चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ एप्रिल २०२१

Date : 2 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सुटीच्या दिवशीही मिळणार लस!; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय :
  • करोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवनवीन कृती कार्यक्रम हाती घेतला जात असून, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटच्या त्रिसुत्रीनंतर लसीकरणावर जोर दिला जात आहे. देशात दुसरी लाट आल्यानंतर केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

  • देशात पुन्हा एकदा करोना बळावू लागला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात संक्रमणाचा वेग वाढल्यानं केंद्राने काही निर्णयही घेतले असून, त्यात लसीकरणाला वेग देण्यावर जोर देण्यात आला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. तिथे दोन आठवड्यात लसीकरण करण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आलेल्या आहेत.

  • निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय आणि खासगी करोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत.

  • केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच केलेल्या घोषणेनुसार देशभरात ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी आजपासून लसीकरण सुरू झालं आहे. आतापर्यंत करोनायोद्धे, सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील व्यक्ती तसेच ६० वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात होतं. आता मध्यमवयीन व्यक्ती करोना बाधित होण्याचं प्रमाण प्रचंड असल्यानं लसीकरणाचा विस्तार करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता.

गुगल नकाशात महाराष्ट्रातील काही गावे गुजरात राज्यात :
  • महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने घुसखोरी करुन पथदिवे उभारल्याने सीमेचा वाद मिटलेला नसताना गुगल नकाशात महाराष्ट्रातील काही गावे गुजरात राज्यात दाखविल्याने नवा वाद उद्भवला आले. त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

  • गुगल नकाशावार वेवजी, गीरगाव, गिमाणीया, संभा, आच्छाड  ग्रामपंचायती गुजरात राज्याच्या सीमेअंतर्गत दर्शवण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वेवजी मधील  इंडीया कॉलनी, दुकाने तसेच एमबीबीआय शाळा गुजरात राज्यात दिसत असल्याने सीमा भागातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.

  • दरम्यान, वेवजी  ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं २०४ चा भुखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत  सर्वे नंबर. १७३ हे दोन भुखंडावर दोन राज्यांची सिमा आहे. गुजरात आणि महाराष्टर्् राज्याच्या या सीमेवरील हद्द निश्चिात नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहात आहेत.महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतीच्या हद्दीवरील महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा निश्चिात करण्याची मागणी होऊ लागली आहे.

महाराष्ट्र निसर्ग विकास मंडळाच्या नियामक मंडळावर चेतन दुनाखे यांची नियुक्ती :
  • महाराष्ट्र निसर्ग विकास मंडळाच्या नियामक मंडळावर (Governing Council) मधुचंदा ट्रॅव्हल्सचे संचालक चेतन दुनाखे यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आली आहे. वन क्षेत्रावर आधारित निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची डिसेंबर २०१५ मध्ये स्थापना करण्यात आली.

  • हे मंडळ राज्यातील ४८ अभयारण्ये, सहा राष्ट्रीय उद्याने आणि चार संवर्धन राखीव क्षेत्रे अशा ५८ वन्यजीव संरिक्षत क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्याचे काम करते. राज्यातील प्रसिद्ध वन्यजीव क्षेत्रात दरवर्षी सुमारे दहा लाख पर्यटक भेट देत असून या क्षेत्रात भविष्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.

  • पर्यटन क्षेत्रातील कार्यामुळे दुनाखे यांची महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनच्या खजिनदारपदी निवड झाली होती. आता दुनाखे असोसिएशनच्या गोल्डन जुबिली वर्षात सरचिटणीसपदी कार्यरत आहेत. चेतन दुनाखे यांना यापूर्वी ‘यंग आंत्रप्रिनरअवॉर्ड फॉर टुरिझम 2016’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आता त्यांची महाराष्ट्र निसर्ग विकास मंडळाच्या नियामक मंडळावर (Governing council ) निवड झाली आहे.

