चालू घडामोडी आणि दिनविशेष - 04 जानेवारी 2024

Date : 4 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रामराज्याचा आदर्श! ‘या’ राज्यात २२ जानेवारीला असणार ‘ड्राय डे’, सुशासनाचा आठवडाही साजरा
  • २२ जानेवारी या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सगळ्या महोत्सवाची तयारी देशभरात सुरु आहे. अशात एका राज्याने २२ जानेवारी या दिवशी ड्राय डे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होतं आहे.

छत्तीसगडने २२ जानेवारीला जाहीर केला ड्राय डे

  • छत्तीसगड या राज्याने २२ जानेवारीच्या दिवशी म्हणजेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी ड्राय डे जाहीर केला आहे. मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी या दिवसाची घोषणा केली आहे. तसंच २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत आम्ही सुशासन सप्ताह ठेवला होता असंही त्यांनी सांगितलं. त्याचवेळी त्यांनी २२ जानेवारी रोजी ड्राय डे असेल अशी घोषणा केली. आमचा राज्य चालवण्याचा आदर्श रामराज्य आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
  • मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सांगितलं की तांदूळ उत्पादक संघटनांकडून ३ हजार टन तांदूळ अयोध्येला पाटवला आहे. तसंच २२ जानेवारीच्या दिवशी संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण असणार आहे दिवाळीसारखं वातावरण असेल, राज्यातल्या जनतेनेही दिवाळी साजरी करावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसंच २२ जानेवारी या दिवशी राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्यावेळी राज्यात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये प्रभू रामचंद्रांचे आजोबा राहून गेले आहेत. आम्ही त्यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
आकाराने लहान असले तरी लक्षद्वीपचे हृदय मात्र विशाल!
  • ‘लक्षद्वीपचा द्वीपसमूह आकारमानाने लहान असला तरी त्याचे हृदय मात्र विशाल आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काढले. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील तंत्रज्ञान, ऊर्जा, जलसंपदा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक हजार १५० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधान  बोलत होते.
  • मोदी सरकारने सुरू केलेल्या सुधारणांविरुद्ध लक्षद्वीपमध्ये मोठया प्रमाणात नाराजी असून, सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. मुस्लीमबहुल लक्षद्वीपवासीयांची मने जिंकण्यासाठी मोदींनी ही प्रशंसा केल्याचे मानले जात आहे. या सोहळयात महिला-मुलांसह शेकडो लक्षद्वीपवासीय सहभागी झाले होते. त्यांना मल्याळम भाषेत ‘माझ्या परिवारातील सदस्य’ असे संबोधून मोदींनी भाषणाचा प्रारंभ केला.
  • लक्षद्वीपचे सौंदर्य शब्दातीत असल्याचे सांगून येथील रहिवाशांना भेटण्यासाठी गती, बंगारम आणि कावरत्ती येथे जाण्याचे आवाहन मोदींनी नागरिकांना केले. ते म्हणाले, की लक्षद्वीपचे भौगोलिक क्षेत्र भलेही छोटे असेल पण लोकांची हृदये समुद्रासारखी विशाल आणि खोल आहेत. मला येथे मिळत असलेले प्रेम आणि आशीर्वादामुळे मी भारावून गेलो आहे. मी तुम्हा सर्वांप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. स्वदेश दर्शन योजनेंतर्गत लक्षद्वीपसाठी विशेष योजना विकसित करण्याची घोषणा मोदीं यावेळी केली. ज्यात लक्षद्वीपच्या खास आकर्षक पर्यटन स्थळांचा समावेश असेल, अस सांगून पंतप्रधानांनी कदमत आणि सुहेली बेटांवरील दोन ‘ब्ल्यू-फ्लॅग’ समुद्रकिनारे आणि आगामी ‘वॉटर व्हिला’ प्रकल्पांचाही उल्लेख केला. लक्षद्वीप हे मुख्य ‘क्रूझ पर्यटन स्थळ’ म्हणून उदयास येत आहे, पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाली आहे.
