चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ जून २०२०

Updated On : Jun 01, 2020 | Category : Current Affairsमाय लाईफ, माय योग; मोदींनी केली स्पर्धेची घोषणा :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी ‘मन की बात’मधून संवाद साधला. देशासमोर उभ्या असलेल्या करोना संकटापासून ते योग दिनापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं. देशानं करोनाविरोधात एकजुटीनं लढा दिला आहे.

 • आता लॉकडाउन शिथिल होत असून आता अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर, फ्रान्सलाही टाकलं मागे :
 • करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार करोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. यासोबत भारताने फ्रान्सला मागे टाकलं आहे. फ्रान्समध्ये करोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकलं असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

 • पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेत करोनाचे १८ लाख रुग्ण आहेत. यानंर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये करोनाचे पाच लाख तर रशियात करोनाचे चार लाख रुग्ण आहेत.

 • रविवारी देशात करोनाच्या ८३८० नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. एका दिवसात पहिल्यांदाच आठ हजाराचा आकडा पार झाला आहे. करोनाच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्यादेखील पाच हजारहून जास्त झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १९३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण ५,१६४ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांमध्ये ४,१६४ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४७.७६ टक्के आहे. देशभरात ८९,९९५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. देशात गेल्या तीन दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. एकीकडे भारत गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाउन शिथील करत असतानाच करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचं G7 शिखर संमेलन लांबणीवर; ट्रम्प देणार भारतालाही निमंत्रण :
 • अमेरिकेसह जगभरात थैमान घातलेल्या करोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्वाच्या नियोजित गोष्टी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यातच ४६ व्या G7 शिखर संमेलनाचाही समावेश झाला आहे. कारण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण ही शिखर परिषद सध्या सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलत असल्याचे शनिवारी माध्यमांशी बोलताना जाहीर केले.

 • विशेष म्हणजे या विशिष्ट देशांच्या गटाच्या संमेलनासाठी ट्रम्प भारतासह ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरियाला देखील आमंत्रित करणार आहेत. हे G7 शिखर संमेलन १० जून ते १२ जून दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार होते.

 • ट्रम्प म्हणाले, “आपण G7 शिखर संमेलन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलत आहोत. ही काही देशांची एक जुनी संघटना असली तरी मला वाटत नाही की, G7 संमेलन हे संपूर्ण जगाचं प्रतिनिधीत्व करु शकेल. त्यामुळे जगात सध्या काय घडत आहे हे नेमकं कळू शकणार नाही. त्यामुळे या संमेलनाला आपण भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरिया या देशांनाही निमंत्रित करणार आहोत.”

आपल्याला आता अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता - पंतप्रधान :
 • करोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून रविवारी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.

 • पंतप्रधान म्हणाले, “देशात सर्व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांतून कोरनाविरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरी देखील करोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगानं फैलाव हाऊ शकला नाही.

 • करोनामुळं होणारा मृत्यू दर देखील आपल्या देशात खूपच कमी आहे. मात्र, आपलं जे नुकसान झालं आहे त्याचं आपल्या सर्वांनाच दुःख आहे. मात्र, जे काही आपण वाचवू शकलो. ते निश्चितपणे देशाच्या सामुहिक संकल्पशक्तीचाच परिणाम आहे.”

स्थलांतरित मजुरांसाठी स्वतंत्र आयोगाचा विचार :
 • नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात दिली. करोनामुळे लाखो स्थलांतरितांना विविध प्रकारच्या हालअपेष्टा, आव्हानांना सामोरे जावे लागले. त्याची दखल घेताना मोदींनी स्थलांतरितांसाठी आयोग नेमण्यासंदर्भात केंद्रीय स्तरावर सविस्तर चर्चा केली जात असल्याचे सांगितले.

 • मजुरांकडे कोणत्या प्रकारचे कौशल्ये आहेत, याची माहिती घेण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी काही नवउद्यमी कंपन्यांची मदत घेतली जात आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर स्थलांतरित मजुरांसाठी आयोग नियुक्त करण्याचा विचार केला जात आहे, असे मोदी म्हणाले. करोनामुळे शहरांतील रोजगारावर गदा आल्याने स्थलांतरित मजूर गावी निघून गेले आहेत.

 • तिथे त्यांना रोजगाराची तसेच, स्वयंरोजगाराची संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गावांमध्ये लघुउद्योग सुरू करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात असल्याचे मोदी सांगितले.

०१ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)