चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ जून २०२१

Updated On : Jun 01, 2021 | Category : Current Affairs


करोनाच्या स्ट्रेनचं WHOकडून नामकरण; भारतातील स्ट्रेन ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ :
 • जगभरात करोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले आहे. करोनाच्या विषाणूमध्ये बदल झाल्याने हे स्ट्रेन निर्माण झाले असून, त्याच्या नावांवरून गोंधळ निर्माण झाला असून, वादही होताना दिसत आहे. या सगळ्या गोंधळावर जागतिक आरोग्य संघटनेनं मार्ग काढला असून, विविध देशात आढळून आलेल्या करोना स्ट्रेनचं नामकरण केलं आहे. या स्ट्रेनला नाव देताना ग्रीक वर्णमालेचा आधार घेण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतात आढळून आलेल्या दोन स्ट्रेन डेल्टा आणि कप्पा अशी नावं देण्यात आली आहेत.

 • केंद्राने एकाच किमतीला लशी उपलब्ध कराव्यात! - करोनाचे नवीन स्ट्रेन निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नावावरून वाद सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वीच डबल म्युटेंशन असलेल्या B.1.617.2 स्ट्रेनचा भारतीय स्ट्रेन असा उल्लेख काढण्याचे आदेश केंद्र सरकारने सोशल मीडियाला दिले होते. तर सिंगापूर सरकारनंही सिंगापूरमध्ये आढळून आलेलं नवीन म्युटेशन भारतातीलच असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्या वादावर मार्ग काढत जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशात आढळून आलेल्या स्ट्रेनला नाव दिली आहेत.

 • करोनाच्या विविध उत्परिवर्तनांवरील औषधांचे प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा - आतापर्यंत भारतात करोनाचे दोन स्ट्रेन आढळून आलेल आहेत. त्या दोन्ही स्ट्रेनचंही नाव बदलण्यात आलं आहे. ग्रीक वर्णमालेचा वापर करून आरोग्य संघटनेनं ही नाव निश्चित केली आहेत. यात ऑक्टोबर २०२०मध्ये भारतात आढळून आलेल्या B.1.617.2 या स्ट्रेनला डेल्टा असं नाव देण्यात आलं आहे. तर मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आढळून आलेल्या B.1.617.1 या स्ट्रेनला कप्पा असं नाव देण्यात आलं आहे.

करोना पार्श्वभूमीवर सरकारने कौटुंबिक पेन्शनचे नियम केले सुलभ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती :
 • कोविड -१९ साथीच्या साथीच्या दृष्टीने कौटुंबिक पेन्शनशी संबंधित नियम सुलभ केले गेले आहेत. पेन्शन अ‍ॅन्ड पेन्शनर्स वेलफेयर विभागाने केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी दिली.

 • कार्मिक मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औपचारिकता किंवा प्रक्रियात्मक आवश्यकता पूर्ण होण्याची प्रतीक्षा न करता पात्र कुटुंब सदस्याकडून कुटुंब निवृत्तीवेतनाचा दावा मिळाल्यानंतर त्वरित कुटुंब निवृत्तीवेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

 • सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम, १९७२ च्या नियम ८० (ए) नुसार, सरकारी सेवेच्यावेळी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर, कुटुंबातील निवृत्तीवेतनाचे प्रकरण पुढे पाठविल्यानंतरच कुटुंबातील एका पात्र सदस्याला तात्पुरते कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर केले जाऊ शकते.

 • सध्या सुरू असलेल्या साथीच्या पार्श्वभूमीवर, कौटुंबिक पेन्शन प्रकरण पुढे पाठविण्याची वाट न पाहता, कुटुंबातील एखाद्या पात्र सदस्याकडून कौटुंबिक पेन्शन आणि मृत्यूचा दाखला मिळाल्यानंतर तात्पुरते कुटुंब पेन्शन त्वरित स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले.

‘सेंट्रल व्हिस्टा’चे काम सुरूच :
 • ‘सेंट्रल व्हिस्टा’ हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असल्याचा केंद्र सरकारचा दावा ग्रा मानून सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती देण्यास नकार दिला व दोन याचिकाकर्त्यांना १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

 • करोनाच्या काळात राजपथावरील प्रकल्पाचे कामे थांबवावे अन्यथा हे बांधकाम साथरोगाचे ‘मोठे प्रसारक’ ठरेल, अशी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे काम हे संपूर्ण प्रकल्पाचा भाग असून त्याकडे स्वतंत्रपणे पाहता येत नाही.

