अर्थसंकल्प लोकांचा अपेक्षा
देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यास काही तासच उरले असून, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी भाष्य केलं आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रावर मोदी सरकार काम करत असून, भारताला नवी दिशा देण्याचं काम करत आहे. मला विश्वास आहे की, हा अर्थसंकल्प लोकांच्या इच्छापूर्ती करणारा असेल,” असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अनुराग ठाकूर यांनी देवपूजा केली. त्यानंतर एएनआय अर्थसंकल्पाबद्दल संवाद साधला. ठाकूर म्हणाले,”मोदी सरकारमधील अर्थमंत्र्यांचा हा अर्थसंकल्प जनतेच्या अपेक्षांप्रमाणेच असेल. मोदी सरकार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, या मूलमंत्राने काम करत आहे.
करोना महामारीच्या काळातही मोदी सरकारनं आत्मनिर्भर भारत पॅकेज देऊन भारताला नवी दिशा दिली. महामारीतून वाचवलं. भारतीय अर्थव्यवस्थेला वेगानं पुन्हा रुळावर आणलं आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, या अर्थसंकल्पातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारत पुढे जावा, यासाठी आमचे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत,” असं ठाकूर म्हणाले.
करोना टाळेबंदीचे निर्बंध हळूहळू शिथिल केल्याने अर्थचक्र गतिमान होत असल्याचे संकेत आहेत. जानेवारी महिन्यात वस्तू व सेवा करातून विक्रमी १.२० लाख कोटींचा महसूल मिळाला. जानेवारीतील हे ‘जीएसटी’ संकलन गेल्या वर्षीच्या (२०२०) जानेवारीच्या महसूलापेक्षा आठ टक्क्यांनी अधिक आहे.
जुलै २०१७ मध्ये ‘जीएसटी’ लागू झाल्यापासूनचे हे सर्वाधिक करसंकलन असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. सलग चौथ्या महिन्यात ‘जीएसटी’ संकलन एक लाख कोटींहून अधिक झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये ‘जीसटी’ संकलन १,१५,१७४ कोटी इतके होते.
इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १४वे पर्व ११ एप्रिलपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि ‘आयपीएल’ प्रशासकीय समिती यांच्यात या मोसमातील ‘आयपीएल’च्या वेळापत्रकाविषयी एकमत झाले आहे. त्यानुसार, ‘आयपीएल’ला ११ एप्रिलपासून सुरुवात होईल आणि अंतिम सामना ५ किंवा ६ जून रोजी खेळवण्यात येईल, असे ‘बीसीसीआय’मधील सूत्रांनी सांगितले.
‘‘याविषयीचा अंतिम निर्णय ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. मात्र पर्यायी तारीख म्हणून ११ एप्रिलची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाची इंग्लंडविरुद्धची मालिका मार्च महिन्यात संपुष्टात येणार असून तोपर्यंत खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळू शकेल,’’ असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका २८ मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर पुरेशी विश्रांती घेऊन सर्व खेळाडू आपापल्या संघात दाखल होतील. ‘‘यंदाची आयपीएल भारतातच खेळवण्यात येणार आहे. भारतातील करोनाबाबतची परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ला पुढील आयपीएलसाठी परदेशातील ठिकाणाची व्यवस्था करावी लागणार नाही,’’ असे ‘बीसीसीआय’चे खजिनदार अरुण धुमाळ यांनी शनिवारी स्पष्ट केले होते.
भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) देशातील सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कवली आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज ४५ जार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे,
तब्बल ८७ वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. मात्र महिलांच्या क्रिकेट हंगामाला मार्चमध्ये प्रारंभ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. करोनाच्या साथीमुळे देशांतर्गत क्रिकेट हंगाम यंदा दिरंगाईने सुरू झाला आहे. सहा जैव-सुरक्षित केंद्रांवर सध्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. रणजी करंडक स्पर्धेबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु याबाबत योग्य तोडगा निघू शकला नाही. ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा रणजी स्पर्धेसाठी आग्रही होता. पण अखेर रणजी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात. देशातील सहा मुख्य शहरांमध्ये मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक पुढच्या आठवड्यात अंतिम करण्यात येईल.
शेजारील देश म्यांमारमध्ये सत्तांतर झाले आहे. म्यांमारच्या सैन्याने वास्तविक नेत्या आंग सान सू की आणि राष्ट्रपती विन म्यिंट यांना ताब्यात घेतले आहे. तसेच देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.
म्यानमार सैन्य टेलीव्हिजनने म्हटल्याप्रमाणे, सेन्याने एका वर्षासाठी देशाची सत्ता हाती घेतली आहे. त्यामुळे आता सैन्याचे कमांडर-इन-चीफ मिन आंग ह्लाइंग यांच्याकडे सत्तेची धुरा असणार आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.