‘मन की बात’ च्या ३७ व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. छठ पर्व हा शुद्धीचा पर्व असल्याचे ते म्हणाले. आज त्यांनी ‘खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ हा नवा नारा दिला.
जवानांबरोबर दिवाळी साजरी करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगत जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्यांचा अनुभव सर्वांनी जरूर जाणून घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.
आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की, आपले जवान फक्त सीमेवरच नव्हे तर जगात शांतता प्रस्थापित करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहेत. आपले जवान दुर्गम भागात जातात. यात अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. (source: lokmat)
पुणे : ‘सिनेमाची तिकिटे, क्रिकेट सामना, हॉॅटेल यांसाठी रांगेत उभे राहायला आपली हरकत नसते. मात्र, राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहण्याबाबत का आक्षेप नोंदवला जातो ,’ असा सवाल करत, ‘आपण आई-वडील, शिक्षकांप्रती आदर दाखवतो, तोच देशाप्रती असायला हवा.
५२ सेकंदांत आपल्यातील माणूस आणि संस्कारांचे दर्शन घडते,’ असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते आणि एफटीआयआयचे चेअरमन अनुपम खेर यांनी व्यक्त केले.
‘मुक्तछंद’ या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाºया संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘स्व. प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ‘तीन तलाक’साठी यशस्वी लढा देणाºया शायरा बानो यांना प्रदान करण्यात आला.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे वितरण करण्यात आले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी खासदार पूनम महाजन, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. नाहीद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. (source: lokmat)
कानपूर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कानपूर वन डेत न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतक ठोकलं. त्याने 106 चेंडूंमधली 113 धावांची खेळी नऊ चौकार आणि एका षटकाराने सजवली.
विराटचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे 32 वं शतक ठरलं. त्याने वन डे सामन्यांमधल्या नऊ हजार धावांचा टप्पाही आज ओलांडला.विराटने 194 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या.
एवढ्या वेगवान 9 हजार धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सच्या नावावर हा विक्रम होता. डिव्हीलियर्सने 205 इनिंगमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
भारतीय फलंदाजांमध्ये या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुली अव्वल स्थानावर होता. गांगुलीने 228 इनिंगमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तर सचिन तेंडलुकरला 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 235 इनिंग खेळाव्या लागल्या होत्या. (source: abpmajha)
मुंबई : महापारेषण येत्या पाच वर्षांत राज्यात ८६ अतिउच्च दाबाची उपकेंद्रे उभारणार असून, १४ हजार २५३ किलोमीटरच्या वाहिन्यांचे जाळे पसरवून राज्यातील नागरिकांना पूर्ण दाबाने आणि स्वच्छ वीज उपलब्ध करून देण्यात येईल.
मुंबई येथील पारेषणच्या मुख्यालय असलेल्या प्रकाशगंगा कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. या वेळी पारेषणचे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल यांनी पुढील २०१८ ते २०२२ या पाच वर्षांचा पारेषणच्या कामाचा आराखडा ऊर्जामंत्र्यांना सादर केला.
बैठकीला सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. ३० मार्च रोजी राज्याची उच्चतम विजेची मागणी २३ हजार मेगावॅट होती, तेव्हा पारेषणने उत्तम काम केले होते.
महाराष्ट्रात महापारेषणची ४०० केव्ही व त्यावरील ३२ उपकेंद्रे आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत ही संख्या जवळजवळ दुप्पट आहे. २२० केव्हीची २१९ उपकेंद्रे आहेत.(source: lokmat)
जागतिक दिवस
आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन
महत्त्वाच्या घटना
१९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
१९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.
१९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
१९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
१९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
२०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.
जन्म दिवस
१७३५:अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)
१९०९: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी१९६६)
१९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)
१९४९: केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २००६)
१९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.
१९६०: अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा जन्म.
मृत्य दिन
१८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी१८२४)
१९९०: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)
१९९०: अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)
१९९४: केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
१९९६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर१९२६)
१९९८: लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)
२०११: उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.