भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरातीने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत एक फेरीआधीच बाएल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे.
अनोख्या पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आठ स्पर्धकांना क्लासिकल पद्धतीच्या सात फेऱ्या, जलद बुद्धिबळाच्या सात फेऱ्या आणि ब्लिट्झ पद्धतीच्या १४ फेऱ्या खेळावयाच्या होत्या. क्लासिकल फेरी जिंकणाऱ्याला तीन गुण, जलद प्रकारात दोन आणि ब्लिट्झसाठी एक गुण असे एकूण ४९ गुण मिळवण्याची संधी होती. विदितने क्लासिकल प्रकाराची एक फेरी शिल्लक राखून ३१ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. दुसऱ्या क्रमांकावरील अमेरिकेच्या सॅम्युएल शांखलँडपेक्षा तो चार गुणांनी आघाडीवर आहे.
विदितने ब्लिट्झ प्रकारात १४ पैकी ११ गुणांची कमाई करत अप्रतिम सुरुवात केली होती. त्यानंतर जलद प्रकारात त्याने ८ गुण पटकावले होते.
त्यानंतर क्लासिकल प्रकारात जॉर्ज कोरी, पीटर लेको आणि सेबॅस्टियन बोंगेर यांच्यावर विजय मिळवत शांखलँड, निको जॉर्जियाडिस आणि नोडिरबेक अब्दुसात्तोरोव्ह यांच्याविरुद्धच्या लढती बरोबरीत सोडवल्या होत्या. आता अंतिम फेरीत विदितचा सामना जागतिक विजेत्या परहाम माघसोडलो याच्याशी होईल.
कोणत्याही स्पर्धेतील विजेतेपद हे माझ्यासाठी खास असते. कडव्या प्रतिस्पध्र्याचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याचा आनंद होत आहे. क्लासिकल प्रकारात मी अपराजित राहिलो. माझ्या शैलीनुसार मी खेळात अनेक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यांपासून मी खेळात अधिक धोका पत्करत आहे. या रणनीतीचे मला फळ मिळाले.
नासाच्या ग्रहशोधन उपग्रहाने तीन नवीन बाह्य़ग्रहांचा शोध लावला असून ते ग्रह पृथ्वीपासून ७३ प्रकाशवर्षे दूर आहेत, असे वैज्ञानिकांनी सांगितले.
याबाबतचा शोधनिबंध हा ‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून यात तीन नवीन बाह्य़ग्रहांपैकी एक हा खडकाळ व पृथ्वीपेक्षा काहीसा मोठा आहे, तर इतर दोन ग्रहांवर वायू जास्त असून ते पृथ्वीपेक्षा दुप्पट आकाराचे आहेत. ‘टेस ऑब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट’ म्हणजे ‘टीओआय २७०’ या तारका प्रणाली भोवती हे ग्रह फिरत असून ‘ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सव्र्हे सॅटेलाइट’ या उपग्रहाने ज्या प्रकारचे ग्रह शोधणे अपेक्षित होते त्याच प्रकारचे ते ग्रह आहेत, असे रिव्हरसाइड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.
यातील लहान ग्रह हा मातृ ताऱ्यापासून अशा अंतरावर आहे की, तेथे पाणी द्रवरूपात असू शकेल. टीओआय २७० हा मातृतारा शांत आहे. त्यावर कुठल्या ज्वाळा नाहीत त्यामुळे तो व त्याभोवती फिरणारे ग्रह यांचे निरीक्षण करणे सोपे आहे. यात काही ग्रह हे ताऱ्यापासून वसाहतयोग्य अंतरावर आहेत. म्हणजे ते इतक्या अंतरावर आहेत ज्यामुळे तेथे पाणी असू शकते.
आपल्या सौर मालेत पृथ्वी, मंगळ, शुक्र व बुध असे लहान ग्रह आहेत. ते खडकाळ आहेत तर शनी, गुरू, युरेनस, नेपच्यून हे ग्रह वायूने भरलेले आहेत. नेपच्यूनच्या निम्म्या आकाराचे ग्रह आपल्या ग्रहमालेत फारसे नाहीत पण ते इतर ताऱ्यांभोवती आहेत. टीओआय २७० हा ग्रहमालेच्या अभ्यासातून पृथ्वीसारखे खडकाळ ग्रह व नेपच्यूनसारखे वायूचे ग्रह यांच्यातील दुवा सांधता येणे शक्य आहे, असे एमआयटीचे संशोधक मॅक्सिमिलीयन गुंथर यांनी म्हटले आहे. याची पाठपुरावा निरीक्षणे २०२१ मध्ये जेम्स वेब अवकाश दुर्बीणीच्या मदतीने घेतली जाणार आहेत.
