नवी दिल्ली : भारतीय संसदीय गटाने (इंडियन पार्लमेंटली ग्रुप) तब्बल ५ वर्षांनी या वर्षी संसदेत भरीव कामगिरी करणाºयांचा सत्कार करण्याचे ठरविले असून, डॉ. नजमा हेपतुल्ला यांची राज्यसभेतील कार्यासाठी (सन २0१३) निवड झाली आहे. त्या आता मणिपूरच्या राज्यपाल आहे. याखेरीज भाजपाचे हुकूमदेव नारायण यादव यांची लोकसभेतील कार्यासाठी (सन २0१४) निवड झाली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांची २0१५ सालच्या कामगिरीसाठी निवड करण्यात आली असून, तृणमूल काँग्रेसचे सदस्य दिनेश त्रिवेदी (लोकसभा) यांची २0१६ सालासाठी, तर बिजू जनता दलाचे भर्तुहारी मेहताब (लोकसभा) यांची २0१७ सालासाठी निवड झाली आहे.
पुरस्कार कधीपासून - हे पुरस्कार १९९५ साली सुरू करण्यात आले होते आणि पहिला पुरस्कार माजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांना, तर त्यानंतरच्या वर्षांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी व माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आले होते.
नवी दिल्ली : सतत देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात होत राहणा-या निवडणुका आणि त्यामुळे वाढणार खर्च पाहता लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी सहमतीचे वातावरण तयार व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच अभिभाषणात व्यक्त केली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकत्रित निवडणुकांबद्दल सकारात्मकता दर्शविली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती कोविंद ट्रिपल तलाकचाही मुद्दा उपस्थित केला. ट्रिपल तलाकवरील बंदीमुळे मुस्लीम महिला व मुली यांना आत्मसन्मान आणि धार्ष्ट्य प्राप्त होईल.
ट्रिपल तलाक हे विधेयक म्हणजे महिलांसाठी प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊ लच असेल, असा दावा त्यांनी केला. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात अंतर्गत सुरक्षेवर भर देताना राष्ट्रपतींनी सुरक्षा दले ईशान्य भारतातील राज्ये व जम्मू-काश्मीरमध्ये तसेच नक्षलग्रस्त राज्यांत उत्तम काम करीत असल्याचा निर्वाळा दिला.
मोदी सरकारच्या नवभारत योजनेतील जवळपास सर्व योजनांचा उल्लेख त्यांनी केला. या योजना एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा नसून, देशातील १३0 कोटी जनतेच्या विकासाचा तो अजेंडा आहे, असेही ते म्हणाले. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया याचा फायदा देशातील तरुणांना मिळू लागला असून, सरकारने आता २४00 ‘अटल टिंकरिंग लॅब्ज’ सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तरुण व मुले यांच्या नवनवीन कल्पनांना उडण्याचे पंखच मिळतील, असे राष्ट्रपती म्हणाले.
भ्रष्टाचाराला बसला आळा उज्ज्वला योजनेमार्फत सव्वातीन कोटीहून अधिक कुटुंबांना गॅसजोडणी, बेटी बचाओ, सौभाग्य योजनेद्वारे घराघरांत वीज, गरोदर महिलांना मातृत्वाची २६ आठवडे रजा, जनधन योजनेमुळे लोकांच्या खात्यात विविध योजनांचे पैसे थेट जात असल्याने भ्रष्टाचार व गैरकारभाराला बसलेला आळा, किसान संपदा योजना, दुग्धप्रक्रिया सोयींसाठी ११ हजार कोटींचा विकास निधी या साºयांचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला.
नवी दिल्ली : पुण्यातील सर्वेश नावंदेला वायूदल विंगच्या सर्वोत्कृष्ट कॅडेटचं सुवर्णपदक मिळालं आहे. 'पंतप्रधान रॅली'त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वेशला सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं.
एसीसीच्या श्रेणी अंतर्गत सर्वेश सुभाष नावंदेला वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेट होण्याचा बहुमान मिळाला. सर्वेश 19 वर्षांचा असून पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये बी.एस.सीच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे.
प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी सहभागी होण्यासाठी त्याने पुण्यातून नाव नोंदवलं होतं. नोव्हेंबरमध्ये पुणे विभागातून त्याची निवड औरंगाबादमधील पुढील शिबीरासाठी झाली. यानंतर एनसीसी शिबीरामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये तो उत्तीर्ण होत गेला आणि पंतप्रधान रॅलीसाठी पात्र ठरला.
दिल्लीतील छावणी भागातील करीअप्पा परेड ग्राउंडवर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी पंतप्रधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कॅडेट्सना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, वायुसेना प्रमुख बिरेंद्रसिंग धनोआ, नौसेना प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा उपस्थित होते.
नागपूर: लोकमतने आयोजित केलेली महामॅरेथॉन ही नागपूरसह विभागातील धावपटूंसाठी पर्वणी आहे. अशा आयोजनांमुळे धावपटूंना बळ मिळतेच शिवाय धावण्याची चळवळ देखील रुजविण्यास मदत मिळते, असे मत माजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू विद्या देवघरे (धापोडकर) यांनी व्यक्त केले.
वेगवेगळ्या वयोगटातील, घटकांतील लोक एकत्र येणे हा चांगला संदेश आहे. महामॅरेथॉन हा चैतन्याचा सोहळा असून लोकमतचा पुढाकार हा स्वच्छ आणि स्पष्ट असल्याने अनेक लोक लोकमतशी जोडले गेले आहेत. त्यापैकीच मी एक असल्याचे विद्या यांनी सांगितले. द.पूर्व रेल्वेत कार्यरत असलेल्या विद्या मैदानावर आजही सक्रिय आहेत.