  • यावेळी पंतप्रधानांनी नागरिकांना प्रवास करून आपल्या देशाची माहिती घेण्याचे आवाहन केले. जगभरात पर्यटनाचा विचार करण्यापूर्वी देशातील किमान १५ ठिकाणांना भेट देण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. विशेषत: लक्षद्वीपला भेट देण्याची शिफारस करताना मोदींनी सांगितले की लक्षद्वीपचे सौंदर्य अनेक जागतिक ठिकाणांनाही मागे टाकते. एकदा  लक्षद्वीपचे सौंदर्य अनुभवल्यानंतर जगातील अन्य ठिकाणे त्या समोर तुम्हाला फिकी वाटतील.
सावित्रीबाईंचे मुखवटे घालून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जागर
  • मानधन वाढीसह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि इतर मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरू असलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन अद्यापि सुरूच असताना बुधवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात महिला मुक्तिदिनी शेकडो संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुल्यांचे मुखवटे घालून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सहभाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
  • गेल्या ४ डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच असल्यामुळे अंगणवाड्या अद्यापि कुलूपबंद आहेत. परंतु या आंदोलनाची कोडी कायम असताना जिल्हा स्तरावर आंदोलक अंगणवाडी कर्मचारी दररोज भजन, थाळीनाद, टाळीनाद, चटणी-भाकर, लाटणे इत्यादी वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन करीत आहेत. बुधवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात महिला मुक्तिदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेसमोर ‘आम्ही सा-या सावित्री ‘ आंदोलन केले, सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाईंचे मुखवटे घालून जागर केला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
  • गेल्या ४ डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच असल्यामुळे अंगणवाड्या अद्यापि कुलूपबंद आहेत. परंतु या आंदोलनाची कोडी कायम असताना जिल्हा स्तरावर आंदोलक अंगणवाडी कर्मचारी दररोज भजन, थाळीनाद, टाळीनाद, चटणी-भाकर, लाटणे इत्यादी वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन करीत आहेत. बुधवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात महिला मुक्तिदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेसमोर ‘आम्ही सा-या सावित्री ‘ आंदोलन केले, सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाईंचे मुखवटे घालून जागर केला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
पर्यावरण तज्ज्ञ अजित उर्फ पापा पाटील यांचे निधन
  • येथील प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ आणि मानद वन संरक्षक अजित उर्फ पापा पाटील (वय ७४) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांनी नुकत्याच झालेल्या राज्य पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले होते. अजित पाटील यांनी अनेक मोहिमा केल्या होत्या. कृष्णा आणि इंद्रावती मोहिमेतही ते सहभागी होते. पक्षी, प्राणी, निसर्ग संवर्धनाप्रती केलेल्या कामाबद्दल नुकतेच त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • बाबा आमटे यांचे ‘आनंदवन’, प्रकाश आमटे यांचे ‘हेमलकसा’ या प्रकल्पाशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. सांगली जिल्ह्यातील चांदोली व्याघ्र प्रकल्पासाठी त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अशोक पाटील यांचे ते थोरले बंधू होते. गुरुवारी सकाळी अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा: नेमबाजीत तेजस्विनी सावंत, पुष्कराज इंगोलेला सुवर्ण :
  • कोल्हापूरची ऑलिम्पिकपटू तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले यांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेच्या नेमबाजी क्रीडा प्रकारात ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदक मिळवले.