 • कामगार देखील प्रकल्पस्थळावरच राहात आहेत. शिवाय, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हा लोकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर इमारतींचा वापर संसदेच्या सार्वभौम कार्यासाठी केला जाणार आहे, असे न्या. डी. एन. पटेल व न्या. ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

 • नवे संसदभवन बांधण्याचे काम टाटा समूहाकडे तर, सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे काम शापुरजी पालोनजी समूहाकडे दिले आहे.

 • करारानुसार एव्हेन्यू प्रकल्पाअंतर्गत राजपथलगतच्या विस्तारीकरणाचे काम यावर्षी नोव्हेंबपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रकल्पस्थळांवर करोनासंदर्भातील नियमांचे पालन केले जात आहे, योग्य सुविधाही पुरवल्या जात असल्याने बांधकामाला स्थगिती देण्याची गरज नाही, असे न्यायालयाने नमूद केले. संयुक्त याचिकाकर्त्यां अनुवादक अन्या मल्होत्रा आणि इतिहासकार सोहेल हाश्मी यांनी विशिष्ट हेतूंनी जनहित याचिका केल्याचे कारण देत त्यांना एक लाखांचा दंड केला.

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! १७ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा :
 • करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये करोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतरच लीग पुढे ढकलण्यात आली.

 • नुकतीच बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली.

 • तारखेसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. पण माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना १० ऑक्टोबरला खेळला जाईल.

अमरावतीत कवडय़ा टिलवा पक्ष्याची दुर्मिळ नोंद :
 • शहरालगत असलेल्या बोरगाव धरण परिसरात ‘कवडय़ा टिलवा’ या चिखलपक्ष्याच्या उपस्थितीची दुर्मिळ नोंद घेण्यात आली. वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत निकम पाटील, पीयूष महाजन, राहुल चतुरकर, संकेत राजूरकर, कौशिक तट्टे आणि आनंद मोहोड यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पक्षीनिरीक्षणाकरिता केलेल्या भ्रमंतीदरम्यान घेतलेल्या छायाचित्रावरून सदर पक्ष्याची ओळख पटवण्यात आली आहे.

 • साधारणपणे १९ ते १९.५ से.मी. आकाराच्या या कवडय़ा टिलवा या पक्ष्याला त्याच्या सरळसोट चोचेमुळे मराठीमध्ये ‘चंचल तुतवार’ असे सुंदर पर्यायी नाव सुद्धा आहे. यालाच ‘सँडरलिंग’ असे इंग्रजी आणि ‘कॅलीड्रीस अल्बा’ असे शास्त्रीय नामानिधान आहे. हा पक्षी आपल्या विणेचा महत्त्वाचा काळ ईशान्य सायबेरिया तसेच अलास्का येथे घालवतो. हिवाळी स्थलांतरादरम्यान हा पक्षी इतर पक्ष्यांसोबत थव्याने भारतातील समुद्र किनाऱ्यावर येतो. पश्चिम किनारपट्टी आणि निकोबार भागात याचे आगमन कमी प्रमाणात होत असले तरी पूर्व किनाऱ्यावर याचा बराच मोठा आढळ दिसून येतो.

 • या पक्ष्याच्या पाठीचा आणि पंखांचा रंग फिकट राखाडी असतो, तो विणीच्या काळात लालसर करडय़ा रंगाचा दिसतो. पोटाचा रंग स्वच्छ पांढरा असून चोच सरळसोट सडपातळ असते. 

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा - संजीतला सुवर्ण :
 • आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सोमवारी संजीतने  भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. अमित पांघल आणि  शिवा थापा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

 • रविवारी महिलांनी चारपैकी फक्त सुवर्णपदक कमावल्यानंतर सोमवारी पुरुषांकडून सुवर्ण लयलूटीची अपेक्षा केली जात होती. परंतु पुरुषांच्या आव्हानाची सुरुवात खराब झाली. पण उत्तरार्धात ९१ किलो वजनी गटात संजीतने पाच वेळा आशियाई अजिंक्यपद विजेत्या आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या व्हॅसिली लेव्हिलचा ४-१ असा पराभव केला.

 • ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या शाखोबिदिन झॉयरोव्हने जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या अमितवर असा निसटता विजय मिळवला. अमितच्या निकालाबाबत भारतीय संघाने लवादाकडे दाद मागितली होती. मात्र ती फेटाळण्यात आली.

 • ६४ किलो गटाच्या अंतिम सामन्यात मोंगोलियाच्या आशियाई रौप्यपदक विजेत्या बतारसुख शिंझॉरिगने ३-२ असे विभाजीत निकालाआधारे नामोहरम केले.

०१ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)