त्यांनी ४५ वर्षे वयोगटात वाशिम येथे ४००, ८०० आणि १५०० मीटर दौडमध्ये नुकतेच सुवर्ण जिंकले. मास्टर्स गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत असलेल्या लांब पल्ल्याच्या शर्यती गाजविणाऱ्या विद्या म्हणाल्या,‘आयोजन निटनेटके असून खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करण्यास पूरक आहे. अलीकडे मॅरेथॉनचे आयोजन सर्व स्तरावर वाढल्याने खेळाडू देखील उत्साहित असतात.
दौड पूर्ण केलीच पाहिजे असे नाही, सहभाग नोंदविणे आणि मॅरेथॉनचा आनंद उपभोगणे ही देखील महत्त्वाची बाब आहे. यामुळे धावण्याचे महत्त्व आणि जागरुकता वृद्धिंगत होते.’ लोकमतच्या पुढाकाराने आयोजित होत असलेल्या महामॅरेथॉनबद्दल त्या म्हणाल्या,‘प्रत्येक उपक्रमात लोकमत नंबर वन असतो, मॅहामॅरेथॉनचे आयोजनदेखील अल्पावधीत लोकप्रिय होईल.
नव्या दमाच्या धावपटूंसाठी लोकमतने उपलब्ध करून दिलेली संधी त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाजविण्यास उपयुक्त ठरेल’, अशी खात्री आहे. युवा धावपटूंना मैदानावर घाम गाळून अधिक कठोर मेहनत करण्याचा सल्ला देत विद्या पुढे म्हणाल्या,‘आमच्यावेळी नागपुरात सिंथेटिक ट्रॅकची सोय नव्हती. पुरेशी मैदाने नव्हती. सुसज्ज व्यवस्था नव्हती.
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचे आसोली गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले (नवरगाव खुर्द निवासी, मन्नू मेडीकल गोंदिया) यांचे मुंबईच्या हिंदूजा हॉस्पीटलमध्ये मंगळवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास निधन झाले.
त्यांचे पार्थिव शरीर बुधवारी सायंकाळी गोंदिया येथे आणले जाणार आहे. गुरुवार दिनांक ३१ जानेवारीला सकाळी ११ वाजता मोक्षधाम पार्वती घाट येथे अंत्यसंस्कार केले जातील. पटले यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद सदस्यांना धक्का बसला आहे.मनमिळाऊ स्वभावाचे सदस्य अशी त्यांची ओळख होती.
कोल्हापूर : अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना बुधवारी अवकाशात घडून येत आहे. माघ पोर्णिमा अर्थात ३१ जानेवारी २०१८ रोजी अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी संगम एकाच वेळी घडून येईल.
या दिवशी चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ५८ हजार किलोमीटर अंतरावर येईल त्यामुळे नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल. हा अवकाशीय सोहळा कोल्हापूर मधून उत्तम प्रकारे दिसू शकेल.
महत्वाचे म्हणजे उघड्या डोळ्यांनी पण या घटनेचा आनंद लुटता येणार आहे. ३१ मार्च १८६६ नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल १५२ वर्षांनी असा योग जुळून येत आहे आणि आपणास या अवकाशीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्यही लाभणार आहे.
हा सोहळा नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना दुर्बिणीतून पाहता यावा यासाठी राजाराम महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अविराज जत्राटकर व हौशी खगोलप्रेमी वसंत गुंडाळे यांच्या वतीने आर के नगर (खडीच्या गणपती समोरील टेकडी) कोल्हापूर येथे खास नियोजन केले आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
क्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.
या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयासाठी २७३ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या ६९ धावांत आटोपला.
भारताकडून ईशान पोरेलनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याआधी, या विश्वचषकात सातत्यानं फलंदाजी करणारा शुभमन गिल भारतीय डावाचा पुन्हा हिरो ठरला. त्यानं या सामन्यात नाबाद शतक झळकावून भारताला ५० षटकांत नऊ बाद २७२ धावांची मजल मारुन दिली. गिलनं ९४ चेंडूंत सात चौकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी उभारली.
या सामन्यात पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरानं ८९ धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया रचला होता. शॉनं ४१, तर कालरानं ४७ धावांची खेळी केली. भरवंशाचा हार्विक देसाई वीस धावांवर बाद झाला.
दरम्यान, ईशान पोरेलनं पाकिस्तानच्या चार प्रमुख फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडून, आपल्या पारपंरिक प्रतिस्पर्धी संघाच्या आव्हानातली हवाच काढून घेतली. तर शिवा सिंग आणि रियान पराग यांनी प्रत्येक दोन गडी बाद केले.
महत्वाच्या घटना
१६४९: इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला.
१९३३: अॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.
१९४८: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
१९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
१९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.
१९९९: पण्डित रविशंकर यांना भारतरत्न जाहीर.
जन्म
१८८२: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९४५)
१९१०: गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००)
१९११: शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १९८७)
१९१७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै २००७)
१९२७: स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६)
१९२९: हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.
१९४९: नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, थिएटर अॅकॅडमी चे एक संस्थापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉ. सतीश आळेकर यांचा जन्म.
मृत्यू
१९४८: महात्मा गांधी यांची हत्या. (जन्म: २ ऑक्टोबर १८६९)
१९४८: आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राईट यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८७१)
१९५१: ऑस्ट्रियन वाहन अभियंता फर्डिनांड पोर्श यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८७५)
१९९६: हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन.
२०००: मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन.
२००४: गीतकार रमेश अणावकर यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.