  • माजी विश्वविजेत्या तेजस्विनी सावंतने ५० मीटर रायफल प्रोनमध्ये महिलांच्या गटात ६१८ गुणांसह अग्रस्थान पटकावले. मुंबईच्या भक्ती खामकरचा तेजस्विनीने ४.५ गुणांच्या फरकाने पराभव केला. पुण्याची प्रणाली सूर्यवंशी (६११.७) कांस्यपदकाची मानकरी ठरली.

  • पुरूषांच्या ५० मीटर प्रोन स्पर्धेत इंगोलेने एकूण ६२१.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. कोल्हापूरच्या इंद्रजित मोहितने एकूण ६१८ गुणांसह रौप्यपदक, तर पुण्याच्या अभिजित सिंहने एकूण ६१२.९ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

  • मुंबई शहर-पुणे अंतिम झुंज मुंबई शहरने बलाढय़ ठाण्याला २-१ ने पराभूत करून बॅडिमटन महिला सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांची गाठ दुसऱ्या मानांकित पुण्याशी पडेल. पुण्याने नागपूरचा २-१ अशाच फरकाने पराभव केला.

पंतप्रधानांची २७ जानेवारीला ‘परीक्षा पे चर्चा’ :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जानेवारी रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत, अशी घोषणा शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी केली.

  • नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये पंतप्रधान संवाद साधणार आहेत. शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी यासंदर्भात ट्वीट केले.

  • १६ फेब्रुवारी २०१८ रोजी याच स्टेडियममध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधानांच्या संवादात्मक कार्यक्रमाची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.

“नोटबंदीचा निर्णय घेताना केंद्राने विश्वासात घेतलं नाही”, आरबीआयची माहिती :
  • सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सोमवारी नोटबंदीबाबत मोठा निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा घेतलेला निर्णय ४:१ च्या बहुमताने कायम ठेवला. पण नोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत आरबीआयला विश्वासात घेतलं नसल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.

  • “नोटबंदीचा निर्णय घेण्याआधी सहा महिने केंद्र सरकार आरबीआयशी सल्लामसलत करत होतं, असं सांगण्यात आलं. पण आरबीआय मंडळाला निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यात आलं नाही. कदाचित आरबीआयचे एक-दोन अधिकारी निर्णय प्रक्रियेचा भाग असतील. पण नोटबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी अर्धा ते एक तास आधी एक बैठक बोलवण्यात आली. तसेच या बैठकीच्या विषयाची माहितीही आरबीआय अधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती, असं एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत आरबीआय बोर्डाला विश्वासात घेतलं नव्हतं, असे संकेत एका अधिकाऱ्याने दिले.

  • आरबीआय बोर्डाने मे २०१६ मध्ये म्हणजेच नोटबंदीच्या सहा महिने आधी दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्यास मंजुरी दिली होती. परंतु २०१६ मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आरबीआय बोर्डच्या बैठकांमध्ये ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याबाबत कोणतीही चर्चा केली नाही, असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं.

गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) माजी अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी निवड झाली आहे.गांगुलीने ऑक्टोबरमध्ये ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद सोडले होते. आता तो दिल्ली कॅपिटल्ससह ‘आयएलटी ट्वेन्टी-२०’मधील संघ दुबई कॅपिटल्स आणि दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० लीगमधील पट्रोरिया कॅपिटल्स संघाच्या क्रिकेटविषयक निर्णय आणि कामकाजावर लक्ष ठेवणार आहे.

  • ‘‘सौरव दिल्ली कॅपिटल्सशी पुन्हा जोडला गेला आहे. त्याच्यासोबत चर्चा पूर्ण झाली आहे. त्याने यापूर्वीही दिल्ली कॅपिटल्स संघासोबत काम केले आहे. त्यामुळे संघमालकांशी त्याचे चांगले संबंध आहेत. तो दिल्ली कॅपिटल्ससोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे,’’ असे ‘आयपीएल’मधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

  • गांगुलीने यापूर्वी २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रेरक म्हणून काम केले होते. त्याचे मार्गदर्शन युवा खेळाडूंसाठी फायदेशीर ठरले होते. दिल्ली संघाने नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’च्या लिलावात मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि गांगुली यांच्या सूचनेनुसारच खेळाडू खरेदी केल्याची माहिती आहे. गांगुली कॅपिटल्स समूहाच्या ‘आयपीएल’मधील संघासह अन्य लीगमधील संघांवरही लक्ष ठेवणार आहे.

  • ‘‘गौतम गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्स आणि डरबन सुपर जायंट्स, महेला जयवर्धने हा मुंबई इंडियन्ससह एमआय एमिरेट्स आणि एमआय केप टाऊन या संघांसोबत काम करत आहे. त्यामुळे आता प्रशिक्षक आणि प्रमुख साहाय्यकांची भूमिका आता बदलत आहे. त्यांना ‘आयपीएल’सह परदेशातील लीगमधील आपापल्या संघांवरही लक्ष ठेवावे लागते आहे. आता त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ जानेवारी २०२२

 

महावितरण कंपनीच्या ११ हजार कोटींच्या कर्जाला राज्य शासनाची हमी :
  • करोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा मोठा  आर्थिक फटका महावितरण वीज कंपनीला बसला. ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी ऊर्जा विभागाला कर्ज काढावे लागणार आहे. त्यानुसार विविध वित्तीय संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जाला राज्य शासनाने हमी दिली आहे.

