चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ ऑगस्ट २०२०

Date : 1 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सेहवाग, सरदार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत :
  • माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या १२ जणांच्या निवड समितीत स्थान देण्यात आले आहे. या वर्षीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे मानकरी ठरवण्याची जबाबदारी या १२ जणांवर असणार आहे, असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले.

  • अपंग क्रीडापटू दीपा मलिकचाही या १२ जणांमध्ये समावेश आहे. एकच निवड समिती क्रीडा पुरस्कार निवडीसाठी ठेवण्याचे गेल्या वर्षीपासून सुरू केले आहे.

  • यंदाही तीच पद्धत अवलंबवण्यात येणार आहे. खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद हे पुरस्कार या एकाच समितीमार्फत ठरवण्यात येणार आहेत.

भारतातील ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा :
  • भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे.

  • संपूर्ण मूल्यांकनानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या तज्ज्ञांनी ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ला एक शिफारस केली आहे. यामध्ये सिरम इन्स्टीट्यूला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यास सांगितलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिली. या आठवड्याच्या सुरुवातीला समितीने सिरम इन्स्टिट्य़ूटला लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी सुधारित प्रोटोकॉल तयार करण्यास सांगितलं होतं. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अ‍ॅस्ट्राझेनेकाबरोबर या लसीला विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे.

  • ऑक्सफर्डच्या या लसीनं आतापर्यंत चांगली प्रगती केली आहे. तसंच ऑक्सफर्डच्या ज्या लसीवर संशोधन सुरू आहे त्याचे सुरूवाती निकाल उत्तम आहेत. तसंच ही लस सुरक्षितही आहे अशी माहिती लॅन्सेन्ट मेडिकल जर्नलनं आपल्या अहवालात दिली आहे. 

आणीबाणी काळातील सन्मान योजना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात आव्हान देणार :
  • कोल्हापूर : आणीबाणीच्या काळात बंदिवान झालेल्या व्यक्तींचे सन्मानधन बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर येथे टीका होत आहे. राज्य शासनाचा हा निर्णय चुकीचा असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्यात उमटत आहेत.

  • काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या विरोधात त्या वेळच्या विरोधकांनी आवाज उठवला होता. आणीबाणी विरोधात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. या सत्याग्रहींना सन्मान निधी देण्याचा निर्णय मध्य प्रदेशने घेतला होता. त्याचे अनुकरण महाराष्ट्र शासनाने केले होते.

  • आता करोनाचे कारण दाखवून शासनाने सन्माननिधी देण्याचा निर्णय बंद केला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात लाभार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. कोल्हापुरातील प्रफुल्ल जोशी यांना या अंतर्गत शिक्षा झाली होती. त्यांनी हे सन्मानधन स्वीकारायचे नाही असा निर्णय घेतला होता.

  • तथापि राज्य शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत त्यांनी शुक्रवारी व्यक्त केले. तर इचलकरंजीतील अनिल दंडगे यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. एक महिना पेक्षा अधिक शिक्षा झालेल्यांना दरमहा दहा हजार तर त्याहून कमी शिक्षा झालेल्यांना दरमहा पाच हजार रुपये सन्मानधन दिले जात होते, असे त्यांनी सांगितले.

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी :
  • करोनाच्या संकटात परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी मागणी करत विद्यापीठ अनुदान आयोगानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीलायुवा सेनेसह देशभरातील काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. या याचिकांवर आज निकाल येण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयानं याचिकांवरील सुनावणी १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय आणखी लांबवण्याची चिन्हं आहेत.

  • विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाला युवा सेनेसह काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेताना न्यायालयाने आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोगाने आपली भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र गुरुवारी न्यायालयात दाखल केले. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका मांडताना त्याची कारणेही स्पष्ट करण्यात आली होती.

  • या याचिकांवर आज सुनावणी होणार होती. न्यायालयानं या याचिकांवरील सुनावणी १० ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे याचिकांवर आता १० ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांची चीनच्या राजदूतांवर टीका :
  • दक्षिण चीन सागरात अस्थिरता निर्माण करणाऱ्या चीनच्या हालचालींवर ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओफॅरेल यांनी टीका केला होती. त्यावर चीनचे भारतातील राजदूत सुन वेइडाँग यांनी हरकत घेतल्याने त्यांच्यावर ओफॅरेल यांनी हल्ला चढविला आहे.

  • या प्रदेशातील स्थिती एकतर्फी बदलणारी कृती चीनने टाळली पाहिजे, असे ओफॅरेल यांनी म्हटले आहे.

  • दक्षिण चीन सागरातील चीनची कृती अस्थिरता निर्माण करणारी आणि तणाव वाढविणारी असल्याबद्दल ऑस्ट्रेलियाला चिंता वाटत असल्याचे गुरुवारी ओफॅरेल यांनी म्हटले होते. नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला दक्षिण चीन सागर हा महत्त्वाचा सागरी मार्गही आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

  • ओफॅरेल यांच्या वक्तव्याला वेइडाँग यांनी ट्वीट करून हरकत घेताना वक्तव्ये वस्तुस्थितीला धरून नसल्याचे मत व्यक्त केले. त्याला प्रत्युत्तर देताना ओफॅरेल यांनी, द हेगमधील न्यायालयाने चीनने दक्षिण चीन सागरावर केलेला सार्वभौमत्वाचा दावा फेटाळल्याचे स्पष्ट केले.

०१ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.