ऑनलाइन शिक्षणासाठी जिल्हा परिषदेचे ‘ई-दिशा’ अ‍ॅप :
  • करोनाच्या प्रादुर्भावामुळे  बिकट स्थिती निर्माण झाल्याने मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण झाले आहे. प्रत्येक मुलाने शिकावे यासाठी ऑनलाइन शिक्षण उपक्रम सुरू  आहेत. पालघर जिल्हा परिषदेनेही ई- दिशा अ‍ॅपची निर्मिती करुन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

  • या नवोपक्रमशील, उपक्रमशील शिक्षक सन्मानामुळे  इतरांना प्रेरणा मिळेल व पालघर जिल्ह्यचे नाव आणखी उंचावेल. ‘ई-दिशा’ जिल्ह्यसाठी मार्गदर्शक ठरले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी केले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने  दिशा अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले.  उपक्रमशील शिक्षक सन्मान कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या संकुल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

  • जिल्ह्यतील डोंगरी, दुर्गम, शहरी भागातील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी व शिक्षण विभागातील यंत्रणा सक्षम करण्यासाठी अ‍ॅपची निर्मिती केली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी होत असून सर्व शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करून गुणवत्तावाढीसाठी अधिक जोमाने काम करावे, असे  आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी केले.

एक लाख रुपये किलो… ही आहे ‘जगातील सर्वात महागडी भाजी’; औरंगाबादमधील शेतकरी घेतोय उत्पादन :
  • जगातील सर्वात महागड्या भाजीची किंमत एक लाख रुपये प्रति किलो आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भाजीची प्रायोगिक तत्वावरील लागवड बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केलीय. या भाजीचं नाव आहे हॉप शूट्स. खरं तर या भाजीचं उत्पादन ११ व्या शतकामध्ये करण्यात आलं आहे. ही वनस्पती त्यावेळी बियरमध्ये फ्लेवर आणण्यासाठी वापरली जायची. नंतर या वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून आणि आता थेट भाजी म्हणून करण्यात येऊ लागलाय.

  • शूट्सला एवढी किंमत असण्यामागील कारण म्हणजे या वनस्पतीमध्ये दोन खास प्रकारची अ‍ॅसिड मिळतात. या अ‍ॅसिडची नावं आहे ह्यूमोलोन्स आणि ल्यूपोलोन्स. या अ‍ॅसिडच्या मदतीने मानवी शरीरामध्ये अनियंत्रित पद्धतीने वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशींवर उपचार करता येतो असं मानलं जातं. कॅन्सरसारख्या आजारावर मात मिळवण्यासाठी या वनस्पतीमधील अ‍ॅसिड उपयोगी असल्यानेच तिला एवढा भाव मिळतो.

  • बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील नवीननगर ब्लॉकमधील करमडीह गावातील ३८ वर्षीय शेतकरी अमरेश सिंह हे या भाजीचं उत्पादन घेणारे पहिले भारतीय शेतकरी ठरलेत. सहा वर्षांपूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये एका किलो हॉप शूट्स एक हजार पौंडांना विकले होते. भारतीय चलनानुसार ही किंमत किलोमागे एक लाख रुपये इतकी होते. अर्थात ही भाजी इतकी महाग असल्याने ती भारतात खूपच कमी मिळते. खरं तर विशेष मागणी केल्यानंतर ती उपलब्ध करुन दिली जाते.

पश्चिम बंगालमध्ये ८०, तर आसाममध्ये ७५ टक्के मतदान :
  • पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी भरभरून मतदान झाले.

  • पश्चिाम बंगालमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८०.४३ टक्के तर आसामच्या ३९ जागांसाठी ७४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नंदिग्राममध्ये मतदान झाले असून, ममता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी या दोघांनीही विजयाचा दावा केला.

  • बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी तृणमूल कॉंगे्रसने निवडणूक आयोगाकडे केल्या.

०२ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.