चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ नोव्हेंबर २०२१

Date : 3 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“ राज्यात ३० नोव्हेंबर पर्यंत किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा :
  • विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

  • “करोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे.”, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

  • आपआपल्या जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सुचनाही केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या (३ नोव्हेंबर) रोजी कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक झाली.

नाव बदलानंतर फेसबुकचा दुसरा मोठा निर्णय, फोटो आणि व्हिडीओसाठीचं ‘हे’ फिचर बंद होणार :
  • आपल्या मूळ कंपनीचं नाव बदल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेतलाय. यानुसार फेसबुकवरील चेहरा ओळखीच्या स्वयंचलित तंत्रज्ञानाचा म्हणजेच ‘ऑटो फेस रिकॉग्निशन’ (Auto Face recognition system) वापर बंद केला जाणार आहे. यामुळे फेसबुकवर फोटो किंवा व्हिडीओ अपलोड झाला की त्यात कोण व्यक्ती आहेत हे आपोआप ओळखणं आणि त्या व्यक्तींना टॅग करण्याबाबतचे नोटिफिकेशन बंद होणार आहे.

  • फेसबुकने ऑटो फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. यानंतर फेसबुकवरील फोटोज आणि व्हिडीओमध्ये आपोआप टॅगिंग सुरू झालं. हा अनुभव वापरकर्त्यांसाठी नवा होता. त्यामुळे सुरुवातीला अनेक वापरकर्त्यांनी फोटो आणि व्हिडीओत स्वतःला आपोआप टॅग करून घेण्यासाठी हे फिचर वापरण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक डेटा वापरण्याची फेसबुकला परवानगी दिली.

  • फेसबुकच्या या निर्णयानंतर आता ज्या वापरकर्त्यांनी आधी ऑटो फेस रिकॉग्निशनलला परवानगी दिली होती होती त्यांचंही आपोआप टॅगिंग बंद होणार आहे. याशिवाय यापूर्वी ऑटो फेस रिकॉग्निशनसाठी गोळा करण्यात आलेल्या चेहऱ्यांचा कोट्यावधी लोकांचा डेटा देखील फेसबूक डिलीट करणार आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून बांगलादेशचा धुव्वा :
  • कॅगिसो रबाडा (३/२०) आणि आनरिख नॉर्किए (३/८) या वेगवान जोडीच्या भेदक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकात बांगलादेशचा सहा गडी आणि ३९ चेंडू राखून धुव्वा उडवला. या विजयासह आफ्रिकेने उपांत्य फेरीसाठी दावेदारी अधिक भक्कम केली.

  • ‘अव्वल-१२’ फेरीच्या या सामन्यात बांगलादेशने दिलेले ८५ धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने १३.३ षटकांत पूर्ण केले. सलग चौथ्या पराभवामुळे बांगलादेशचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. कर्णधार तेम्बा बव्हूमा (नाबाद ३१) आणि ऱ्हासी वॅन डर डुसेन (२२) यांनी ४७ धावांची भागीदारी रचत तिसरा विजय सुनिश्चित केला.

“तुम्ही माझ्या पक्षात सामील व्हा”; इस्रायलच्या पंतप्रधानांचं मोदींना आवाहन :
  • ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी-२६’ या जागतिक हवामान परिषदेत पंतप्रधान मोदींनी जगातील इतर सर्व नेत्यांना भेटताना दिसत होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्यातील भेट हा चर्चेचा विषय ठरत आहे.

  • या बैठकीत इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी पंतप्रधान मोदींना तुम्ही इस्रायलमध्ये खूप लोकप्रिय आहात, तुम्ही माझ्या पक्षात सामील व्हा असे सांगितले. या भेटीचा व्हिडिओही समोर आला आहे.

  • ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी-२६’ या जागतिक हवामान परिषदेत पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्यासोबत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. तसेच उच्च-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर विचाराबाबत चर्चा  केली. नाविन्य. प्रदान केले जाईल. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये मैत्री दिसून आली. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनीही भारत आणि इस्रायलमधील मजबूत संबंधांसाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

मोदी यांच्या शून्य उत्सर्जन घोषणेचे ब्रिटिश पंतप्रधानांकडून स्वागत :
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या समतोल वापरातून २०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याची घोषणा केली असून त्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वागत केले आहे. ग्लासगो येथील जागतिक परिषदेत सोमवारी मोदी यांनी भारताची भूमिका मांडताना ही घोषणा केली असून भारतातर्फे तसे प्रथमच जाहीर करण्यात आले आहे.

  • २०३० पर्यंत भारताची इंधनाची निम्मी गरज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून भागविली जाईल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्याची पंचसूत्री मोदी यांनी ग्लासगो परिषदेत मांडली. त्यात २०३० पर्यंत भारताची जिवाश्मरहित इंधननिर्मितीची क्षमता ५०० गिगावॉटपर्यंत वाढविण्याचे सूतोवाच केले आहे. या कालावधीपर्यंत भारतात अपेक्षित असलेल्या कार्बन उत्सर्जनात एक अब्ज टनांची घट करण्याचा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला आहे.

  • यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जॉन्सन म्हणाले की, भारताने २०३० पर्यंत आपली इंधनाची निम्मी गरज अपारंपरिक ऊर्जेतून भागविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. यातून कार्बनचे उत्सर्जन कित्येक अब्ज टनांनी कमी होणार आहे. जगभरात हवामान बदल रोखण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यामुळे मोठी मदत होणार आहे.

०३ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.