चालू घडामोडी आणि दिनविशेष - 01 जानेवारी 2024

Date : 1 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अरविंद पानगढिया १६व्या वित्त आयोगाच्या प्रमुखपदी
  • केंद्र सरकारने निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरविंद पानगढिया यांची १६व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अर्थ मंत्रालयाचे सहसचिव ऋत्विक रंजनम पांडय़े हे आयोगाच्या सचिवपदी असतील. अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून या नियुक्तींची घोषणा केली आहे.
  • वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य हे कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केल्याच्या दिवसापासून ३१ ऑक्टोबर २०२५ किंवा वित्त आयोगाचा अहवाल सादर करण्याची तारीख यापैकी जे आधी असेल ते, या कालावधीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या अहवालाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने १६व्या वित्त आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी दिली होती.

आयोगाच्या जबाबदाऱ्या

  • ’करमहसुलाची केंद्र आणि राज्यांदरम्यान विभागणी
  • ’त्यातून राज्यांना मिळणारा निधीचा वाटा
  • ’भारताच्या एकत्रित निधीतून राज्यांना दिली जाणारी अनुदानरूपी मदत
  • ’राज्यांच्या एकत्रित निधीतून पंचायती आणि नगरपालिकांना द्यावयाचा निधी
  • ’सध्याच्या आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांना वित्तपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा आढावा
‘एक्सपोसॅट’ उपग्रहाचे आज प्रक्षेपण; कृष्णविवर अभ्यास मोहिमेने ‘इस्रो’ची नववर्षांची नांदी!
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सोमवारी नवीन वर्षांचे स्वागत पहिल्या ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’च्या (एक्सपोसॅट) प्रक्षेपणाने करणार आहे. त्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन ‘डी १ मिशन’च्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असेल. ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे. त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल.
  • ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) -‘सी ५८’ आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत सोडले जातील. चेन्नईपासून पूर्व भागात सुमारे १३५ किलोमीटरवर असलेल्या अवकाश केंद्रातून नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी होत असलेल्या प्रक्षेपणासाठी २५ तासांची उलटगणती सुरू झाली आहे. 
  • ‘इस्रो’च्या मते, अवकाश आधारित ध्रुवीकरण मापनांद्वारे खगोलीय स्त्रोतांकडून क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा ‘इस्रो’चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे. ‘इस्रो’व्यतिरिक्त, अमेरिकन संस्था ‘नासा’ने डिसेंबर २०२१ मध्ये ‘सुपरनोव्हा’ स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून उत्सर्जित होणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता.

मोहिमेची वैशिष्टय़े

  • ’ कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न
  • ’ उपग्रह प्रक्षेपक प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार
  • ’ खगोलीय स्त्रोतांकडून होणाऱ्या क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा ‘इस्रो’चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह
  • श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह (एक्स-पीओसॅट) वाहून नेणाऱ्या पीएसएलव्ही-सी५८ या प्रक्षेपकाच्या उड्डाणाची तयारी सुरू आहे.
ISRO ची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाला अनोखी भेट, दुसरी अवकाश दुर्बिणी XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण
  • २०२४ वर्षाची दमदार सुरुवात इस्रोने केली आहे. २०२३ ला अलविदा करत २०२४ चे स्वागत करतांना पहिल्याच दिवशी म्हणजेच सूर्य माथ्यावर येण्यापूर्वीच इस्रोने XPoSat नावाची अवकाश दुर्बिण नऊ वाजून ३० मिनिटांनी प्रक्षेपित केली. पृथ्वीपासून सुमारे ६५० किलोमीटर उंचीवर XPoSat ही ४६९ किलोग्रॅम वजनाची दुर्बिण यशस्वीपणे प्रक्षेपित केली.
  • या XPoSat वर Polarimeter Instrument in X-rays (POLIX) आणि X-ray Spectroscopy and Timing (XSPECT) अशी दोन वैज्ञानिक उपकरणे आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून अवकाशातील एक्स रे – X-rays म्हणजेच क्ष किरणांच्या उगमांच्या स्त्रोतांचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे कृष्ण विवर – black hole तसंच न्यूट्रॉन तारे (neutron star) यांचा सखोल निरिक्षणे केली जाणार आहेत, याबद्दलची नवी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यानिमित्ताने भारतासह जगभरातील अवकाश संशोधनाला मोठी माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
  • यानंतर संवाद साधतांना देशाला नववर्षाच्या शुभेच्छा देतांना २०२४ हे वर्ष इस्रोसाठी अनेक मोहिमांसाठी असेल असं अध्यक्ष एस सोमनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. २०२५ मध्ये इस्रो भारतीय अंतराळवीर गगनयान (Gaganyaan) मोहिमेद्वारे अवकाशात पाठवणार आहे, या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग असलेल्या गगनयान एक आणि दोन अशा मानवविरहित मोहिमा याचवर्षी होणार असल्याची माहिती सोमनाथ यांनी यावेळी दिली. तसंच विविध उपग्रहांचे, वैज्ञानिक उपकरणांचे प्रक्षेपणही यावर्षी केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
नव्या वर्षांत सरकारी महोत्सवांची रेलचेल; प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक, युवा महोत्सव, महानाटय़
  • सोमवारपासून सुरू होणारे २०२४ हे नवे वर्ष निवडणुकीचे असल्याने राज्य शासनाने पहिल्या सहा महिन्यांतच विविध विभागांच्या माध्यमांतून अनेक महोत्सवांचे आयोजन केले असून त्यासाठी घसघशीत आर्थिक तरतूदही केली आहे.
  • २०२३ पासूनच अनेक सरकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या कामाची प्रसिद्धी व प्रचार सुरू आहे. कधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध गावांमधील माती गोळा करणे असो किंवा विकास यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या योजनांची माहिती देणे असो. महाराष्ट्र सरकारही यात मागे नाही, ‘सरकार आपल्या दारी’च्या माध्यमातून राज्यभर अनेक कार्यक्रम राज्याच्या विविध भागात झाले आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या २०२४ ची सुरुवातही विविध महोत्सवांच्या माध्यमातून होत आहे. सांस्कृतिक विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४  दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात सलग पाच दिवस महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध राज्यातील संस्कृतीचे आदानप्रदान, लुप्त होत चाललेल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन आणि स्वातंत्र्यलढय़ाची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे यासाठी हा कार्यक्रम असल्याचे या खात्याच्या २२ डिसेंबरला काढलेल्या शासन निर्णयात नमूद आहे.

