चालू घडामोडी - २९ मे २०१७

Date : 29 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गाडीवरील लाल दिवा हटवण्यास मंत्र्याचा नकार :
  • केंद्र सरकारने गाडीवरील लाल दिवा हटवण्यास सांगितलं असलं तरी पश्चिम बंगालचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अरुप बिस्वास मात्र बिनदिक्कतपणे लाल दिव्याचा वापर करत आहेत.

  • 'आमच्या सरकारने अद्यापपर्यंत लाल दिव्यावर बंदीवर आणलेली नाही. तसंच आम्ही इतरांचे आदेश पाळण्यासाठी बांधील नाही', असं अरुप बिस्वास बोलले आहेत.

  • केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याच्या दृष्टीने फक्त तात्काळ सेवा देणा-या गाडींवरच लाल दिवा ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये पोलीस, संरक्षण आणि  निमलष्करी दल यांचा समावेश आहे. यांना वेगवेगळ्या लाल, निळ्या आणि पांढ-या रंगाचे दिवे वापरण्याची परवानगी आहे. 

‘आधार’ने भारताला मिळवून दिले पहिले स्थान : 
  • बायोमॅट्रिक तंत्रज्ञानात सुधारणेबरोबरच त्याच्या अंमलबजावणीत भारत जगात अव्वल ठरला असून भारतात आपली सत्यता पडताळण्यासाठी डोळ्यांचा वापर करण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत तिप्पट असल्याचे ‘एचसबीसी’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

  • भारतात हे प्रमाण ९ टक्के तर इतर देशांत ते तीन टक्क्यांवर आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पाश्चात्य देशांच्या तुलनेत आशिया आणि पश्चिम अाशियातील देश आघाडीवर आहेत.

  • कारण तंत्रज्ञानाबाबत त्यांची समज चांगली आहे आणि याबाबत ते अत्यंत सकारात्मक असतात, असेही या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल ११ देशांतील १२,०१९ लोकांच्या प्रतिक्रियेवरून तयार करण्यात आला आहे. यामध्ये कॅनाडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, भारत, मेक्सिको, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. 

  • त्यानंतर भारताचा (३१ टक्के) व संयुक्त अरब अमिरातचा (२५ टक्के) क्रमांक लागतो. बायोमॅट्रिक तंत्रज्ञानात ओळख पटवण्यासाठी त्या व्यक्तीच्या शरीरातील विविध अवयवांच्या डाटाचा उपयोग केला जातो. यामध्ये बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि रक्ताच्या डीएनएचा समावेश होतो.

सीबीएसई बारावीत रक्षा गोपाल देशात प्रथम :
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत देशभरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून प्रथम येण्याचा मान दिल्लीच्या रक्षा गोपाल या विद्यार्थिनीने तब्बल ९९.६ टक्के (५०० पैकी ४९८) गुण मिळवून पटकाविला आहे.

  • चंदीगडची भूमी सावंत-डे या विद्यार्थिनीने ५०० पैकी ४९७ गुण मिळवून दुसरे स्थान मिळविले आणि ५०० पैकी ४९६ एवढे समान गुण मिळालेल्या आदित्य जैन व मन्नत लुथ्रा या दोघांनी देशात तिसरे स्थान पटकावले आहे.

'जीएसएलव्ही एमके-३'च्या उड्डाणासाठी इस्रो सज्ज :
  • 'भारताच्या भूमीतून भारतीयाला अवकाशात नेऊ शकणारे भारतीय रॉकेट' असे वर्णन केल्या जाणाऱ्या 'जीएसएलव्ही एमके-३' या रॉकेटच्या उड्डाणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सज्ज असल्याचे या संस्थेचे संचालक किरणकुमार यांनी सांगितले.

  • पुढील आठवड्यात आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या प्रक्षेपण केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.

  • 'जीएसएलव्ही एमके-३' हे भारताने आतापर्यंत तयार केलेले सर्वांत अवजड रॉकेट असून, सर्वांत अवजड उपग्रह अवकाशात वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.

  • तसेच याव्दारे अवजड उपग्रह प्रक्षेपणाच्या अब्जावधी डॉलरच्या बाजारात प्रवेश करण्यास 'इस्रो' सिद्ध आहे. या रॉकेटची पुढील आठवड्यात होणारी चाचणी यशस्वी झाल्यास पुढील दशकभरात याच रॉकेटव्दारे भारतीय अवकाशवीर अवकाशात जाऊ शकेल.

यदू जोशी यांना 'रंगाअण्णा वैद्य' पुरस्कार जाहीर :
  • सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य स्मृति राज्यस्तरीय पुरस्कार यदू जोशी यांना जाहीर झाला आहे.

  • स्व. बाबुराव जक्कल स्मृति जिल्हास्तरीय पुरस्कार पत्रकार संजय पाठक यांना दिला जाणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली़.

  • २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे. तर १५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे.

संरक्षण क्षेत्रात 'पब्लिक प्रायव्हेट' पार्टनरशिप सर्वोत्तम :
  • संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी संरक्षण साहित्य आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती देशामध्येच झाली पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे.

  • संशोधन आणि संरक्षण उपकरणांचे उत्पादन या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत.

  • परदेशातील ज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला आहे. यासाठी संरक्षण क्षेत्रात 'पब्लिक प्रायव्हेट' पार्टनरशिप हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केले.

  • 'डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी' (डीआयएटी) अभिमत विद्यापीठाच्या नवव्या पदवी प्रदान समारंभात जेटली बोलत होते.

तुरनोई सॅटेलाइट स्पर्धेत भारताच्या भवानीदेवीला सुवर्णपदक :
  • भारताच्या सी.ए. भवानीदेवी हिने आइसलँड येथील रेकजाविक येथे झालेल्या तुरनोई सॅटेलाइट तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात सुवर्णपदक जिंकले.

  • २७ मे रोजी झालेल्या अंतिम फेरीत सी.ए. भवानीदेवी हिने ग्रेट ब्रिटनच्या सारा जेन हॅम्पसन हिचा १५-१३ असा पराभव केला.

  • चेन्नईच्या या महिला खेळाडूने उपांत्य फेरीत ब्रिटनची एक अन्य खेळाडू जेसिका कोरबी हिला १५-११ अशा फरकाने नमवले होते.

  • तसेच त्याबरोबर भवानीदेवी ही आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.

दिनविशेष : 

जन्म, वाढदिवस

  • अमेरिकेचे तरुण व लोकप्रिय अध्यक्ष जॉन केनेडी यांचा जन्म : २९ मे १९१७

ठळक घटना

  • उत्तुंग अशा एव्हरेस्ट शिखरावर शेर्पा तेनसिंग याने ब्रिटिश गिर्यारोहकांबरोबर चढाई करुन पहिले पाउउल ठेवले

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.