  • राज्यात टाळेबंदीच्या काळात उद्योग, व्यवसाय बंद झाल्याने वीजेची मागणी घटली. दररोज २३ हजार मेगा वॅटची असणारी मागणी १६ हजार मेगा वॉटपर्यंत खाली आली. त्याचबरोबर उद्योग व वाणिज्यिक ग्राहकांना व शासनाने इतरांना दिलेल्या सवलतीमुळे महानिर्मिती, महापारेषण व महावितरण वीज कंपनीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता ही आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी ऊर्जा विभागास वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे भाग पडत आहे.

  • या संदरभात ऊर्जा विभागाने महावितरण वीज कंपनीला कर्ज घेण्यासाठी शासनहमी मिळण्याकरिता  ८ हजार ५०० कोटी रुपये कर्ज व त्यावरील २ हजार ९०१ कोटी रुपयांचे व्याज, असा एकूण ११ हजार ४०१ कोटी रुपयांच्या  कर्जाला हमीसाठी प्रस्ताव सादर केला. या पस्तावाला समितीने मान्यता दिली आहे.   महावितरण कंपनीस आरईसी लि. कंपनीकडून ४२०७, बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून १११३, युनियन बॅंक-१२२९, युको बॅंक-६११, यूको बॅंक-७३१, पंजाब नॅशनल बॅंक-२२८८ आणि बॅंक ऑफ इंडियाकडून १२२२ असे एकूण ११ हजार ४०१ इतके कर्ज घेण्यास राज्य शासनाने हमी आहे.

महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयास कोविड काळजी केंद्र म्हणून मान्यता :
  • ओमायक्रॉन लाटेच्या पार्श्वभूमीवर सावंगी येथील महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय संशोधन केंद्रास कोविड काळजी केंद्र म्हणून मान्यता मिळाली असून विदर्भातील ते पहिले केंद्र ठरले आहे. गत काही दिवसांपासून ओमायक्रॉन व तत्सम स्वरूपातील रुग्ण आढळून येत आहे.

  • त्यादृष्टीने खबरदारीचे उपाय शासनाकडून राबविल्या जात आहे. शासकीय तसेच खासगी कोविड काळजी केंद्र अग्रक्रमाने सुरू केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठाच्या महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयास काळजी केंद्र म्हणुन तत्परतेने मान्यता दिली.

  • संस्थेची इमारत अधिग्रहित करून सशुल्क उपचार सुरू होणार आहे. त्यासाठी प्रती रुग्ण प्रती दिवस दीड हजार रुपये आकारल्या जातील. शासनाकडून संस्थेला कोणतेही अनुदान मिळणार नाही. या शुल्कात खाट, भोजन, डॉक्टर सल्ला व शुश्रुषा तसेच उपचार मिळतील.

  • आरोग्य यंत्रणेकडून शिफारस करण्यात आलेल्या रुग्णांनाच येथे दाखल करून घेणे बंधनकारक आहे. या रुग्णालयाची क्षमता २४४ रुग्ण खाटांची असून विदर्भातील एवढय़ा मोठया क्षमतेचे हे पहिले कोविड काळजी केंद्र ठरणार. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.उदय मेघे म्हणाले की, रुग्णालयात कोविड विषयक सुविधा पुर्वीपासूनच आहेत. दुसऱ्या लाटेतही रुग्णालयाने जबाबदारी स्वीकारली होती. आयुर्वेदचे काही रुग्ण अन्य इमारतीत या वेळी स्थलांतरित करावे लागतील.

