CBSE 10th result 2018 LIVE नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.
आज दुपारी ४ वाजता सीबीएसईच्या १० वी च्या परीक्षेचा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.
cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. यंदा सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेला १० लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यांचा आज निकाल जाहीर होईल.
निकाल कुठे पाहता येणार - विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.in, results.nic.in आणि results.gov.in वर पाहता येणार आहे.
तसंच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मायक्रोसॉफ्टने एक खास अॅप बनवलं असून विद्यार्थी तिथे आपला निकाल पाहू शकतात.
याशिवाय मेसेजद्वारेही तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या निकालासाठी मेसेज बॉक्समध्ये जा. तिथे cbse10 <rollno> <sch no> <center no> लिहा आणि 7738299899 ह्या नंबरवर पाठवा.
नागपूर : ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता, त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाणार आहेत. संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे, संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुखर्जी यांनी आमंत्रणाचा स्वीकार देखील केला आहे.
तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 7 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.
मात्र, मुखर्जींच्या ही उपस्थिती काँग्रेसला मानवणार का? मुखर्जींनीही हा कार्यक्रम आजच्या परिस्थितीत का घेतला? या प्रश्नांनी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचं वातावरण गरम केलं आहे.
मुंबई : राज्य शासनाने अनाथ बालकांना नोकºयांमध्ये एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक प्रमाणपत्र घेण्यासाठी मुंबई शहरातील अनुदानित, विनाअनुदानित बालगृहांतून बाहेर पडलेल्या बालकांनी आपापल्या संस्थांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियामांतर्गत मान्यता प्राप्त असलेल्या अनुदानित, विनाअनुदानित संस्था मध्ये पूर्वी दाखल झालेल्या अनाथ बालकांनी शेवटच्या संस्थेत वास्तव्यास असलेल्या संस्थेशी तात्काळ संपर्क साधून अनाथ असल्याबाबत प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियामांतर्गत मान्यता प्राप्त असलेल्या अनुदानित, विनाअनुदानित संस्था मध्ये दाखल होणाºया अनाथ मुलांना संस्थेमधून बाहेर पडतांना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याकारणाने त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात.
अशा लाभार्थ्यांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र आयुक्तालय, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरुन वितरित करण्यात येईल. तसेच बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथ प्रवेशितास शेवटच्या संस्थेत वास्तव्यास असेल अशा संस्थेकडे अनाथ प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : नफ्यात असणाऱ्या १५ पैकी ८ विमानतळांचे खासगीकरण वेगाने हालचाली करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाने नीती आयोग व अर्थमंत्रालयाला दिले आहेत. त्यात पुणे विमानतळाचाही समावेश आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या विमानतळांचे चालू आर्थिक वर्षात खासगीकरण केले जाईल. मोदी सरकारकडून एअर इंडिया व राज्यांच्या मालकीच्या हॉटेल्सची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात दिल्लीतील हॉटेल अशोकचा समावेश आहे. हॉटेल व विमानतळ देखभालीतून लाभ मिळत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
पुण्याशिवाय लखनौ, जयपूर, चेन्नई, कोलकाता, कोची, अहमदाबाद व गुवाहाटी या विमानतळांचेही खासगीकरण होणार आहे. ही सर्व विमानतळे नफ्यात आहेत. त्यामुळे सरकार येथून मोठा महसूल मिळू शकतो. पीएमओने अर्थमंत्रालय व नीति आयोगाला या खासगीकरणासाठी विशेष यंत्रणा करण्यास सांगितले आहे. बोली लावण्याची पद्धत पूर्वीच्या यूपीए सरकारने दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद विमानतळांसाठी वापरलेल्या पद्धतीपेक्षा वेगळी असेल.
या आधी मोदी सरकारने विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीच्या विमानतळांवरील व्यवस्थापनाची कंत्राटे खासगी क्षेत्रात देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या निर्णयानुसार जयपूर आणि अहमदाबाद विमानतळांसाठी निविदा मागविण्यात आल्यावर त्या अपयशी ठरल्या व या प्रस्तावांना प्रतिसाद मिळाला नाही.
आता विमानतळांचे संपूर्ण नियंत्रण खासगी क्षेत्राकडे देण्याची शक्यता अजमावून बघण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) परवानगी दिली आहे. विमानतळे ३० वर्षांसाठी बाहेरच्या कंत्राटदारांसाठी दिली जाण्याची शक्यता आहे आणि दर आगाऊच ठरवले जातील.
नवी दिल्ली- योगगुरू रामदेव बाबांचा पतंजली समूह दिवसेंदिवस प्रगतीची अनेक शिखरं पादाक्रांत करत आहे. पतंजलीच्या स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांना भारतीय ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहानं आता टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.
रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहानं रविवारी एक सिम कार्ड लाँच केले असून, त्याचं 'स्वदेशी समृद्धी सिम कार्ड' असं नामकरणही केलं आहे. तसेच या नव्या सिम कार्डसाठी पतंजलीनं बीएसएनएलशी करारही केला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि पतंजली यांनी संयुक्तपणे हे सिम कार्ड लाँच केले.
विशेष म्हणजे सद्यस्थितीत हे सिम कार्ड फक्त पतंजली उद्योग समूहातील कर्मचा-यांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. 2जी नेटवर्क असलेल्या या सिम कार्डवरून 144 रुपयांचे रिचार्ज केल्यास ग्राहकाला 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळणार आहे. तसेच या सिम कार्डवरून पतंजलीची उत्पादने मागवल्यास 10% सूटही देण्यात येणार आहे.
इस्लामाबाद- पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी नासिर उल मुल्क यांच्याकडे देण्यात आलेली आहे. ते पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश होते आता पंतप्रधानपदाची त्यांच्याकडे अंतरिम जबाबदारी असेल.
25 जुलै रोजी पाकिस्तानात निवडणुका होत आहेत.नासिर उल मुल्क यांच्या नेमणुकीवर कोणताही पाकिस्तानी माणूस बोट दाखवू शकत नाही असं अब्बासी यांनी त्यांच्या नेमणुकीबद्दल बोलताना सांगितले. यावेळेस त्यांच्याशेजारी विरोधीपक्षनेते सय्यद खुर्शिद अहमद शाह होते. अब्बासी यांची पाकिस्तान मुस्लीम लिग नवाज आणि शाह यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीमध्ये या विषयावरुन बराच तणाव होता.
गुरुवारी पाकिस्तानची संसद बरखास्त होणार आहे. मुल्क यांनी यापुर्वी पाकिस्तानच्या निर्वाचन आयोगाचे प्रमुखपद सांभाळले आहे.
अंतरिम सरकारकडे मोठे निर्णय घेण्याचे फारसे अधिकार नसतात. फक्त नवे सरकार सत्तेत येईपर्यंत त्यांना सत्ता सांभाळावी लागते.
महत्वाच्या घटना
१८४८: विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.
१९१४: ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात १९९२ लोक ठार झाले.
१९१९: अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
१९५३: एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले.
जन्म
१९०६: भारतीय-इंग्लिश लेखक टी. एच. व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६४)
१९१४: एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९८६)
१९१७: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)
मृत्यू
१८१४: नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी जोसेफिन डी बीअर्नार्नास यांचे निधन. (जन्म: २३ जून १७६३)
१८२९: विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १७७८)
१८९२: बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७ – तेहरान, इराण)
१९७२: अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)
१९७७: भाषाशास्त्रज्ञ सुनीतिकुमार चटर्जी यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)
१९८७: भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १९०२)
२०१०: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.