चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ ऑक्टोबर २०२०

Date : 2 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ब्रेग्झिट विधेयकावरून ‘ईयू’ची ब्रिटनविरुद्ध कायदेशीर कारवाई :
  • ब्रेग्झिट करारामधील काही तरतुदींचा भंग करणारा कायदा मंजूर करण्याची योजना आखल्याबद्दल युरोपीय समुदायाने (ईयू) गुरुवारी ब्रिटनविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.

  • युरोपीय समुदायाने केलेल्या या कारवाईमुळे ब्रिटनसमवेत असलेले संबंध अधिकाधिक बिघडले असल्याचे अधोरेखित झाले आहे. नव्या कायद्याबाबतचे विधेयक मागे घेण्यासाठी युरोपीय समुदायाने ब्रिटनला बुधवापर्यंतची मुदत दिली होती. मात्र ब्रिटनच्या लोकप्रतिनिधींनी कायदा करण्याचा प्रस्ताव ३४० विरुद्ध २५६ मताधिक्याने रेटून नेला.

  • या वर्षांअखेपर्यंत दोन्ही बाजूंचा प्राथमिक स्वरूपाचा मुक्त व्यापार करार करण्याचा प्रयत्न असला तरी ब्रिटनच्या अंतर्गत बाजारपेठ विधेयकावरून या महिन्यात दोन्ही बाजूंमधील संबंध बिघडले आहेत.

अमेरिकेत निर्वासितांचा लोंढा कमी करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव :
  • अमेरिकेत प्रवेश दिल्या जाणाऱ्या निर्वासितांची संख्या आणखी कमी करून येत्या वर्षी या निर्वासितांना आजवरच्या नीचांकी संख्येत प्रवेश देण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाने दिला आहे.

  • आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कमाल १५ हजार निर्वासितांना स्वीकारण्याचा आमची इच्छा असल्याचे प्रशासनाने बुधवारी उशिरा, असा प्रस्ताव देण्याच्या मुदतीच्या केवळ ३४ मिनिटे आधी काँग्रेसला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. २०२० या आर्थिक वर्षांत प्रशासनाने निर्वासितांच्या संख्येवर १८ हजारांची मर्यादा लावली होती व तिची मुदत बुधवारी मध्यरात्री संपली.

  • काँग्रेस आता या प्रस्तावाचा आढावा घेईल. अशा रीतीने निर्वासितांची संख्या कमी करण्यास काँग्रेसच्या सदस्यांचे तीव्र आक्षेप आहेत, मात्र अधिकारांअभावी हा बदल लागू करणे लोकप्रतिनिधींना भाग पडेल असे दिसते.

  • मिनेसोटा येथील निवडणूक प्रचारसभेत केलेल्या भाषणात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांची संभावना ‘अवांछित बोजा’ असे केल्यानंतर काही वेळातच सुमारे १६.५ टक्क्यांची ही कपात लागू करण्यात आली. आपले प्रतिस्पर्धी व माजी उपाध्यक्ष जो बायडेन हे राज्य निर्वासितांनी भरू पाहात असल्याचा हल्ला त्यांनी या वेळी चढवला.

ट्विटर झालं डाऊन.. हजारो युजर्सना ‘नॉट वर्किंग’चा मेसेज :
  • ट्विटर डाउन झालं आहे. अनेक युजर्सना काही वेळापासून नॉट वर्किंगचा मेसेज येतो आहे. यामागचं कारण काय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अनेक युजर्सना ट्विटर ऑपरेट करताना प्रॉब्लेम येतो आहे.

  • ट्विटरकडून अद्याप याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य किंवा पत्रक पोस्ट करण्यात आलेलं नाही. द सनने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

  • अमेरिकेतल्या काही भागांमध्येही ट्विटर लोड न होण्याची समस्या युजर्सना जाणवत होती. तसंच काही वेळापूर्वी भारतातही अनेक युजर्सना ही समस्या जाणवत होती. मात्र काही वेळाने ट्विटर पूर्ववत झालं आहे.

०२ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.