भारत-चीन सीमासंघर्षादरम्यान लडाखमधल्या नियंत्रण रेषेजवळच्या तलावावर चीन बांधतंय नवा पूल :
  • पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LAC) भागाच्या बाजूने पायाभूत सुविधांची उभारणी सुरू ठेवून, चीन पॅंगॉन्ग त्सोवर एक नवीन पूल बांधत आहे जो उत्तर आणि दक्षिण किनार्‍या दरम्यान तलावाच्या, आणि LAC च्या जवळ अधिक वेगाने सैन्य तैनात करण्यासाठी अतिरिक्त संधी प्रदान करेल.

  • इंडियन एक्सप्रेसच्या सूत्रांनी सांगितले की तलावाच्या उत्तर किनाऱ्यावर फिंगर ८ च्या पूर्वेला २० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर पूल बांधला जात आहे.

  • भारत म्हणतो की फिंगर ८ LAC दर्शवितो. पुलाचे ठिकाण रुतोग काउंटीमधील खुर्नाक किल्ल्याच्या पूर्वेस आहे जेथे पीपल्स लिबरेशन आर्मीचे सीमावर्ती तळ आहेत. खुर्नाक किल्ल्यावर एक फ्रंटियर डिफेन्स कंपनी आहे आणि बनमोझांग येथे पूर्वेला एक वॉटर स्क्वाड्रन आहे.

  • मे २०२० मध्ये लष्करी अडथळे सुरू झाल्यापासून, भारत आणि चीनने केवळ विद्यमान पायाभूत सुविधा सुधारण्यासाठीच काम केले नाही, तर संपूर्ण सीमारेषेवर अनेक नवीन रस्ते, पूल, लँडिंग स्ट्रिप देखील बांधले आहेत. पेंगॉन्ग त्सो, एक एंडोरहिक सरोवर, १३५ किमी लांब आहे, ज्यापैकी दोन तृतीयांश पेक्षा जास्त चीनच्या नियंत्रणाखाली आहे. चीन जिथे नवीन पूल बांधत आहे त्याच्या अगदी जवळ असलेला खुर्नाक किल्ला, बुमेरांग आकाराच्या तलावाच्या जवळ आहे.

देशात करोनाची तिसरी लाट; करोना टास्क फोर्सच्या प्रमुखांचं मोठं विधान :
  • करोनाची तिसरी लाट आलेली असताना देशात नोंदवण्यात आलेली सर्वाधिक ओमायक्रॉन प्रकरणं मोठ्या शहरांमधील असल्याचं देशाच्या लस टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. देशात करोनाची तिसरी लाट जवळपास आली असल्याचंही यावळी ते म्हणाले.

  • नोव्हेंबर महिन्यात सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर वेगाने संसर्ग होणाऱ्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमधील ७५ टक्के रुग्ण मुंबई, दिल्ली आणि कोलकाता अशा मोठ्या शहरांमधील असल्याचं डॉक्टर एन के अरोरा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे.

  • “जिनोम सिक्वेन्सनुसार तुम्ही व्हेरियंटकडे पाहिलंत तर डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पहिल्या व्हायरसची नोंद झाली. गेल्या आठवड्यात देशात एकूण १२ ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असून ते आता २८ टक्क्यांवर पोहोचले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

  • यात महत्वाचं म्हणजे मुंबई, कोलकाता आणि खासकरुन दिल्ली अशा मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या जास्त असून ७५ टक्क्यांहून अधिक आहे,” अशी माहिती डॉक्टर अरोरा यांनी दिली आहे. डॉक्टर अरोरा राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे चेअरमनदेखील आहेत.

गोव्यातही शाळा, महाविद्यालये बंद ; करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय :
  • करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोव्यात शाळा आणि महाविद्यालये २६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रात्रीच्या जमावबंदीचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

  • मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी करोना कृती दलाची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोवा सरकारने काही निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात रविवारी करोना रुग्णवाढीचा दर १०.७ टक्के होता. करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी कृती दलाची बैठक घेतली.

  • ‘‘करोना रुग्णवाढीमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांची शारीरिक सत्रे बंद राहतील. लस घेण्यासाठी ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागेल. लसीकरण झाल्यानंतर त्यांना शाळेत येण्याची गरज नाही,’’ असे कृती दलाचे सदस्य शेखर साल्कर यांनी सांगितले.

04 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.