चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ ऑगस्ट २०२०

Date : 3 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एफए चषक फुटबॉल स्पर्धा - आर्सेनलला जेतेपद :
  • लंडन : सुरुवातीलाच पिछाडीवर पडल्यानंतर जोमाने मुसंडी मारत आर्सेनलने चेल्सीचा २-१ असा पराभव करून १४व्यांदा एफए चषक फु टबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. पाएरे-एमेरिक ऑबामेयांगचे दोन गोल आर्सेनलच्या विजयात निर्णायक ठरले.

  • चाहत्यांच्या आणि प्रिन्स विल्यम्सच्या अनुपस्थितीत वेम्बले स्टेडियमवर झालेल्या या लढतीत ख्रिस्तियन पुलिसिकने पाचव्या मिनिटालाच गोल करत चेल्सीला जबरदस्त सुरुवात करून दिली होती; पण २३ मिनिटांनंतर मिळालेल्या पेनल्टीवर ऑबामेयांगने गोल करत आर्सेनलला बरोबरी साधून दिली.

  • त्यानंतर ६७व्या मिनिटाला ऑबामेयांगने आणखी एक गोल करत आर्सेनलला विजेतेपद मिळवून दिले. चेल्सीने बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा के ली; पण ७३व्या मिनिटाला त्यांच्या मटेओ कोव्हाकिक याला दुसरे पिवळे कार्ड दाखवल्यामुळे मैदानाबाहेर जावे लागले. त्यामुळे बरोबरी साधण्याच्या चेल्सीच्या प्रयत्नांना सुरुंग बसला.

  • या विजयासह आर्सेनलने पुढील वर्षीच्या ‘यूएफा’ युरोपा लीगमधील आपले स्थान निश्चित केले. जानेवारी महिन्यात आर्सेनलच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या मिके ल अर्टेटा यांचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.

शिष्यवृत्तीवर परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांची उपासमार :
  • नागपूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणारी शिष्यवृत्ती गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे.

  • शैक्षणिक शुल्क न भरल्याने या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सातत्याने बोलणी खावी लागत आहेत. त्यातच करोनाकाळात कुणीही मदत करत नसल्याने काही विद्यार्थ्यांवर गरिबांसाठी चालवण्यात येणाऱ्या अन्नछत्रांमध्ये जेवणाची वेळ आल्याचा धक्कादायक अनुभव ऑस्ट्रेलियात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

  • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, या शिष्यवृत्तीच्या नावाने शासनाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची थट्टा मांडल्याचा आरोप विदेशी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

  • यूएनएसडब्ल्यू सिडनी, ऑस्ट्रेलिया या विद्यापीठात शिकत असलेल्या काही विद्यार्थ्यांनीच आपला कटू अनुभव ‘लोकसत्ता’कडे मांडला. गोपनीयतेच्या कारणास्तव या विद्यार्थ्यांची नावे प्रसिद्ध केलेली नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर आणखी एक विक्रम :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. भाजपाचे सर्वात प्रदीर्घकाळ असलेले पंतप्रधान म्हणून पंतप्रधान मोदींनी विक्रम केला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. तसेच, सर्वात जास्त काळापर्यंत पंतप्रधान पदावर असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणून देखील पंतप्रधान मोदी यांनी विक्रम केला आहे.

  • पंतप्रधान मोदी यांच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी हे सर्वात प्रदीर्घकाळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. तर, सलग २ हजार २५६ दिवस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावर होते. १९ मार्च १९९८ रोजी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले होते. जे सलग २२ मे २००४ पर्यंत पंतप्रधान पदावर होते. त्यांचा पहिला कार्यकाळ १९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९९ पर्यंत होता. तर दुसरा कार्यकाळ १३ ऑक्टोबर ते २२ मे २००४ पर्यंत होता.

  • तर, सद्यस्थितीस देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असलेले नरेंद्र मोदी हे २ हजार २६० दिवसांपासून आजतागायत पंतप्रधान पदावर कायम आहेत. यामुळे सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर राहिलले पहिले गैरकाँग्रेसी व भाजपा नेता म्हणून त्यांच्या नावे विक्रम झाला आहे.

  • नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ २६ मे २०१४ पासून सुरू झाला असून, तो अद्यापही सुरूच आहे. २०१४ मध्ये भाजपा प्रचंड बहुमत मिळवत देशात सत्तेत आली होती. त्यानंतर २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यांचा पहिला कार्यकाळ २०१९ मध्ये संपला होता. मात्र, पुन्हा एकदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवत सत्ता मिळवली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले.

परदेशी प्रवाशांना भारतात प्रवेश करताना पाळावे लागणार ‘हे’ नियम; नवी नियमावली जाहीर :
  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. ८ ऑगस्टपासून हे नियम लागू होणार आहेत. या नियमांनुसार, सर्व प्रवाशांना निश्चित प्रवासापूर्वी कमीत कमी ७२ तास आधी https://newdelhiairport.in या वेबसाईटवर जाऊन प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे.

  • या नव्या नियमावलीत म्हटलं की, प्रवाशांना पोर्टलवर एक प्रतिज्ञापत्र द्याव लागणार आहे ज्यामध्ये त्यांना १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीचं पालन करावं लागेल. यामध्ये सात दिवसांचं संस्थात्मक क्वारंटाइन असेल यासाठी त्यांना स्वतःच खर्च करावा लागेल.

  • त्यानंतर सात दिवसांचं होम क्वारंटाइन असेल. तर गर्भवती महिला, कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाल्यास, गंभीर आजार किंवा १० वर्षापेक्षा कमी वय असलेली मुलं असतील तर अशा परिस्थितीत १४ दिवसांसाठी क्वारंटाइनची परवानगी दिली जाऊ शकते. त्यासाठी वेबसाईटवरच आधी माहिती द्यावी लागेल.

पाकिस्तानी न्यूज चॅनेल हॅक, स्क्रीनवर झळकला भारतीय तिरंगा :
  • पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘डॉन’ हॅक करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. वृत्तवाहिनी हॅक केल्यानंतर स्क्रीनवर भारतीय तिरंगा झळकला. सोबतच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. वृत्तवाहिनी हॅक झाल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ट्विटरला अनेकांनी हे व्हिडीओ, फोटो सोशल केले आहेत.

  • वृत्तवाहिनीवर जाहिरात सुरु असतानाच अचानक स्क्रीनवर भारतीय तिरंगा झळकला. आणि सोबत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हा मेसेज किती वेळासाठी स्क्रीनवर होता यासंबंधी माहिती मिळू शकलेली नाही.

  • दरम्यान वृत्तवाहिनीकडून ट्विट करण्यात आलेलं असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचं सांगितलं आहे.

०३ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.