MahaNMK V2.0 - विषयी अधिक माहिती

Updated On : Oct 02, 2017 | Category :


मित्रांनो, सर्वप्रथम आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज आपले MahaNMK ऍप महाराष्ट्रामधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक ऍप बनू शकले आहे. आम्ही आपल्या MahaNMK ऍप ला दिवसेंदिवस चांगले आणि आपल्या वापरासाठी सोपे बनवण्याच्या प्रयत्नात आहोत.

आपल्या MahaNMK ऍप्लिकेशन च्या या नवीन अपडेट मध्ये खूप साऱ्या नवीन आणि महत्वपूर्ण गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. याचीच माहिती आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून देणार आहोत.

१) या नवीन अपडेट मध्ये आपण जाहिराती, प्रवेशपत्र आणि निकाल यांच्याबरोबरच चालू घडामोडी, प्रेरणादायी आणि महत्वाची माहिती असणारे व्हिडीओ तसेच महाराष्ट्र सरकारची धोरणे या सर्व गोष्टींची माहिती मिळवू शकता.

२) आता आपण आपल्या व्यवसायानुसार जाहिराती शोधू शकता.

३) तसेच आपण महत्वाच्या शॉर्टकट लिंक वापरूनही अगदी सोप्या पद्धतीने जाहिराती शोधू शकता.

४) आपल्याला महत्वपूर्ण वाटणाऱ्या जाहिराती / सर्च आपण जतन करून त्या वेगळ्या करू शकता.

५) आपण आपल्या ठिकाणानुसार सुद्धा जाहिराती सर्च करू शकता, आपल्याला फक्त ठिकाण सिलेक्ट करावे लागेल आणि आम्ही आपल्याला त्या ठिकाणावर जाहिराती, निकाल तसेच उपलब्ध प्रवेशपत्र यांची संपूर्ण माहिती पुरवू.

६) आपण आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार देखील जाहिराती अगदी सोप्या पद्धतीने शोधू शकता.

७) तसेच आपल्याला सर्च या बटणाचा वापर करून आपल्याला हवे तसे keyword वापरून देखील जाहिराती, निकाल तसेच प्रवेशपत्र मिळवू शकता.

या संपूर्ण नवीन फीचर्स च्या माहितीसाठी आम्ही एक नवीन व्हिडीओ बनवत आहोत लवकरच तो व्हिडीओ आपल्याला आपल्या व्हिडीओ कॅटेगरी मध्ये पाहता येईल. आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला होम स्क्रीन वरून संपर्क साधायला विसरू नका, धन्यवाद.

टिप्पणी करा (Comment Below)