अद्यापही सुरुळीत झालेली नाही. त्यामुळे कारवाया मागे घेण्याचे आश्वासन देऊन महामंडळाकडून कामगारांना कामावर परत येण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनालाही प्रतिसाद मिळालेला नसून ८१ हजार कर्मचाऱ्यांपैकी अद्यापही ४७ हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत. आतापर्यंत ७ हजाराहून अधिक चालक आणि ७ हजार ३४५ वाहक कर्तव्यावर हजर झाले असून सुमारे ४० हजार चालक, वाहक संपावरच आहेत. त्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडलेले असून प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.

  • महामंडळाने एसटी सुरळीत करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने चालक भरण्यास सुरुवात केली आहे. सध्या २ हजार २२५ कंत्राटी चालक आहेत. चालक भरती करतानाच वाहकांचीही कमतरता भासत असल्याने महामंडळाने नुकताच वाहन परीक्षक, सहाय्यक वाहतुक निरीक्षक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांवर वाहकाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला होता. वाहतुक नियंत्रकांवर वाहकाची जबाबदारी देण्यात येणार होती. परंतु त्यालाही अल्पच प्रतिसाद मिळाला. याशिवाय तिकीट मशिनचा पुरवठा करणाऱ्या ट्रायमॅक्सनेही कंत्राटी वाहक देण्यास सुरुवात केली, मात्र तेही कमीच आहेत.

एलन मस्कची ट्विटरमध्ये २.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; सहसंस्थापकाच्या चारपट हिश्शासह झाला सर्वात मोठा समभागधारक :
  • टेस्लाचे प्रमुख एलन मस्कने (Elon Musk) ट्विटरमध्ये २.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलीय. यासह मस्क ट्विटरमधील ९.२ टक्के हिश्शासह सर्वात मोठा समभागधारक झालाय. विशेष म्हणजे एलन मस्ककडे ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीच्या चारपट समभाग आले आहेत. मस्कच्या या निर्णयानंतर ट्विटरच्या समभागांमध्ये २६ टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली.

  • विशेष म्हणजे एलन मस्कने याआधी ट्विटरवर एक पोल घेतला. त्यात त्याने आपल्या ८ कोटी फॉलोवर्सला ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मुल्याचं कठोरपणे पालन करते की नाही? असा प्रश्न विचारला. तसेच सर्वांना काळजीने मतदान करावं कारण या मतदानाचे परिणाम महत्त्वाचे असणार आहे असंही म्हटलं होतं. या मतदानात ७० टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. यानंतर एलन मस्कने ट्विटरला इतर कोणता पर्याय आहे का असं विचारलं. तसेच मी माझा स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत गंभीर विचार करत आहे, असंही नमूद केलं.

  • यानंतर एलन मस्कने आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गरज आहे का? अशीही विचारणा आपल्या फॉलोवर्सला केली. मस्क एक उत्साही ट्विटर युजर आहे. मात्र, तो ट्विटरचा कठोर टीकाकारही आहे. आता ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, मस्क आगामी काळात ट्विटरमधील ७३.४८ मिलियनचे समभाग विकत घेईल. यासह त्याच्याकडे ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीच्या चारपट समभागाची मालकी येईल. एलन मस्क रिव्होकेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही समभाग खरेदी होईल.

देशातील १० राज्यांमध्ये सुरु होणार ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर; १८ शाळांमध्ये दिले जाणार प्रशिक्षण :
  • ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहे. अनेक क्षेत्रात ड्रोनच्या वापरालाही मान्यता देण्यात आली आहे. २०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारने ड्रोनशी संबंधित एक मोठी घोषणा केली. मोबाईल आणि कॉम्प्युटर सारखाच दैनंदिन जीवनात ड्रोनचाही समावेश करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रोन पायलटचीही गरज भासणार आहे.

  • भविष्यातील ड्रोन पायलटची गरज लक्षात घेता १० राज्यांमध्ये ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी १८ शाळा उघडण्यात आल्या आहेत. बहुतांश ठिकाणी केवळ खासगी फ्लाइंग क्लबना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ४ प्रशिक्षण शाळांपैकी दोन शाळा पुण्यात, एक मुंबईत आणि एक बारामतीमध्ये उघडण्यात आली आहे. डीजीसीएच्या वेबसाइटवर डिजिटल स्काय नावाच्या प्लॅटफॉर्मवर ड्रोनशी संबंधित अधिक माहिती पाहता येईल.