कार्यक्रम काय?

  • ’ राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा खात्यातर्फे १५ जानेवारीपासून प्रत्येक जिल्ह्यात युवा महोत्सव होणार आहे. युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून हा उपक्रम असल्याचा दावा शिक्षण विभागाने २२ डिसेंबरला काढलेल्या शासन निर्णयात केला आहे.
  • ’ पर्यटन व सांस्कृतिक खात्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या३५० व्या राज्याभिषेक वर्षांनिमित्त जून २०२३ पासून विविध कार्यक्रम राज्यभर घेतले जात आहेत. याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून आता जानेवारी ते जून २०२४ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाटय़ महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून महानाटय़ाची प्रसिद्धी आणि आयोजनाच्या खर्चासाठी प्रत्येक जिल्ह्यांना निधी देण्यात येणार आहे.
भीमा कोरेगाव विजयस्तंभाला आंबेडकरी अनुयायांचे अभिवादन; अलोट गर्दी
  • नववर्षाचा पहिला दिवस आणि शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला लाखो आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी अभिवादन केले. विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पंचक्रोशीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणांहून अनुयायी आले आहेत. युवकांनी पुण्यापासून दुचाकी फेरी काढून भीमा कोरेगाव गाठले. प्रवासातील गावांमध्ये नागरिकांनी अभिवादनास येणाऱ्या अनुयायांना न्याहरी तसेच चहा देऊन पुढील मार्गक्रमण करण्यासाठी ताजेतवाने केले.
  • विजयस्तंभ परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून आतषबाजी तसेच सामुदायिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजयस्तंभास अभिवादन केले. समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
  • रविवारी रात्रीनंतर नगर रस्त्यावर वाहनबंदी करण्यात आली होती. अनुयायांसाठी २९ ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले असून २० फिरते बाईक आरोग्य पथके, ५० रुग्णवाहिका, ९० तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच जवळच्या खासगी रुग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह शंभर खाटाही आरक्षित करण्यात आल्या आहेत.

 

“नववर्षाचा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांना, २० हजार कोटी रुपये…”, पंतप्रधान मोदींची घोषणा : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ मावळत असताना नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी नव्या वर्षातील पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला समर्पित करणार असल्याचं सांगितलं. यानुसार १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

  • नरेंद्र मोदी म्हणाले, “नववर्ष २०२२ चा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांना समर्पित असेन. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसान योजनेचा १० वा हप्ता जारी करण्याची संधी मिळणार आहे. या अंतर्गत २० हजार कोटी रुपयांचा १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना फायदा होईल.”

