चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जुलै २०२०

Date : 2 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पर्यायी भारतीय अ‍ॅप्सना उत्तम प्रतिसाद :
  • भारतात सरकारच्या आदेशानंतर  टिकटॉक हे चिनी उपयोजन (अ‍ॅप) बंद होताच त्याची जागा ‘चिंगारी’ या उपयोजनाने घेतली आहे. त्याचे प्लेस्टोअरवरून १ कोटीहून  अधिक डाऊनलोड झाले आहेत.

  • भारत सरकारने अलीकडेच टिकटॉकसह ५९ चिनी उपयोजनांवर बंदी घातली होती. टिकटॉक हे लघुचित्रफीत उपयोजन चीनच्या बाइटडान्सच्या मालकीचे आहे. सरकारने टिकटॉक बंद केल्यानंतर भारतातील त्याचे  प्रतिस्पर्धी उपयोजन असलेल्या ‘चिंगारी’ व ‘मित्रों’ उपयोजनांची सरशी झाली आहे. चिंगारी अ‍ॅपचे तासाला १ लाख डाउनलोड झाले आहेत.

  • टिकटॉक बंद झाल्याने त्याचे भारतातील स्पर्धक खूश आहेत. चिंगारीच्या मुख्य उत्पादन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, चिंगारीचे तासाला १ लाख डाऊनलोड होत आहेत. आता आम्ही सव्‍‌र्हरची क्षमता वाढवत आहोत व ही मागणी पूर्ण करणार आहोत. गुगल प्ले स्टोअरवरून ७२ तासांत चिंगारीचे ५ लाख डाऊनलोड झाले. आता टिकटॉक पूर्ण बंद झाले आहे.

मोदींकडून चिनी सोशल मीडियाही बॅन; ‘हे’ अकाउंट केलं बंद :
  • देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याचा आधारे भारत सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, हॅलो, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चीनमधील लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन आपले अकाउंट डिलीट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

  • भारताने ५९  चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चीनमध्ये लोकप्रिय असणाऱ्या विबो या सोशल नेटवर्किंग साइटवरील आपले अधिकृत अकाउंट बंद केलं आहे.

  • मोदींनी काही वर्षांपूर्वी या प्लॅटफॉर्मवर अकाउंट सुरु केलं होतं, असं एएनआयने म्हटलं आहे. मात्र लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील लघु उद्योगांना जागतिक बँकेचे ७५ कोटी डॉलर :
  • भारतातील १५ कोटी सुयोग्य लघु व मध्यम उद्योगांसाठी ७५ कोटी डॉलर्सची अर्थसंकल्पीय मदत देणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

  • २०२० या आर्थिक वर्षांत ( जुलै २०१९ ते जून २०२०) जागतिक बँकेने भारताला ५.१३ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते ते या दशकातील सर्वाधिक होते. त्यात कोविड १९ साथीचा मुकाबला करण्यासाठी त्यातील २.७५ अब्ज डॉलर्सचे कर्ज लगेच मंजूर करण्यात आले होते.

  • जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी सांगितले की, बहुदेशीय कर्ज विकास धोरणाअंतर्गत भारताला कर्ज देण्यात आले होते आता लघु व मध्यम उद्योगांसाठीही तशीच तरतूद करण्याचा विचार आहे. सरकारला तरलता, बँकेतर आर्थिक संस्था व लहान वित्त बँका यांना पाठबळ देण्यासाठी या निधीचा वापर करता येईल त्यातून लघु व मध्यम उद्योगांना मदत होईल. त्यानंतरच्या काळात लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने संकुल पातळीवर क्षमता  वाढवण्यास मदत केली जाईल.

०२ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.