  • १० राज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अलीगढ, यूपीमधील धानीपूर हवाई पट्टीवर दोन ड्रोन पायलट प्रशिक्षण शाळा उघडण्यात आल्या आहेत. हरियाणात गुरुग्राममध्ये तीन आणि बहादूरगडमध्ये एक शाळा उघडण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, गुजरातमधील अहमदाबाद, हिमाचल प्रदेशातील शाहपूर, झारखंडमधील जमशेदपूर, कर्नाटकातील बंगलोर, यूपीमध्ये दोन आणि हरियाणामध्ये चार शाळा सुरू झाल्या आहेत. तेलंगणातील सिकंदराबाद आणि हैदराबादमध्ये प्रत्येकी एक शाळा उघडण्यात आली आहे. तामिळनाडूतील चेन्नई येथे एक प्रशिक्षण शाळा उघडण्यात आली आहे. देशभरात फक्त १८ शाळा उघडण्यात आल्या आहेत.

केदारनाथसाठी हेलिकॉप्टरचे ऑनलाइन बुकिंग आजपासून सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया :
  • तुम्हीही या वर्षी उत्तराखंडमधील केदारनाथला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ६ मे पासून केदारनाथ धामचे दरवाजे उघडणार आहेत. यासाठी प्रवाशांना केदारनाथ धामला पूर्ण सहजतेने पोहोचता यावे यासाठी सरकारने हेलिकॉप्टरचे बुकिंगही सुरू केले आहे. गुप्तकाशी, सिरसी आणि फाटा येथून केदारनाथ धामपर्यंत तुम्ही हेलिकॉप्टर सेवा बुक करू शकता. केदारनाथ धामपर्यंत जाण्यासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन बुक करू शकता. यासाठी तुम्हाला उत्तराखंड सरकारच्या heliservices.uk.gov.in या वेबसाइटला भेट देऊन बुकिंग करावे लागेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने यंदाही हेलिकॉप्टर सेवेच्या भाड्यात वाढ केलेली नाही.

  • २०२० मध्ये निश्चित केलेले भाडे यावेळी लागू करण्यात आले आहे. एकूण ९ हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपन्या प्रवाशांना सुविधा देणार आहेत. गुप्तकाशी ते केदारनाथ ७,७५० रुपये, फाटा ते केदारनाथ ४,७२० रुपये, तर सिरसी ते केदारनाथ तुम्हाला ४,६८० रुपये मोजावे लागतील.

  • कशी कराल नोंदणी : प्रथम तुम्हाला heliservices.uk.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्हाला नोंदणीवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल, आधार कार्ड क्रमांक आणि ईमेल आयडी भरावा लागेल. त्यानंतर पासवर्ड टाकाल्यानंतर तुमची नोंदणी होईल. प्रवासाची तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्हाला युजर्स लॉगिनवर जावे लागेल. त्यानंतर यूजर आयडीवर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका आणि नोंदणी दरम्यान तयार केलेला पासवर्ड प्रविष्ट करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्यानंतर तुम्हाला जिथून हेलिकॉप्टर सेवा घ्यायची आहे ते ठिकाण निवडा, नंतर देय रक्कम भरल्यानंतर तुमची हेली सेवा बुक केली जाईल.

साताऱ्यात आजपासून ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार ; मानाची गदा पटकावण्यासाठी नामवंत मल्लांमध्ये चुरस :
  • तब्बल ६१ वर्षांच्या कालखंडानंतर महाराष्ट्र केसरीचा फड साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये मंगळवार  ५ ते ९ एप्रिल या काळात रंगणार आहे. या तालमीमध्ये तब्बल ९०० मल्ल ४५ संघांमधून  झुंजणार आहेत. गादी आणि माती विभागातील वजन ५७ ते १२५ किलोच्या गटांमध्ये विजेत्यांना  ३३ लाख रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.

  • या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचा क्रीडा विभाग सातत्याने संकुलात तयारीमध्ये असून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी तब्बल बारा विभागांमध्ये यजमानपदाची जबाबदारी जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्ती फेडरेशनच्या माध्यमातून उत्तमरीत्या सांभाळली आहे.

  • महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने अधिवेशन  साताराला  घेण्याचे ठरल्यानंतर छत्रपती शाहू क्रीडा संकुलाला नवीन झळाळी मिळाली आहे. यामध्ये जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्र केसरीच्या यजमानपदाची तयारी सध्या सुरू आहे. या तयारीचा आढावा पालक मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, निमंत्रक सुधीर पवार आणि दीपक पवार  घेत आहेत. ४५ संघांतून ११३६ मल्ल पाच आखाडय़ांमध्ये एकमेकांशी झुंजणार आहेत.

  • करोना महामारीमुळे दोन वर्षे कुस्ती स्पर्धा झाली नाही त्यामुळे यंदा सातारला होणाऱ्या स्पर्धेला कुस्तीशौकिनांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल अशी सध्या कुस्तीक्षेत्रात चर्चा सुरू आहे.

05 एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.