  • पीएम किसान योजनेच्या अर्जाचं स्टेटस कसं तपासणार - तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज केलाय आणि तरीही तुम्हाला त्या योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर आणि वेबसाईट दोन्हींच्या माध्यमातून मदत घेऊ शकता. वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजेच स्टेटस जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in ला भेट द्या. या ठिकाणी होमपेजवर उजव्या कोपऱ्यात फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) आहे. तेथे तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक माहिती टाकून तुम्हाला या योजनेचे किती हप्ते मिळाले याचे तपशील मिळतील. फार्मर्स कॉर्नर येथे त्रुटी असलेली माहिती दुरुस्त करण्याचाही पर्याय असतो. याचा उपयोग करुन तुम्ही तुमचा आधार क्रमांक किंवा इतर काही तपशील अपडेट करु शकता.

  • हेल्पालाईनद्वारे माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला १५५२६१ किंवा टोल फ्री १८००११५५२६ वर कॉल करता येईल. याशिवाय ०११-२३३८१०५२ वर कॉल करुनही माहिती मिळेल. [email protected] या ईमेल आयडीवरही तक्रार करता येईल.

स्मृतीला सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठीही नामांकन ; ‘आयसीसी’ वार्षिक पुरस्कार :
  • भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मानधनाला २०२१मधील तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील दिमाखदार कामगिरीसाठी ‘आयसीसी’च्या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठीही नामांकन लाभले आहे. इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट, दक्षिण आफ्रिकेची लिझेले ली आणि आर्यलडची गॅबी लेविस या तीन क्रिकेटपटू स्पर्धेत आहेत.

  • गुरुवारी स्मृतीला वर्षांतील सर्वोत्तम महिला ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूचे नामांकन देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) २०२१ या वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचे पुरस्कार २३ जानेवारीला घोषित करण्यात येणार आहेत. २५ वर्षीय सलामीवीर स्मृतीने वर्षांतील २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३८.८६च्या सरासरीने एकूण ८५५ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

  • दुबई - ‘आयसीसी’च्या वर्षांतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी इंग्लंडचा कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन, पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांना शुक्रवारी नामांकन देण्यात आले आहे. २०२१ या वर्षांतील कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांमधील कामगिरीसाठी क्रिकेटपटूला २४ जानेवारीला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. रूटने २०२१मध्ये ५८.३७च्या सरासरीने सहा शतकांसह १८ आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकूण १८५५ धावा केल्या आहेत. विल्यम्सनने १६ सामन्यांत ४३.३१च्या सरासरीने एकूण ६९३ धावा काढल्या असून, यात एका शतकाचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने जागतिक कसोटी विजेतेपद आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावले. रिझवानने ९ सामन्यांत ४५.५०च्या सरासरीने ४५५ धावा केल्या आहेत. तर आफ्रिदीने ३६ सामन्यांत ७८ बळी घेतले आहेत.

जगात सर्वात जास्त शस्त्रास्त्रे आयात करणारा भारत आता निर्यातही करणार, ‘ब्रह्मोस’ फिलिपिन्सला देण्याबाबत लवकरच करार होणार :
  • जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची आणखी एक ओळख म्हणजे शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वसंरक्षणासाठी भारताने सुरुवातीपासून बहुतांश शस्त्रास्त्रे ही आयात करण्यावर भर दिला आहे.

  • लढाऊ विमाने, मालवाहु विमाने, हेलिकॉप्टर, तोफा, रणगाडे, युद्धनौका अशी प्रमुख शस्त्रास्त्रे आपण मोठ्या प्रमाणावर आयात केली. विशेषतः शीत युद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आयात करण्यावर भारताने भर दिला. मात्र गेल्या काही वर्षात आपण संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत हळुहळु स्वावलंबी होत असून काही प्रमाणात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर स्वबळावर बनवत आहोत. आता तर क्षेपणास्त्रे, युद्धनौका बनवण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आहोत.

  • यामधील ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आता लवकरच निर्यात करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबत फिलिपिन्स देशाशी चर्चा अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी, कधीही या कराराबाबत घोषणा होऊ शकते.

  • फिलिपिन्स देशाशी गेल्या काही वर्षात मैत्रीचे संबंध प्रस्तापित झाले असून व्यापार क्षेत्रात सहकार्याची भूमिका आधीपासून घेतली जात आहे, आता त्यात संरक्षण क्षेत्राची भर पडली आहे. विशेषतः चीनच्या दक्षिण समुद्रात चीनचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता फिलिपिन्सने भारताशी संरक्षण क्षेत्राबाबत संबंधआणखी बळकट करण्यावर भर दिला आहे. याआधीच भारताच्या युद्धनौका फिलिपिन्स देशाला नियमित भेट देत असून यानिमित्ताने भारत चीनला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्यास चीनला शह देण्याची एक मोठी संधी फिलिपिन्सला मिळणार आहे.

