चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ नोव्हेंबर २०२०

Date : 4 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विख्यात पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे निधन :
  • मध्य पूर्वेतील वार्ताकनात निष्णात मानले गेलेले प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे नुकतेच डब्लिन येथे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मध्य-पूर्वेतील संघर्षग्रस्त भागात राहून त्यांनी वार्ताकन केले होते.

  • फिस्क यांच्या वार्ताकनाने नेहमीच वादाचे मुद्दे चर्चेला आले. आर्यलडची राजधानी डब्लिन येथे अल्पशा आजारानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्या काळातील नामवंत पत्रकार अशा शब्दांत दी इंडिपेंडंटने त्यांचा गौरव केला आहे. अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन याची अनेकदा मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांपैकी ते एक होते. ११ सप्टेंबर २०११ रोजीच्या हल्लय़ानंतर ते पाकिस्तान अफगाण सीमेवर गेले होते. तेथे अफगाणी शरणार्थीनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

  • निर्भिडता, तडजोडी न करणे, सत्य शोधण्यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार असणे व वास्तव  मांडणे हे आदर्श पत्रकारांकडून अपेक्षित असलेले सर्व गुण त्यांच्यात होते, त्यामुळे ते यशस्वी झाले, असे मत ‘दी इंडिपेंडंट’चे व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तियन ब्राउटन यांनी व्यक्त केले. फिस्क यांनी पेटवलेली पत्रकारितेची अग्निशिखा यापुढेही तशीच तेजाळत राहील, असे ते म्हणाले.

स्मृती इराणी वि. काकोडकर - मोदी सरकारने कायद्याचे उल्लंघन करुन घेतला ‘तो’ निर्णय :
  • केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने रूरकी येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती प्रवब मुखर्जी यांनी केलेली नियुक्ती परस्पर रद्द केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना आयआयटी रूरकीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांची नियुक्ती केुली होती. मात्र तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर मोदी सरकारने या पदावर राष्ट्रपतींनी जारी केलेला आधीचा आदेश रद्द न करता नवीन नियुक्ती केली.

  • शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माजी राष्ट्रपतींनी काकडोकर यांच्या नियुक्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी अर्ज न करता थेट नवीन प्रस्ताव राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर सादर करत तो मान्य करुन घेतला. त्यामुळेच काकोडकर यांच्या जागी बी. व्ही. आर. मोहन रेड्डी यांची आयआयटी रूरकीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. रेड्डी हे आयआयटी हैदराबादचे अध्यक्ष असून त्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आल्याचे ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प की जो बायडेन; कोण होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष :
  • मंगळवारी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. करोनाचं संकट असलं तरी यादरम्यान मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगाही पाहायला मिळाल्या होत्या. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. परंतु या निवडणुकांमध्ये जो बायडेन यांचं पारडं जड असल्याचंही म्हटलं जात आहे. आहे. जर बायडेन यांना या निवडणुकीत विजय मिळाला तर डोनाल्ड ट्रम्प हे १९९२ नंतर प्रथमच दुसऱ्यांदा निवडणूक न जिंकणारे राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत.

  • दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांनी टपाली मतदानावरून आक्रमक पवित्रा घेत निवडणुकांचा निकाल मान्य न करता न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. काहीही निकाल लागला तरी तो अमान्य करू असेच ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पेनसिल्वानियातील टपाली मतदान जर मतमोजणीनंतर तीन दिवसांनी मोजले जाणार असेल तर आपण न्यायालयात जाणार आहोत असं ट्रम्प यांनी सांगितलं.

  • आपणच विजयी होऊ असा विश्वास अध्यक्ष ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला होता. दरम्यान ह्यूस्टन येथील १ लाख २७ हजार टपाली मते मोजणीतून बाद करण्याची रिपब्लिकन पक्षाची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे.

  • मतदानाच्या दिवशी गैरप्रकार होऊ नयेत यासाठी व्हाइट हाऊसभोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण सोळा कोटी मतदानातून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार हे ठरणार आहे. एकूण पात्र मतदार २४ कोटी आहेत. इ.स. १९०० नंतर प्रथमच सोळा कोटी मतदान होण्याची शक्यता फ्लोरिडा विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक मायकेल मॅकडोनाल्ड यांनी वर्तवली होती.

भारतीय संघाच्या क्रिकेट साहित्याचा करार तोटय़ाचा :
  • एमपीएल स्पोर्ट्स अ‍ॅपॅरल आणि अ‍ॅक्सेसरीज हे पुढील तीन वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्याचे नवे पुरस्कर्ते निश्चित झाले आहेत. परंतु ‘बीसीसीआय’ला प्रति सामन्यांसाठी नायकेच्या ८८ लाख रुपयांच्या तुलनेत एमपीएलकडून फक्त ६५ लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे ‘बीसीसीआय’ प्रति सामन्यास २३ लाखांचा तोटा सहन करावा लागणार आहे.

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्याने सोमवारी एमपीएल कंपनीशी करार झाल्याची माहिती दिली. ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट साहित्याचा करार भारताच्या पुरुष, महिला, ‘अ’ संघ आणि युवा (१९ वर्षांखालील) संघांसाठी करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’ला विक्रीसंदर्भातील स्वामित्व हक्कापोटी आणखी १० टक्के रक्कमसुद्धा मिळू शकेल. हा करार नोव्हेंबर २०२३ पर्यंत कार्यरत असेल.

  • एमपीएल हे सध्या ‘आयपीएल’मधील कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु या संघांशी करारबद्ध आहेत. याचप्रमाणे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ट्रिनबागो नाइट रायडर्स, आर्यलड आणि संयुक्त अरब अमिरातीशी करारबद्ध आहे.

०४ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.