टीओआय २७० ग्रहांवर पाण्याचे सागर होते की नाही ते तपासले जाईल. ही ग्रहमाला खूप लांब म्हणजे ७३ प्रकाशवर्षे दूर आहे. आपल्या आकाशगंगेचा व्यास हा एक लाख प्रकाशवर्षे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अखेर राज्यसभेत तिहेरी तलाकबंदी विधेयक ९९ विरुद्ध ८४ मतांनी मंगळवारी संमत करून ऐतिहासिक विजय मिळवला!
हे विधेयक गेल्या आठवडय़ात लोकसभेत मंजूर झाले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या कायद्यावर शिक्कामोर्तब होईल. हा कायदा मोडणाऱ्या पतीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
मोदी सरकारसाठी तिहेरी तलाकबंदी विधेयक प्रतिष्ठेचे मानले जात होते. गेल्या लोकसभेत हे विधेयक दोनदा संमत केले गेले मात्र, राज्यसभेत त्याला मंजुरी मिळाली नव्हती. वरिष्ठ सभागृहात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमत नसल्याने केंद्र सरकारला अपयश आले होते. यावेळी मात्र बहुमत नसतानाही मोदी सरकारला तिहेरी तलाकबंदी विधेयक संमत करण्यात यश आले. या विधेयकाच्या निमित्ताने विरोधी पक्षांनी वरिष्ठ सभागृहातील बहुमत गमावल्याचे पुन्हा सिद्ध झाले. हे विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार इलमारम करीम यांच्यासह विरोधी पक्षांनी मांडला होता, तो १०० विरुद्ध ८४ मतांनी फेटाळला गेला.
सध्या राज्यसभेत २३८ सदस्य असून बहुमतासाठी १२० मतांची गरज होती. त्यापैकी सत्ताधारी भाजपकडे बिजू जनता दलाच्या सात सदस्यांसह १०३ चे संख्याबळ होते. तर, विरोधी पक्षांकडे १०८ चे संख्याबळ होते. मात्र, प्रत्यक्षात १८४ सदस्यच मतदानात सहभागी झाले. सत्ताधारी एनडीएला चार मते कमी मिळाली. तर, विरोधी पक्षांना त्यांच्याकडील संख्याबळाच्या तुलनेत २४ मते कमी मिळाली.
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी पक्षाचा तसेच, राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असून ते बुधवारी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करतील. त्यामुळे काँग्रेसची संख्या एकने कमी झाली. संयुक्त जनता दलाच्या सहा आणि अण्णा द्रमुकच्या १२ सदस्यांनी सभात्याग केला. तेलंगण राष्ट्रीय समितीच्या सहा सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे सभागृहात उपस्थित नव्हते.
१९८६मध्ये शहाबानो प्रकरणापासून २०१९च्या सायराबानू प्रकरणापर्यंत काँग्रेसने मुस्लीम महिलांबाबतीतील भूमिका बदलली नाही. काँग्रेसने शहाबानोला न्याय दिला नाही. त्यानंतर लोकसभेच्या नऊ निवडणुका झाल्या, पण एकदाही काँग्रेसला बहुमत मिळाले नाही. आता तर काँग्रेस पक्ष ५२ जागांवर आला आहे. काळानुसार बदलायची काँग्रेसची इच्छा नाही, असा प्रतिवाद केंद्रीय विधिमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी चर्चेला उत्तर देताना केला.
कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते.
गेल्या ३६ तासांपासून कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता होते. बंगळुरुहून साकलेशपूरला जात असताना ते नेत्रावती नदीच्या पुलावर उतरले. त्यानंतर त्यांनी कार घेऊन ड्रायव्हरला पुढे जाऊन थांब असे सांगितले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. त्यांचं झालं काय हा प्रश्न कायम होता. अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला आहे. सोमवार संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले होते.
महत्वाच्या घटना
१४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.
१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
१६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला.
१८५६: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.
१९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.
१९९२: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९२: सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
२०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.
२००१: दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.
जन्म
१८७२: संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)
१८८०: हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९३६)
१९०७: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १९६६)
१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)
१९१८: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल २०००)
१९१९: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)
१९४१: गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)
१९४७: हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.
१९५४: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २०१३)
मृत्यू
१७५०: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १६८९)
१८०५: भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १७६५)
१८६५: आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
१८७५: अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८०८)
१९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)
१९६८: चित्रकार, संस्कृत पंडित पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
१९८०: पार्श्वगायक मोहंमद रफी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब)
२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २३ जून १९४८)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.