कोव्हिशिल्ड लशीला सरसकट परवानगीची ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ची मागणी :
  • कोव्हिशिल्ड या करोना प्रतिबंधक लशीने आतापर्यंत १२५ कोटींच्या मात्रांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लशीला संपूर्ण बाजार मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे (एसआयआय) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केली.

  • संपूर्ण बाजार मंजुरीसाठी पूनावाला यांनी भारताचो औषध नियामक मंडळ आणि आरोग्य मंत्रालयाकडे अर्ज केला आहे.

  • युरोपमधील अ‍ॅस्ट्राझेनका या कंपनीने निर्मिती केलेल्या लशीचे ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ भारतीय उत्पादक असून भारतात या लशीचा कोव्हिशिल्ड या नावाने पुरवठा करण्यात आला. जानेवारीमध्ये देशाची लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचा सर्वाधिक प्रमाणात देण्यात आल्या.

  • ‘‘कोव्हिशिल्ड लशीच्या १२५ कोटी मात्रांचा आतापर्यंत पुरवठा करण्यात आला आहे. संपूर्ण बाजार मंजुरी देण्यासाठी कोव्हिशिल्ड लशीच्या पुरवठय़ाची पुरेशी आकडेवारी आहे. त्यामुळे संपूर्ण बाजार मंजुरीची परवानगी देण्यासाठी भारतीय औषध नियामक मंडळ आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे अर्ज केला आहे, असे पूनावाला यांनी शुक्रवारी ट्विट करून सांगितले.

रोनाल्डोमुळे मँचेस्टर युनायटेड विजयी :
  • आघाडीपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात बर्नले संघावर ३-१ असा विजय मिळवला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या युनायटेडने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. आठव्या मिनिटाला स्कॉट मॅक्टोमिनेने गोल करत युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

  • २७व्या मिनिटाला जेडन सँचोने मारलेला फटका बर्नलेचा कर्णधार बेन मीला लागून गोल जाळय़ात गेल्याने युनायटेडची आघाडी दुप्पट झाली. मग ३५व्या मिनिटाला मॅक्टोमिनेचा फटका बर्नलेचा गोलरक्षक वेन हेनसीने अडवला. मात्र, चेंडू थेट रोनाल्डोकडे गेला आणि त्याने कोणतीही चूक न करता गोल मारला.

  • ३८व्या मिनिटाला बर्नलेच्या आरोन लेननने गोल करत युनायटेडची आघाडी १-३ अशी कमी केली. परंतु उत्तरार्धात त्यांना एकही गोल न करता आल्याने युनायटेडने विजयाची नोंद केली. हा त्यांचा १८ सामन्यांत नववा विजय ठरला.

भारत आठव्यांदा आशिया चषक विजेता ; श्रीलंकेचा ९ गडी राखून केला पराभव :
  • भारताचा अंडर-19 संघ आशिया कप चॅम्पियन बनला आहे. दुबईत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने DLS पद्धतीनुसार श्रीलंकेचा ९ गडी राखून पराभव केला. यासह ज्युनियर इंडियन टीम इंडियाने विक्रमी आठव्यांदा अंडर-19 आशिया कपवर जिंकला आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर भारतीय संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला.

  • अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात पावसामुळे व्यत्यय आला आणि सामना ५० षटकांवरून ३८ षटकांचा करण्यात आला. पाऊस येईपर्यंत श्रीलंकेच्या डावातील ३२ षटके पूर्ण झाली होती आणि विश्रांतीनंतर त्यांना फक्त ६ षटके खेळायला मिळाली. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यांना निर्धारित ३८ षटकांत ९ गडी गमावून केवळ १०६ धावा करता आल्या. ३२ व्या षटकापर्यंत श्रीलंकेने ७ विकेट गमावल्या होत्या.

  • भारतीय संघाकडून फिरकीपटू विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे यांनी एकूण ५ बळी घेतले. डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाला ३८ षटकांत १०२ धावांचे लक्ष्य मिळाले. हरनूर सिंग अवघ्या ५ धावा करून डावखुरा वेगवान गोलंदाज येसिरु रॉड्रिगोचा बळी ठरला. यानंतर सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी (५६) आणि शेख रशीद (३१) यांनी ९६ धावांची नाबाद भागीदारी करत भारताला आठव्यांदा आशिया चषक जिंकून दिला.

०१ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.