चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ जुलै २०२०

Date : 1 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीनची नवी खेळी, भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी :
  • भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय प्रसारमाध्यमं तेथील प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत. चिनी सरकारचं मुखपत्र असणाऱ्या वेबसाईट्स तसंच वृत्तपत्रांमधील माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे. यादरम्यान चिनी सरकारने नवी खेळी करत भारतीय प्रसारमाध्यमं आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

  • भारतीय टीव्ही चॅनेल्स सध्या आयपी टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएन काम करत नाही आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी नागरिक फक्त व्हीपीएनच्या सहाय्याने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. पण चीनकडे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत फायरवॉल उपलब्ध असून या माध्यमातून व्हीपीएनदेखील ब्लॉक केलं जाऊ शकतं.

  • १५ जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या चकमकीत दोन्ही देशांचं नुकसान झालं असून भारताचे २० जवान शहीद झाले आहेत तर चिनी सैनिकही ठार झाले आहेत.

भारत महिन्याला ५० लाख PPE सूट करणार निर्यात :
  • केंद्र सरकारने करोना लॉकडाउनमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी स्थानिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून केंद्राने आता महिन्याला ५० लाख पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट (पीपीई सूट) निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात ट्विटवरुन महिती दिली आहे.

  • “मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी महिन्याला ५० लाख पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट (पीपीई सूट) निर्यात केले जाणार आहेत,” असं गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये गोयल यांनी एक महिती पत्रकही शेअर केलं आहे.

  • संसर्गजन्य करोनावरील उपचारादरम्यान डॉक्टर, नर्स आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पीपीई कीट वापरले जातात. केंद्रीय केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्र्यांनी ट्विटवरुन शेअर केलेल्या नोटीफिकेशननुसार पीपीई सूटची निर्यात केली जाणार असली तरी गॉगल्स, फेस शिल्ड, मास्क, ग्लोव्हज, हॅण्ड कव्हर, शू कव्हर यासारख्या गोष्टींच्या निर्यातीला परवानगी देण्यात आलेली नाही.

मोफत धान्य नोव्हेंबरपर्यंत :
  • देशातील ८० कोटी गरिबांना आणखी पाच महिने म्हणजे नोव्हेंबपर्यंत मोफत धान्य पुरवले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. टाळेबंदी शिथिलीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मंगळवारी देशाला उद्देशून भाषण केले. करोनाचे संकट टळलेले नसल्याने कोणीही बेफिकीर राहू नये, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

  • सणासुदीचा काळ सुरू होत असून, जनतेच्या गरजा वाढतील आणि खर्चही वाढेल. ही बाब लक्षात घेऊन तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेली मोफत धान्य योजना दिवाळीपर्यंत म्हणजे नोव्हेंबरअखेपर्यंत कायम राहील. गरिबांना आणखी पाच महिने या योजनेचा लाभ घेता येईल, असे मोदी म्हणाले. मोफत धान्य योजनेअंतर्गत रेशन दुकानांवर दरमहा प्रत्येक व्यक्तीला ५ किलो गहू किंवा तांदूळ तसेच, प्रत्येक कुटुंबाला १ किलो डाळ मोफत मिळेल. त्यासाठी ९० हजार कोटी खर्च होतील. पंतप्रधान गरीब कल्याण धान्य योजना तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. त्याचा खर्च एकत्र केला तर एकूण १.५ लाख कोटी खर्च होतील, अशी माहिती मोदी यांनी दिली.

  • टाळेबंदीच्या काळात केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत १.७५ लाख कोटींची मदत दिली. गेल्या तीन महिन्यांत ३० कोटी लोकांच्या जनधन खात्यात ३१ हजार कोटी जमा झाले. ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १८ हजार कोटी जमा झाले. गावांमध्ये श्रमिकांना रोजगारासाठी केंद्र सरकार ५० हजार कोटी खर्च करत आहे. ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ही योजना पूर्णत्वास नेण्यात येत असून त्याचा बाहेरच्या राज्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना लाभ होणार आहे. गरिबांना सरकार मोफत अन्न देऊ  शकले, याचे श्रेय शेतकरी आणि इमानदार करदात्यांना जाते, असे मोदी म्हणाले.

भारत-चीन यांच्यात लष्करी पातळीवर पुन्हा चर्चा :
  • भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील संघर्षांमुळे निर्माण झालेल्या तिढय़ाबाबत मंगळवारी लेफ्टनंट जनरल पातळीवरील चर्चेची तिसरी फेरी पार पडली. त्यात पूर्व लडाखमधून सैन्य माघारीचे सोपस्कार व इतर बाबींचा समावेश होता.

  • यावेळी प्रथमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारताच्या बाजूकडील चुशूल क्षेत्रात चर्चा झाली. आधीच्या चर्चेच्या फेऱ्या चीनच्या बाजूकडील मोल्दो येथे झाल्या होत्या. आधीच्या दोन चर्चात गलवान, पँगॉग त्सो व इतर अनेक भागात चीनच्या सैन्याने माघार घेणे व पूर्वी होती तशी परिस्थिती निर्माण करणे या मुद्दय़ांवर भर देण्यात आला होता. भारत व चीन यांच्या लष्करात पूर्व लडाखमध्ये गेले सात आठवडे संघर्ष सुरू असून त्यातूनच १५ जूनला गलवान खोऱ्यात चीनच्या हिंसाचारात २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. चीनच्या बाजूनेही प्राणहानी झाली असून त्याचा तपशील त्यांनी दिलेला नाही.

  • २२ जून रोजी दोन्ही बाजूंनी पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याबाबत मतैक्य दर्शवले होते. भारतीय पथकाचे नेतृत्व आज १४ व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले, तर चीनच्या बाजूचे नेतृत्व तिबेट लष्करी जिल्ह्य़ाचे मेजर जनरल लिउ लिन यांनी केले.

०१ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.